महाराणा प्रताप

प्रताप सिंह पहिला तथा महाराणा प्रताप(९ मे, १५४० - १९ जानेवारी, १५९७), हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा होते.

१५४०">१५४० - १९ जानेवारी, १५९७), हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा होते. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी १५७६ मधील हल्दीघाटीच्या लढाईसह अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या. गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले जे नंतर मलिक अंबर आणि शिवाजी महाराजांसह मुघलांच्या विरुद्ध बंडखोरांसाठी प्रेरणादायी ठरले.

महाराणा प्रतापसिंहजी
महाराणा
महाराणा प्रताप
राजा रविवर्मा यांनी काढलेले महाराणा प्रताप यांचे चित्र
महाराणा प्रताप
मेवाडचा ध्वज
महाराणा प्रताप
मेवाडची राजमुद्रा
अधिकारकाळ इ.स.१५७२-इ.स.१५९७
राज्याभिषेक १ मार्च इ.स.१५७२
राज्यव्याप्ती मेवाड विभाग, राजस्थान
राजधानी उदयपूर
पूर्ण नाव महाराणा प्रतापसिंह सिसोदिया
जन्म ९ में इ.स.१५४०
कुंभलगड किल्ला,राजस्थान
मृत्यू १९ जानेवारी इ.स.१५९७
पूर्वाधिकारी राणा उदयसिंह
उत्तराधिकारी महाराणा अमरसिंह
वडील राणा उदयसिंह
आई महाराणी जयवंताबाई
पत्नी महाराणी अजबदेहबाई (एकूण ११ पत्‍नी)
राजघराणे सिसोदिया राजवंश


कूळ

महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी होते. मेवाडच्या राजघराण्यावर 'बाप्पा रावळ', 'राणा कुंभा' आणि 'राणा सांगा' अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. शक्ती सिंह, विक्रमसिंह आणि जगमल सिंह हे प्रतापांचे लहान बंधू होते. महाराणा यांच्या दोन सावत्र बहिणी होत्या. चंद कंवर आणि मान कंवर. महाराणांचा विवाह बिजोलियाच्या अजबदे पंवार यांच्याशी सन १५५७ ला झाला होता. त्यांचे इतर आणखी १० राजकुमारींशीही लग्न झाले होते जसे की त्या काळात परंपरा होती (राजकीय संबंध) आणि अमरसिंह प्रथम यांच्यासह त्यांना १७ मुले झाली. मेवाडच्या महान राजघराण्याशी त्यांचा संबंध होता.

जन्म आणि बालपण

महाराणा प्रताप यांच्या जन्मस्थळाच्या प्रश्नावर दोन गृहीतके आहेत. पहिले गृहीतक हे, महाराणा प्रताप कुंभलगड किल्ल्यात जन्माला आले असे आहे. कारण महाराणा उदयसिंह आणि जयवंताबाई यांचे लग्न कुंभलगड राजवाड्यात पार पडले होते. दुसरा विश्वास असा आहे की, त्यांचा जन्म मारवाड मधील पालीच्या वाड्यांमध्ये झाला. महाराणा प्रतापांच्या आईचे नाव जयवंताबाई होते, त्या पालीच्या सोनगरा अखैराजसिंह यांच्या सुपुत्री होत्या.

महाराणा प्रताप यांना लहानपनापासूनच राजवाड्या पेक्षा, सामान्य जनतेबरोबर वेळ घालायला जास्त आवडत असे. त्यांच्या जनते मध्ये भिल्ल समुदाय जास्त प्रमाणात होता. त्यामुळे अर्थातच त्यांच्या सवंगड्यांमधेही भिल्ल मुले खुप होती. त्यांनी स्वतःबरोबरच आपल्या सवंगड्यांणाही सशत्र युद्धचे धडे दिल. भिल्ल आपल्या मुलाला किका असे संबोधतात. म्हणून ज्येष्ठ भिल्ल, महाराणाला किका नावाने हाक मारत असत. यावरून आपल्याला महाराणा बद्दल सामान्य लोकांच्या मनात किती आदर आणि प्रेम होता हे कळते. लेखक विजय नहार यांच्या 'हिंदुसूर्य महाराणा प्रताप' या पुस्तकानुसार, प्रतापचा जन्म झाला तेव्हा उदयसिंह आणि मेवाड राज्य युद्ध आणि असुरक्षिततेने घेरले होते. कुंभलगड कोणत्याही प्रकारे सुरक्षित नव्हता. त्या काळात जोधपूरचा राजा मालदेव सर्वात शक्तिशाली होता. जयवंतबाई यांचे वडील आणि सोनी यांचा मुलगा सोनागरा अखेरज मालदेव एक समर्थ राजे होते.

या कारणास्तव पाली आणि मारवाड सर्वच प्रकारे सुरक्षित होते. म्हणून जयवंताबाईंना पाली येथे पाठविण्यात आले. वि. सं. ज्येष्ठ शुक्ल तृतीया शके १५४० रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म पाली मारवाड येथे झाला. प्रताप यांच्या जन्माची खबर मिळताच उदयसिंहाच्या सैन्याने मोर्चाला सुरुवात केली आणि मावलीच्या युद्धात बनवीरविरुद्ध विजय मिळवला आणि चित्तोडच्या गादीचा ताबा घेतला. महाराणा प्रताप यांचे मुख्य साहाय्यक, भारतीय प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी देवेंद्रसिंग शक्तिवत यांच्या पुस्तकानुसार, महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान जुना कचरी पाळीचे अवशेष असलेल्या जुन्ना किल्ल्यात होते. हा किल्ला हे त्यांच्या आईचे घर होते. परंपरेनुसार मुलीचा पहिला मुलगा तिच्या माहेरी जन्मतो. इथे सोनगरचे कुलदेवी नागनाची मंदिर अजूनही सुरक्षित आहे.

जीवन

राज्याभिषेक

इ.स. १५६८ मध्ये, उदयसिंह रणवीर आनोसे दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर आपल्या ३५००० सैन्यासह चाल करून आला आणि त्याने चित्तौड़ किल्ल्याला वेढा घातला. चार महीने चाललेल्या या प्रदीर्घ वेढ्या मुळे किल्ल्यावरची रसद संपत आली होती कारण किल्ल्यावर सुमारे ३०००० सामान्य जनता आश्रित होती व केवळ ८००० राजपूत सैनिक होते. या हल्ल्यात रजघराणे सुरक्षित रहावे म्हणून काही प्रमुख सरदारांचा सल्ला ऐकून राणा उदयसिंह आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. या युद्धात ८००० राजपूत वीरांणी असंम्य शौर्याची प्रचिति देत, अकबराच्या २५००० सैनिकांचा फाडशा पाडला व स्वतःही वीरमरण स्विकारले, याचा बदला म्हनूण अकबर ने किल्यावरच्या ३०००० निशपाप लोकांचा बळी घेतला.

उदयसिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. राणा उदयसिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भटीयानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले. राजपथावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला. एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपला लौकिक निर्माण केला.

हळदीघाटीची लढाई

मधल्या काळात चित्तोडगडच्या रक्तरंजित लढाईमुळे मेवाडचा सुपीक पूर्व पट्टा मोगलांच्या हाती लागला. तथापि, अरवल्ली परिसरामधील उरलेले जंगली व डोंगराळ राज्य अजूनही प्रताप सिंहाच्या ताब्यात होते. मोगल बादशाह अकबर हा मेवाडमार्गे गुजरातला स्थिर मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने होता. इस १५७२ मध्ये जेव्हा प्रताप सिंहाचा राजा (महाराणा) म्हणून राज्याभिषेक करण्यात आले तेव्हा अकबरने अनेक राजदूतांना पाठवून या भागातील इतर राजपूत नेत्यांप्रमाणे अंकित बनण्यास उद्युक्त केले. जेव्हा महाराणाने अकबरला वैयक्तिकरित्या अधीन होण्यास नकार दिला, तेव्हा युद्ध अपरिहार्य बनले.

१ जून १५७६ रोजी हळदीघाटीची लढाई आमेरच्या मानसिंग (अकबराचा सेनापती) याच्या नेतृत्वात महाराणा प्रतापसिंह आणि अकबरच्या सैन्यामध्ये झाली. लढाईचे ठिकाण राजस्थानमधील आधुनिक काळातील राजसमंद गोगुंडाजवळील हळदीघाटीजवळ एक अरुंद डोंगराळ खिंड होती. प्रतापसिंग यांनी सुमारे ३००० घोडदळ आणि ४०० भिल्ल तिरंदाजीची फौज तयार केली. मोगलांचे नेतृत्व अंबर येथील मानसिंग करीत होते आणि त्याने सैन्यात सुमारे ८५,००० पायदळ,घोडदळ,बंदुकी तोफा होत्या.या हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रतापांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. मेवाडच्या मुठ्ठीभर सेनेपुढे अकबरची लाखाची सैन्यतुकडी हार मानू लागली होती. महाराणा प्रताप यांनी अकबराच्या २ सेनापतीना संपवून (ज्यामध्ये बहलोल खान नावाचा प्रचंड शरीर यष्टिचा पठान सरदार होता, ज्याला महाराणा प्रताप यांनी त्याच्या घोड्या सकट दोन तुकडे केले होते). यानंतर क्षत्रियांचा कलंक मानसिंगच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. मानसिंग हा हत्तीवर बसून युद्ध करत होता तर महाराणा आपल्या प्रिय घोडा चेतक वर बसून हातात ८० किलोचा भाला घेऊन युद्ध करत होते. मानसिंगला बघून चेतक ने आपले दोन्ही पाय हत्तीच्या मस्तकावर ठेवले एवढ्यात महाराणा आपला भाला फेकायला तेवढयात हत्तीच्या सोंडेला लागलेली तलवारमुळे चेतकचा एक पाय कापला गेला. मानसिंग त्या रुद्र अवतार महाराणा प्रतापांचं रूप बघून घाबरला आणि आपल्या महावताच्या मागे लपून बसला. चेतकचा एक पाय कापल्या मुळे महाराणा प्रतापांचा भाला मानसिंग न लागता चुकून त्याच्या महावताला लागला हे दृश्य बघून मानसिंग ने मागच्या बाजूला उडी मारून सेनेत लपून बसला पण काही वेळात युद्ध सोडून पळून गेला. ते बघताच काही मुघल सैन्य ही युद्ध सोडून पळून गेल. तेवढ्यात गद्दार मुघलांनी लपून महाराणा प्रतापांच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या, एकाने लपून महाराणांच्या पाठीवर बाण मारला. दोन गोळ्या पायाला लागल्या मुळे महाराणा आणि चेतक प्रचंड घायाळ झाले होते व युद्ध करण्याच्या स्थितीत नवथे. त्यामुळे त्यांच्या सरदारांनी या हिंदुस्थानाचा स्वामी जिवंत राहावा, भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले तरच हे अत्याचारी मुघल आपल्या भूमीत पाय रोवू शकत नाही हे त्यांना ठाऊक होते. म्हणून सर्व सरदारांनी जबरदस्तीने महाराणा प्रतापांना हात जोडून साकडे घातले की "राणाजी, आज जर तुम्ही या युद्धातून सुखरूप गेला नाहीत तर आम्ही न लढताच आमचा शिरच्छेद करून घेऊ. तुमचं जगणं या मेवाड साठीचन्हवे तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी आवश्यक आहे तर कृपा करून युद्धभूमीतून आपण निघावं, इथून पूढ़चा मोर्चा आम्ही भक्कमपणे सांभाळू. आतापर्यंत महाराणाच्या जखमांमधुनही खूप रक्तस्त्राव झाला होता, या परीस्थितिमध्ये महाराणा प्रताप यांचं मेवाडमुकुट त्यांच्या एक सरदाराने घेतलं, ज्यांना आपन महाराणा प्रतापांच दुसरं प्रतीरूपही म्हणू शकतो, त्यांचं नाव झाला मानसिंग (दिसण्यात दुसरे महाराणा) त्यांनी महाराणा प्रतापांच मेवाडमुकुट स्वतः परिधान करून म्हणाले, आज तरी एकदिवस महाराणा मला बनू द्या आणि या मोगलांच्या रक्ताने माझ्या तलवारी ची तहान भागवूद्या, राणाजी महाराणा म्हणून जन्मलो नसेल तर आज महाराणा म्हणून मरेल याहून मोठी गोष्ट तुमच्या या सेवकाची अजुन काय असेल! असे म्हणून सर्व सरदारांनी महाराणा प्रतापणा युद्ध भूमीतून पाठवून दिले.

इथे वाढती मुघल सेनेला वाटलं की झाला मानसिंगच महाराणा आहेत, व युद्ध नियमांचे सर्व नियम डावलुन मोघलांनी चहुबाजूने त्यांच्यावर हल्ला चढ़वला, यात या वीर योध्याने महाराणा प्रतापांसाठी लढता लढता वीरमरण प्राप्त केले. आणि तिथे चेतक महाराणा प्रतापांना घेऊन जात असताना एक मोठी दरी त्याच्या समोर आली, तरीही तो डगमगला नाही व आपल्या घायाळ स्वामीला घेऊन 28 फूट दरीच्या उंचीवरून चेतक ने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजूला घेऊन महाराणा प्रतापांना सुखरूप पोहचवले व ताण बसल्यामुळे वीर स्वामी भक्त चेतकचाही मृत्यू झाला. महाराणा आयुष्यात कधी रडले होते तर चेतकच्या मृत्यूलाच. तिथे युद्ध संपूर्ण संपलं मानसिंग पळून काशीला १ महिना लपून बसला की आता जर दिल्लीच्या दरबारात गेलो आणि अकबरला सांगितलं की महाराणाला हरवू काय तर पकडूही शकलो नाही तर तो क्रूरकर्मा मृत्यूदंड देईल. पुढ़े ही खबर जेव्हा अकबरला कळाली की महाराणा ला घाबरून, हल्दीघाटीतुन मानसिंग पळून आला आणि महाराणा प्रताप यांना ही कोणी पकडले नाही तेव्हा अकबर मानसिंगचा दरबार प्रवेश काही महिने निषेध केला. आणि बाकी सेनापतीच्या जहागिऱ्याही काढून घेतल्या.

मेवाडचा विजय

बंगाल आणि बिहारमधील बंडखोरी आणि मिर्झा हकीम याने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर १५७९ नंतर मेवाडवरील मोगलांचा दबाव कमी झाला. १५८२ मध्ये, महाराणा प्रतापने दिवेर येथे मुघल चौकींवर हल्ला चढवला आणि ती ताब्यात घेतली. यामुळे मेवाडमधील मोगल सैन्याच्या सर्व ३६ चौक्या ताब्यात आल्या. या पराभवानंतर अकबरने मेवाडविरुद्धची सैन्य मोहीम थांबवली. दिवेरचा विजय हा प्रतापसाठी एक मुख्य अभिमानाचा विषय होता. इतिहासकार जेम्स टॉडने "मेवाडचे मॅरेथॉन" असे वर्णन केले आहे. १५८७ मध्ये अकबर लाहोरला गेला आणि वायव्येकडील परिस्थिती बघून पुढील बारा वर्षे तिथेच राहिले. या काळात कोणतीही मोठी मोगल मोहीम मेवाडला पाठविली गेली नव्हती. परिस्थितीचा फायदा घेत प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर आणि गोगुंडासह पश्चिम मेवाड ताब्यात घेतले. या काळात त्यांनी आधुनिक डुंगरपूरजवळ चावंड ही नवीन राजधानीदेखील बांधली.

संदर्भ

Tags:

महाराणा प्रताप कूळमहाराणा प्रताप जन्म आणि बालपणमहाराणा प्रताप जीवनमहाराणा प्रताप संदर्भमहाराणा प्रतापइ.स. १५४०इ.स. १५९७मुघलमेवाडशिवाजी महाराज१९ जानेवारी९ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भीमराव यशवंत आंबेडकरमोबाईल फोनजय श्री रामअन्नप्राशनकृष्णशिरूर लोकसभा मतदारसंघसंजू सॅमसनमहात्मा गांधीमराठासोलापूर लोकसभा मतदारसंघकेळविठ्ठल रामजी शिंदेभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभारतीय आडनावेतुळजाभवानी मंदिरअकोला लोकसभा मतदारसंघकाळभैरवमुंजबैलगाडा शर्यतभारतीय संविधानाचे कलम ३७०राजरत्न आंबेडकररावेर लोकसभा मतदारसंघवासुदेव बळवंत फडकेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीक्रिकेटचे नियमए.पी.जे. अब्दुल कलामविधान परिषदसंगणकाचा इतिहासप्रल्हाद केशव अत्रेजलप्रदूषणव्हॉट्सॲपव्यंजनरामसर परिषदशरीफजीराजे भोसलेहॉकीहनुमान चालीसानवरत्‍नेओमराजे निंबाळकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबडनेरा विधानसभा मतदारसंघरामोशीनेट (परीक्षा)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपुन्हा कर्तव्य आहेदशरथपांडुरंग सदाशिव सानेगूगलपौगंडावस्थासंस्कृतीनृत्यप्रेमानंद गज्वीमहेंद्र सिंह धोनीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थनागरी सेवामाहितीवडझाडग्रामपंचायतन्यूटनचे गतीचे नियमकापूसपाणीजलसिंचन पद्धतीबाराखडीदौलताबाद किल्लालोकसभावाक्यमहाबलीपुरम लेणीसिंधुदुर्गफुटबॉलइंडियन प्रीमियर लीगसोलापूरमहाराष्ट्र पोलीसमुरूड-जंजिराक्रियापद🡆 More