बर्लिन: जर्मनी देशाची राजधानी

बर्लिन (जर्मन: Berlin) ही जर्मनी देशाची राजधानी व १६ राज्यांपैकी एक राज्य आहे.

सुमारे ३४.७ लाख लोकसंख्या असलेले बर्लिन हे जर्मनीमधील सर्वात मोठे शहर आहे. बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्य भागात वसले असून ते बर्लिन-ब्रांडेनबुर्ग ह्या युरोपातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचे केंद्र आहे.

बर्लिन
Berlin
जर्मनी देशाची राजधानी

बर्लिन: शहररचना, इतिहास, भूगोल
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने: शार्लटनबुर्ग राजवाडा, फर्नसेहटुर्म बर्लिन, राइशस्टाग, बर्लिन कॅथेड्रल, राष्ट्रीय गॅलरी, पोट्सडामर प्लाट्झ व ब्रांडेनबुर्ग फाटक
बर्लिन: शहररचना, इतिहास, भूगोल
ध्वज
बर्लिन: शहररचना, इतिहास, भूगोल
चिन्ह
बर्लिन is located in जर्मनी
बर्लिन
बर्लिन
बर्लिनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 52°30′2″N 13°23′56″E / 52.50056°N 13.39889°E / 52.50056; 13.39889

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बर्लिन
स्थापना वर्ष अं. इ.स. ११९२
महापौर क्लाउस वोवेराइट
क्षेत्रफळ ८९१.८ चौ. किमी (३४४.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११२ फूट (३४ मी)
लोकसंख्या  (३० एप्रिल २०११)
  - शहर ३४,७१,७५६
  - घनता ३,८६९.४ /चौ. किमी (१०,०२२ /चौ. मैल)
  - महानगर ४४,२९,८४७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
berlin.de

१२व्या शतकाच्या सुमारास स्थापन झालेल्या बर्लिनला युरोपाच्या इतिहासात विशेष स्थान आहे. आजवर बर्लिन ही प्रशियाच्या राजंत्राची (१७०१ - १९१८), जर्मन साम्राज्याची (१८७१ - १९१८), वाइमार प्रजासत्ताकाची (१९१९ - १९३३), नाझी जर्मनीची (१९३३ - १९४५) व आजच्या जर्मनी देशाची (१९९० - चालू) राजधानी राहिलेली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर बर्लिन शहराचे दोन तुकडे करण्यात आले. पूर्व बर्लिन हे पूर्व जर्मनीच्या राजधानीचे शहर तर पश्चिम बर्लिन हे पश्चिम जर्मनीच्या अधिपत्याखालील शहर हे दोन तुकडे बर्लिनच्या भिंतीने वेगळे करण्यात आले. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिनची भिंत पाडून टाकण्यात आली व बर्लिन शहर पुन्हा एकदा एकसंध झाले.

एक जागतिक शहर असलेले बर्लिन हे राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या युरोपामधील एक प्रमुख शहर आहे.

शहररचना

दुसऱ्या महायुद्धामध्ये बरेचसे बेचिराख झालेले शहर १९५० व १९६० च्या दशकांमध्ये नव्याने बांधण्यात आले. ऐतिहासिक काळापासून अनेक राजवटींचे मुख्य शहर असल्यामुळे बर्लिनमध्ये विविध कलाप्रकाराच्या इमारती आहेत.

इतिहास

बाराव्या शतकामध्ये स्थापन झालेले बर्लिन हे हान्से ह्या संघामधील एक प्रमुख शहर होते. इ.स. १७०१ मध्ये प्रशियाच्या राजतंत्राच्या निर्माणानंतर बर्लिन हे राजधानीचे शहर बनले.

भूगोल

बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्या भागात पोलंड देशाच्या सीमेच्या ८५ किमी पश्चिमेला स्प्री नदीच्या काठांवर वसले आहे. ब्रांडेनबुर्ग राज्याने बर्लिनला सर्व बाजूंनी वेढून टाकले आहे.

हवामान

बर्लिन शहरामधील हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे.

बर्लिन साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 15.0
(59)
17.0
(62.6)
23.0
(73.4)
27.0
(80.6)
33.0
(91.4)
36.0
(96.8)
37.8
(100)
35.0
(95)
32.0
(89.6)
25.0
(77)
18.0
(64.4)
15.0
(59)
37.8
(100)
सरासरी कमाल °से (°फॅ) 2.9
(37.2)
4.2
(39.6)
8.5
(47.3)
13.2
(55.8)
18.9
(66)
21.6
(70.9)
23.7
(74.7)
23.6
(74.5)
18.8
(65.8)
13.4
(56.1)
7.1
(44.8)
4.4
(39.9)
13.4
(56.1)
दैनंदिन °से (°फॅ) 0.5
(32.9)
1.4
(34.5)
4.9
(40.8)
8.7
(47.7)
14.0
(57.2)
17.0
(62.6)
19.0
(66.2)
18.9
(66)
14.7
(58.5)
9.9
(49.8)
4.7
(40.5)
2.0
(35.6)
9.6
(49.3)
सरासरी किमान °से (°फॅ) −1.9
(28.6)
−1.5
(29.3)
1.3
(34.3)
4.2
(39.6)
9.0
(48.2)
12.3
(54.1)
14.3
(57.7)
14.1
(57.4)
10.6
(51.1)
6.4
(43.5)
2.2
(36)
−0.4
(31.3)
5.9
(42.6)
विक्रमी किमान °से (°फॅ) −21.0
(−5.8)
−14.0
(6.8)
−13.0
(8.6)
−4.0
(24.8)
−1.0
(30.2)
4.0
(39.2)
7.0
(44.6)
7.0
(44.6)
0.0
(32)
−7.0
(19.4)
−9.0
(15.8)
−17.0
(1.4)
−21.0
(−5.8)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 42
(1.65)
33
(1.3)
41
(1.61)
37
(1.46)
54
(2.13)
69
(2.72)
56
(2.2)
58
(2.28)
45
(1.77)
37
(1.46)
44
(1.73)
55
(2.17)
571
(22.48)
सरासरी पावसाळी दिवस 10.0 8.0 9.1 7.8 8.9 9.8 8.4 7.9 7.8 7.6 9.6 11.4 106.3
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 46.5 73.5 120.9 159.0 220.1 222.0 217.0 210.8 156.0 111.6 51.0 37.2 १,६२५.६
स्रोत #1: विश्व हवामान संस्था (संयुक्त राष्ट्रे)
स्रोत #2: HKO

वाहतूक

विमानवाहतूक

बर्लिनमध्ये दोन मोठे विमानतळ आहेत. टेगेल विमानतळ शहराच्या सीमेत असून शोनेफेल्ड विमानतळ शहराबाहेर ब्रांडेनबुर्ग राज्यात आहे. लुफ्तांसा, युरोविंग्ज आणि एर बर्लिन टेगेल विमानतळाचा तर जर्मनविंग्ज, ईझीजेट आणि रायनएर या कंपन्या शोनेफेल्ड विमानतळाचा वापर करतात.

शोनेफेल्ड विमानतळाला लागून बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ हा नवीन विमानतळ २०१७ च्या शेवटापर्यंत बांधून तयार होईल. त्यानंतर टेगेल विमानतळ बंद करण्यात येईल.

रेल्वे

रस्ते

सार्वजनिक वाहतूक

डॉइच बाह्न आणि बर्लिनेर वेरकेरबिट्रीब बर्लिन महानगरात पाच प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक प्रणाली चालवतात.

प्रणाली स्थानके / मार्गिका / एकूण लांबी वार्षिक प्रवासी नोंदी
एस-बाह्न १६६/१५/३२७ किमी ४१,७०,००,०००(२०१५) डॉइच बाह्न/जमिनीच्या वरून चालणारी द्रुतगती रेल्वे. उपनगरांतून स्थानके.
यू-बाह्न १७३/१०/१४६ किमी ५०,७०,००,०००(२०१२) बीव्हीजी/२४ तास सुरू असणारी भुयारी रेल्वे
ट्रॅम ४०४/२२/१८९ किमी १८,१०,००,०००(२०१४) बीव्हीजी/शहराच्या पूर्व भागात
बस ३,२२७/१५१/१,६२६ किमी ४०,५०,००,०००(२०१४) बीव्हीजी/शहरभर सगळीकडे सेवा/६२ रात्रीचे मार्ग
फेरी ५ मार्गिका बीव्हीजी/इतर मार्गिकांवरील तिकिट येथे चालते

कला

खेळ

बर्लिन: शहररचना, इतिहास, भूगोल 
येथील ऑलिंपिक स्टेडियममध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील अंतिम सामना खेळवण्यात आले होते.

१९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे बर्लिन हे यजमान शहर होते. तसेच २००६ फिफा विश्वचषक अंतिम सामना येथे खेळवला गेला होता. फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून फुसबॉल-बुंडेसलीगामध्ये खेळणारा हेर्था बे.एस.से. हा बर्लिनमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.

शिक्षण

जुळी शहरे

जगातील १७ शहरे बर्लिनची अधिकृत जुळी शहरे आहेत.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

बर्लिन: शहररचना, इतिहास, भूगोल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बर्लिन शहररचनाबर्लिन इतिहासबर्लिन भूगोलबर्लिन वाहतूकबर्लिन कलाबर्लिन खेळबर्लिन शिक्षणबर्लिन जुळी शहरेबर्लिन संदर्भबर्लिन हे सुद्धा पहाबर्लिन बाह्य दुवेबर्लिनजर्मन भाषाजर्मनीजर्मनीची राज्येब्रांडेनबुर्गयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हृदयभारतीय जनता पक्षपुणे करारउंबरएकनाथ शिंदेसुनील नारायणमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीअमरावतीमुख्यमंत्रीगुळवेलपाटीलमहात्मा फुलेशनिवार वाडावेदगहूइतर मागास वर्गपटकथासंगम साहित्यगाडगे महाराजदूधकोहळामाळीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीगोंधळभाषालंकारप्रणिती शिंदेसांगोला विधानसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येप्रल्हाद केशव अत्रेसेंद्रिय शेतीनामईमेलसिंहगडब्राझीलराज ठाकरेक्षय रोगपुरंदरचा तहऋतुराज गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपृथ्वीच्या अंतरंगाची रचनामहाराष्ट्र पोलीसवंजारीखंडोबाइ-बँकिंगभारताची संविधान सभारॉयल चॅलेंजर्स बंगलोरभीमराव यशवंत आंबेडकरशिल्पकलाभौगोलिक माहिती प्रणाली२०२४ मधील भारतातील निवडणुकामूळ संख्यामहाराष्ट्राचे राज्यपालभारतीय रिझर्व बँकअष्टविनायकमुंजजया किशोरीबिबट्याराम गणेश गडकरीमैदान (हिंदी चित्रपट)न्यूटनचे गतीचे नियमपोलीस पाटीलचेतासंस्थामूळव्याधदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघनाटकाचे घटककवितापृथ्वीचे वातावरणसाईबाबापाणीसंभाजी भोसलेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसुतकवृषभ रासकुणबीसप्त चिरंजीवबुद्धिबळपारनेर विधानसभा मतदारसंघ🡆 More