लंडन

लंडन (इंग्लिश: London ) हे इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.

थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.

लंडन
London
युनायटेड किंग्डम देशाची राजधानी

लंडन
सिटी ऑफ लंडन, टॉवर ब्रिज, लंडन आयबकिंगहॅम राजवाडा
लंडन
लंडनचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 51°30′28″N 00°07′41″W / 51.50778°N 0.12806°W / 51.50778; -0.12806

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष इ.स. ४३
महापौर बोरिस जॉन्सन
क्षेत्रफळ १,५७२.१ चौ. किमी (६०७.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७९ फूट (२४ मी)
लोकसंख्या  (जुलै २०१०)
  - शहर ७८,२५,२००
  - घनता ४,९७८ /चौ. किमी (१२,८९० /चौ. मैल)
  - महानगर १,३९,४५,०००
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
लंडनचे संकेतस्थळ

लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. न्यू यॉर्क शहरटोकियोसोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.. तसेच युरोपातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो. जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात तसेच लंडन हीथ्रो विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे.. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये भरवल्या गेल्या. ह्या स्पर्धांचे तिसऱ्यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे.

जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते. ग्रेटर लंडनची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे. लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते. लंडन परिसरात ३०० भाषा बोलल्या जातात. सध्या लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

लंडन राजमुद्रा

भूगोल

हवामान

लंडनमधील हवामान इतर पश्चिम युरोपीय शहरांप्रमाणे सौम्य व आर्द्र आहे. २०१० साली लंडन हे युरोपातील सर्वात प्रदुषित शहर होते.

लंडन (हीथ्रो विमानतळ) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 14.0
(57.2)
16.0
(60.8)
21.0
(69.8)
26.9
(80.4)
31.0
(87.8)
35.0
(95)
35.5
(95.9)
37.9
(100.2)
30.0
(86)
26.0
(78.8)
19.0
(66.2)
15.0
(59)
37.9
(100.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 8.1
(46.6)
8.4
(47.1)
11.4
(52.5)
14.2
(57.6)
17.9
(64.2)
21.1
(70)
23.5
(74.3)
23.2
(73.8)
19.9
(67.8)
15.6
(60.1)
11.2
(52.2)
8.3
(46.9)
15.2
(59.4)
सरासरी किमान °से (°फॅ) 2.3
(36.1)
2.1
(35.8)
3.9
(39)
5.5
(41.9)
8.7
(47.7)
11.7
(53.1)
13.9
(57)
13.7
(56.7)
11.4
(52.5)
8.4
(47.1)
4.9
(40.8)
2.7
(36.9)
7.4
(45.3)
विक्रमी किमान °से (°फॅ) −10.0
(14)
−9.0
(15.8)
−8.0
(17.6)
−2.0
(28.4)
−1.0
(30.2)
5.0
(41)
7.0
(44.6)
6.0
(42.8)
3.0
(37.4)
−4.0
(24.8)
−5.0
(23)
−7.0
(19.4)
−10.0
(14)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 55.2
(2.173)
40.8
(1.606)
41.6
(1.638)
43.6
(1.717)
49.3
(1.941)
44.9
(1.768)
44.5
(1.752)
49.5
(1.949)
49.1
(1.933)
68.5
(2.697)
59.0
(2.323)
55.0
(2.165)
601.5
(23.681)
सरासरी हिमवर्षा सेमी (इंच) 24.4
(9.61)
10.8
(4.25)
2.7
(1.06)
0.4
(0.16)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.2
(0.08)
8.2
(3.23)
46.7
(18.39)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 1 mm) 10.9 8.1 9.8 9.3 8.5 8.4 7.0 7.2 8.7 9.3 9.3 10.1 106.6
सरासरी हिमवर्षेचे दिवस 4 4 3 1 0 0 0 0 0 0 1 3 16
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 91 89 91 90 92 92 93 95 96 95 93 91 92.3
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 61.4 77.7 113.9 167.6 197.0 205.5 210.9 203.4 148.3 115.9 72.3 51.8 १,६२५.७
स्रोत #1: बीबीसी हवामान,
स्रोत #2: हवामान खाते,

अर्थकारण

प्रशासन

वाहतूक व्यवस्था

लंडन 
लंडन अंडरग्राउंड ही जगातील सर्वात जुनी शहरी भुयारी रेव्ले आहे.

लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, रेल्वे व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित असलेला लंडन हीथ्रो विमानतळ हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. गॅट्विक विमानतळ हा येथील दुसरा एक महत्त्वाचा विमानतळ आहे. युरोस्टार ही चॅनल टनेलमधून धावणारी द्रुतगती रेल्वेसेवा लंडनला पॅरिसब्रुसेल्स शहरांशी जोडते. लंडन शहरात १८ लांब पल्ल्याची गाड्यांची एकूण १८ रेल्वे स्थानके आहेत. त्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो.

शहरी वाहतुकीसाठी लंडन अंडरग्राऊंड ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २८० स्थानके जोडणाऱ्या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.

लोकजीवन

संस्कृती

संगीत

पश्चिमात्य शास्त्रीयरॉक संगीताच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात आहेत. लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा हा नावाजलेला संगीतचमू लंडनच्या बार्बिकन सेंटरमध्ये भरतो. बीटल्स, द रोलिंग स्टोन्स, पिंक फ्लॉइड, क्वीन हे जगातील सर्वात लोकप्रिय बँड लंडनमध्येच स्थापण्यात आले. तसेच एल्टन जॉन, डेव्हिड बोवी, जॉर्ज मायकल, एमी वाइनहाऊस इत्यादी प्रसिद्ध गायक व संगीतकार लंडनचे रहिवासी होते.

प्रसारमाध्यमे

शिक्षण

लंडन 
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन ही लंडन विद्यापीठाची एक शाखा आहे.

लंडन हे उच्च शिक्षणासाठीचे जगातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण ४३ (युरोपात सर्वाधिक) विद्यापीठे आहेत. २००८ साली ४.१२ लाख विद्यार्थी लंडनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. १.२५ लाख विद्यार्थिसंख्या असलेला लंडन विद्यापीठ हा युरोपातील सर्वात मोठा विद्यापीठसमूह आहे. लंडन विद्यापीठामध्ये १९ स्वतंत्र उप-विद्यापीठे व १२ संशोधन संस्था आहेत. अनेक अहवालांनुसार, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इंपीरियल कॉलेज लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन व्यापार विद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था या जगातील सर्वोत्कृष्ट संस्था असल्याचे सिद्ध झाले आहे.

खेळ

लंडन 
लॉर्ड्‌स क्रिकेट मैदान

लंडनने आजवर १९०८, १९४८२०१२ ह्या तीन वेळा ऑलिंपिक खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे नवीन ऑलिंपिक मैदान बांधले गेले. फुटबॉल हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी आर्सेनल, चेल्सी, फुलहॅम, क्वीन्स पार्क रेंजर्सटॉटेनहॅम हॉटस्पर हे पाच क्लब इंग्लिश प्रीमियर लीगचे सदस्य आहेत. १९२४ सालापासून इंग्लंड फुटबॉल संघाचे स्थान जुने वेंब्ली मैदान येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे वेंब्ली स्टेडियम उभारण्यात आले.

रग्बी, क्रिकेटटेनिस हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत. लॉर्ड्‌सओव्हल ही क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदाने लंडन शहरात आहेत. चार ग्रँड स्लॅममधील सर्वात मानाची मानली जाणारी विंबल्डन टेनिस स्पर्धा दरवर्षी जून-जुलै दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात खेळली जाते.

पर्यटन स्थळे

जुळी शहरे

खालील शहरांचे लंडनसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  • Ackroyd, Peter (2001), London: The Biography, London: Vintage, p. 880, ISBN 0099422581
  • Aubin, Robert Arnold (2008), London in flames, London in glory: poems on the fire and rebuilding of London (PDF), Rutgers University Press on's Concerts" /> London's two muthor=Mayor of London, archived from the original (PDF) on 2010-06-02, 2010-07-26 रोजी पाहिले
  • Miles, Barry (2010), London Calling, Atlantic Books, ISBN 9781842546139
  • Mills, David (2001), Dictionary of London Place Names, Oxford Paperbacks, ISBN 978-0192801067, OCLC 45406491
  • Noorthouk, J (1773), A New History of London, Centre for Metropolitan History, archived from the original on 2014-10-08, 2010-07-26 रोजी पाहिले
  • Porter, Roy. History of London (1995), by a leading historian
  • Reddaway, Thomas Fiddian (1940), The Rebuilding of London After the Great Fire, Jonathan Cape
  • Travers, Tony (2004), The Politics of London, Palgrave, ISBN 1861341725

बाह्य दुवे

लंडन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

लंडन राजमुद्रालंडन भूगोललंडन हवामानलंडन अर्थकारणलंडन प्रशासनलंडन वाहतूक व्यवस्थालंडन लोकजीवनलंडन संस्कृतीलंडन प्रसारमाध्यमेलंडन शिक्षणलंडन खेळलंडन पर्यटन स्थळेलंडन जुळी शहरेलंडन संदर्भ आणि नोंदीलंडन बाह्य दुवेलंडनEn-uk-London.oggइंग्लंडइंग्लिश भाषाथेम्स नदीयुनायटेड किंग्डमयुरोपियन संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभाजय मल्हारट्विटरवस्तू व सेवा कर (भारत)अर्थसंकल्पगोवाकोरेगावची लढाईपश्चिम दिशानिलेश लंकेधर्मो रक्षति रक्षितःवि.वा. शिरवाडकरभारताचे पंतप्रधानपरभणी जिल्हाशेतीनागरी सेवामीन रास२०२४ लोकसभा निवडणुकामांगअक्षय्य तृतीयाजिल्हा परिषदज्ञानेश्वरीमहाराष्ट्रातील लोककलासातव्या मुलीची सातवी मुलगीमाळीयूट्यूबदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी भाषाप्राजक्ता माळीभारतीय रिझर्व बँकपुरंदरचा तहकापूसवसुंधरा दिनबारामती विधानसभा मतदारसंघरविकांत तुपकरदेवेंद्र फडणवीसबहुराष्ट्रीय कंपनीभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र शासनग्रंथालयरतन टाटाकासारपु.ल. देशपांडेताराबाई शिंदेमाळशिरस विधानसभा मतदारसंघहोमरुल चळवळबाळ ठाकरेसुरत लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीभारतातील जिल्ह्यांची यादीआनंद शिंदेसांगली विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्गनागपूर लोकसभा मतदारसंघदौलताबादजागतिक लोकसंख्याजिजाबाई शहाजी भोसलेभारतरत्‍नभारताच्या पंतप्रधानांची यादीजागतिकीकरणनागपूरक्रिकबझगणपतीमाहितीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेअश्वगंधायकृतभारतीय संस्कृतीगोत्रसेंद्रिय शेतीदहशतवादकबड्डीघोरपडशुभं करोतिशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीएकविरानितीन गडकरीगोविंद विनायक करंदीकरपर्यावरणशास्त्र🡆 More