गोत्र

गोत्र ही एखाद्या पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला स्थूलमानाने उद्देशून वापरली जाणारी हिंदू धर्मातील संज्ञा आहे.

हिंदू परंपरांनुसार गोत्रे बहुधा वैदिक ऋषींच्या नावांवरून ओळखली जातात; उदा.: कश्यप गोत्र, वसिष्ठ गोत्र. हिंदू समाजामध्ये विभिन्न जातींनुसार, प्रादेशिक समाजांनुसार वेगवेगळी गोत्रे आढळतात. २ गोत्रे आणि प्रवरे[संपादन]

वर्णन

गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायन सूत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.[ संदर्भ हवा ]

वर्गीकरण

गोत्रांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीनमध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू व इंद्रप्रमाद; पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रात्रवरुण व कौंडिण्य ही होत.[ संदर्भ हवा ]

आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे.

  1. विश्र्वमित्र
  2. जमदग्नी
  3. भारद्वाज
  4. गौतम
  5. अत्रि
  6. वशिष्ट
  7. कश्यप
  8. अगस्ती

Tags:

ऋषीहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पसायदानभूकंपलोकशाहीभारतीय संविधानाची उद्देशिकामहाराष्ट्रातील पर्यटनकुळीथग्रामपंचायतमहाराणा प्रतापमराठवाडाभारताची अर्थव्यवस्थाभारताच्या राष्ट्रपतींची यादीसंगीतातील घराणीशेतकरी कामगार पक्षउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघकृष्णशनिवार वाडाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रज्वालामुखीनिरीक्षणरामनवमीबिबट्यातलाठीभोर विधानसभा मतदारसंघकुटुंबनियोजनजागतिक पुस्तक दिवसनातीभारतीय रिझर्व बँकस्थानिक स्वराज्य संस्थासंभाजी भोसलेमुंबईबालविवाहनागपूर लोकसभा मतदारसंघबावीस प्रतिज्ञामाळशिरस विधानसभा मतदारसंघस्वच्छ भारत अभियानपूर्व दिशारामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीवृत्तपत्रभारतीय संविधानाचे कलम ३७०सायाळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारबसवेश्वरसातारा जिल्हातत्त्वज्ञानतिरुपती बालाजीअण्णा हजारेभारत छोडो आंदोलनआकाशवाणीवेदप्राजक्ता माळीमहाराष्ट्रातील लोककलारमाबाई आंबेडकरपरभणी लोकसभा मतदारसंघप्रदूषणखंडोबागोवाजिंतूर विधानसभा मतदारसंघविठ्ठलमाहितीमाढा विधानसभा मतदारसंघज्योतिर्लिंगनाणेदक्षिण दिशावनस्पतीइसबगोलआणीबाणी (भारत)शिवाजी महाराजांचा जीवनक्रमबहिणाबाई चौधरीदशरथमावळ लोकसभा मतदारसंघरामायणऔद्योगिक क्रांतीपंढरपूरजय श्री रामशाश्वत विकाससोलापूरकर्ण (महाभारत)🡆 More