बीटल्स

बीटल्स (इंग्रजी: The Beatles, द बीटल्स ;) हा इ.स.

१९६०-७० च्या दशकांमध्ये कार्यरत असलेला इंग्लिश रॉक संगीतचमू होता. हा पॉप संगीताच्या इतिहासातील व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी व नावाजला गेलेला चमू इ.स. १९६० साली इंग्लंडातील लिव्हरपूल येथे स्थापन झाला. इ.स. १९६२पासून या चमूत जॉन लेनन (रिदम गिटार, गायन), पॉल मॅकार्टनी (बास गिटार, गायन), जॉर्ज हॅरिसन (लीड गिटार, गायन) आणि रिंगो स्टार (ड्रम, गायन) हे कलाकार होते. स्किफल व इ.स. १९५० सालच्या रॉक अँड रोल संगीतप्रकारांपासून सुरुवात करून या चमूने पुढे पॉप बॅलाड ते सायकिडिलिक रॉक असे अनेक संगीतप्रकार अभिनव पद्धतीने हाताळले. सुरुवातीला त्यांच्या अफाट लोकप्रियतेला 'बीटलमॅनिया' या नावाने खूळ समजले जात होते. हे लोकमत पुढे त्यांची गीतलेखनकला सफाईदार व शिष्टसंमत झाल्यावर बदलले. इ.स. १९६०सालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींतल्या तत्त्वप्रणालीचे ते प्रतीक बनले.

बीटल्स
बीटल्स
बीटल्स
संगीत साधना
गायन प्रकार रॉक, पॉप
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ इ.स. १९६० - इ.स. १९७०

सुरुवातीला लेनन, मॅकार्टनी, हॅरिसन, स्टुअर्ट सटक्लिफ (बास) आणि पीट बेस्ट (ड्रम) या पाच बीटल्सांनी लिव्हरपूल आणि हांबुर्ग येथील क्लबांतून आपला जम बसवला. इ.स. १९६१ साली सटक्लिफाने चमू सोडला आणि बेस्टाच्या बदली रिंगो स्टार चमूत सामील झाला. एका संगीतविषयक दुकानाचा मालक, ब्रायन एपष्टाइन याने बीटल्सांचा व्यवस्थापक म्हणून काम करायची तयारी दाखवल्यावर या संगीतचमूला व्यावसायिक स्पर्श लाभला. तसेच निर्माता जॉर्ज मार्टिन याच्या मदतीने 'लव्ह मी डू' या ध्वनिफितीच्या निर्मितीनंतर बीटल्सांना इ.स. १९६२ साली व्यावसायिक स्तरावर चांगले यश मिळाले. इ.स. १९७० साली हा चमू फुटेपर्यंत, देशोदेशी कार्यक्रम करणे आणि इंग्लंडात असताना आपल्या स्टुडिओत नवीन ध्वनिफितींचे ध्वनिमुद्रण करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. यानंतर पाचही बीटल्स स्वतंत्रपणे संगीतक्षेत्रात कार्य करू लागले. इ.स. १९८० साली लेननाचा त्याच्या न्यू यॉर्क शहरातल्या घराबाहेर खून झाला, तर इ.स. २००१ साली हॅरिसनाचे कर्करोगाने निधन झाले. मॅकार्टनी आणि स्टार अजूनही सक्रीय आहेत.

बाह्य दुवे

बीटल्स 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Tags:

इ.स. १९५०इ.स. १९६०इ.स. १९६२इंग्लंडइंग्लिश भाषाजॉन लेननजॉर्ज हॅरिसनपॉपपॉल मॅकार्टनीरिंगो स्टाररॉक अँड रोललिव्हरपूल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वि.स. खांडेकरभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतीय जनता पक्षअंकिती बोससाम्राज्यवादनाशिकमराठा साम्राज्यपानिपतमहाराणा प्रतापपुणे लोकसभा मतदारसंघबुलढाणा लोकसभा मतदारसंघलॉर्ड डलहौसीकोकणगर्भाशयअर्थशास्त्रऋतुराज गायकवाडदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४खो-खोअजिंठा लेणीसुशीलकुमार शिंदेकीर्तनमहाराष्ट्रातील लोककलाआत्महत्याप्रहार जनशक्ती पक्षनृत्यहिंदू धर्मइतर मागास वर्गबेकारीमहाराष्ट्र टाइम्सजागतिक पुस्तक दिवसज्योतिबाजवाहरलाल नेहरूचंद्रगुप्त मौर्यलावणी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरक्षा खडसेहुंडाइंदुरीकर महाराजभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीजुने भारतीय चलनवाचनभारतीय निवडणूक आयोगशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळवर्णबाबा आमटेशाळादीपक सखाराम कुलकर्णीमहासागरइस्लामचीनतरसपाऊसचिन्मय मांडलेकरबैलगाडा शर्यतहरभरापुणेराजाराम भोसलेकल्याण लोकसभा मतदारसंघअपारंपरिक ऊर्जास्रोतसिंधुदुर्गसंगणक विज्ञानभारतीय आडनावेबहिणाबाई चौधरीहवामानशास्त्रखंडोबागजानन महाराजविजयसिंह मोहिते-पाटीलपारू (मालिका)प्राथमिक शिक्षणइराकअर्थसंकल्पअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जवमुघल साम्राज्यचाफाकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघ🡆 More