बीबीसी

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे.

केवळ इंग्लंड मध्ये या संस्थेचे सुमारे २८,५०० कर्मचारी आहेत व वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ८०० कोटी डॉलर इतकी आहे.

बीबीसी ही पहिली राष्ट्रीय प्रसारण संस्था आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड या नावाने १८ ऑक्टोबर १९२२ मध्ये स्थापित झाल्यानंतर १९२७ मध्ये ही संस्था सार्वजनिक बनली. ही संस्था अनेक मनोरंजन आणि माहितीपर कार्यक्रम निर्मित करते, जे सर्व जगभरात दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन), आकाशवाणी आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित केले जातात. "माहिती, शिक्षण आणि मनोरंजन पुरवणे" हे या संस्थेचे ध्येय (संसदेने बीबीसी सनदेत (चार्टर) नमूद केल्यानुसार) असून "Nation Shall Speak Peace Unto Nation" हे बोधवाक्य आहे.बीबीसी ही अंशतः स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे. ही संस्था बीबीसी ट्रस्ट द्वारे चालवण्यात येते व सनदेनुसार ही संस्था ’राजकीय आणि आर्थिक प्रभावापासून मुक्त असणे आणि केवळ दर्शक आणि श्रोते यांना उत्तरदायी असणे ’ अपेक्षित आहे.

प्रौढ ब्रिटिश श्रोते अनेकदा बीबीसीचा उल्लेख 'बीब' (the Beeb) म्हणून करतात. हे टोपणनाव प्रथम पीटर सेलर ने गून शोज (Goon Show)च्या दिवसांमध्ये दिले, जेव्हा त्याने बीबीसीचा उल्लेख ’बीब बीब सीब’ (Beeb Beeb Ceeb) असा केला. अजून एक टोपणनाव जे आजकाल कमी वापरण्यात येते ते म्हणजे ’आन्टी’ (Aunty), जे बहुदा सुरुवातीच्या काळातील लहान मुलांचे कार्यक्रम प्रसारित करण्याऱ्या ’आन्टी’ आणि ’अंकल’ वरून आले असावे. काही लोक दोन्ही टोपणनावे एकत्र करून बीबीसीचा उल्लेख ’आंन्टी बीब’ असा करतात.

बीबीसी
ब्रीदवाक्य "Nation Shall Speak Peace Unto Nation"
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र प्रसारक
स्थापना १९२७
संस्थापक जॉन रेथ
मुख्यालय इंग्लंड
कर्मचारी २८,५००
संकेतस्थळ बीबीसीची अधिकृत वेबसाईट

बाह्य दुवे

बीबीसी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

आकाशवाणीइंग्लंडऑक्टोबर महिनाकोटीडॉलरदूरचित्रवाणीब्रिटिशमनोरंजनमहाजालमाहिती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी साहित्यजिंतूर विधानसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघमेरी आँत्वानेतमहाराष्ट्राचा इतिहासविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीराजकारणभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हवृषभ रासश्रीपाद वल्लभसांगली विधानसभा मतदारसंघसप्तशृंगी देवीधनंजय मुंडेस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्रामधील जिल्हेगावप्रेमविशेषणकेळअकोला लोकसभा मतदारसंघज्यां-जाक रूसोमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमहिलांसाठीचे कायदेगुकेश डीजगातील देशांची यादीॐ नमः शिवायभारूडभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीकार्ल मार्क्सकान्होजी आंग्रेगोंडचोखामेळासंख्याबडनेरा विधानसभा मतदारसंघमराठी संतवसंतराव दादा पाटीलमुरूड-जंजिराआद्य शंकराचार्यचांदिवली विधानसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघमानवी हक्कपुणे जिल्हातणावमासिक पाळीसकाळ (वृत्तपत्र)कबड्डीगोवरबिरजू महाराजश्रीधर स्वामीमहाराष्ट्र विधानसभाअरिजीत सिंगनितीन गडकरीसूर्यनमस्कार२०१९ लोकसभा निवडणुकासंदिपान भुमरेनरसोबाची वाडीदिल्ली कॅपिटल्स२०२४ मधील भारतातील निवडणुकान्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागबसवेश्वरलता मंगेशकरधर्मनिरपेक्षताअंकिती बोसशेतीपंचायत समितीबुलढाणा जिल्हाव्यापार चक्रसिंधुताई सपकाळविजयसिंह मोहिते-पाटीलशाळामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीउंबरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गुळवेलहिंदू धर्म२०२४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजया किशोरी🡆 More