आर्मेनिया

आर्मेनिया (अधिकृत नाव: आर्मेनियन: Հայաստանի Հանրապետություն) हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे.

या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराणअझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोपपश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.

आर्मेनिया
Հայաստանի Հանրապետություն
हायास्तानी हान्रापेतुत्यून
आर्मेनियाचे प्रजासत्ताक
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: मेक आझ्ग, मेक मशकौईत (अर्थ: एक राष्ट्र, एक संस्कृती)
राष्ट्रगीत: Մեր Հայրենիք (मेर हायरेनिक) (अर्थ: आपली पितृभू)
आर्मेनियाचे स्थान
आर्मेनियाचे स्थान
आर्मेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
येरेव्हान
अधिकृत भाषा आर्मेनियन
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख सेर्झ सर्गस्यान
 - पंतप्रधान होविक अब्राहम्यान
महत्त्वपूर्ण घटना
 - ऐतिहासिक तारीख ११ ऑगस्ट इ.स. पूर्व २४९२ 
 - नैरी इ.स. पूर्व १२०० 
 - आर्मेनियाचे राजतंत्र इ.स. पूर्व १९० 
 - आर्मेनियाचे लोकशाही प्रजासत्ताक २८ मे १९१८ 
 - आर्मेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य २ डिसेंबर १९२० 
 - स्वातंत्र्य
सोव्हिएत संघापासून
घोषणा
मान्यता
पूर्णत्व


२३ ऑगस्ट १९९०
२१ सप्टेंबर १९९१
२१ डिसेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण २९,७४३ किमी (१४१वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.७१
लोकसंख्या
 -एकूण ३२,६२,२०० (१३४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०८.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.६४९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,८३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२९ () (८७ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन आर्मेनियन द्राम
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +४/+५
आय.एस.ओ. ३१६६-१ AM
आंतरजाल प्रत्यय .am
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३७४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

२९,८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या देशाची लोकसंख्या ३० लाख आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून येथील साक्षरता ९९ टक्के आहे. येरेवान ही या देशाची राजधानी आहे.

भूतपूर्व सोव्हिएत संघापैकी एक घटक प्रजासत्ताक असलेला आर्मेनिया आता बहुपक्षीय लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे. आर्मेनियाला प्राचीन सांस्कृतिक व राजकीय वारसादेखील लाभला आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला (सर्वसाधारण मान्यतेनुसार इ.स. ३०१) आर्मेनियाचे राज्य हे या ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे या परिसरातील पहिले राज्य होते. आजही आर्मेनियातील बहुसंख्य जनता ख्रिश्चन धर्मीय असली तरीही आर्मेनियाचे प्रजासत्ताक घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या देशाला १९९१ साली रशिया कडून स्वातंत्र्य मिळाले. हे एक डोंगराळ राष्ट्र असून येथील जमीन अतिशय सुपीक आहे. बटाटे, अाॅलिव्ह, द्राक्ष, कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

आर्मेनियाचे स्थानिक भाषेतील नाव हय्क आहे. मध्ययुगात याला हयस्तान असे नाव होते. हय्क हा आर्मेनियन लोकांचा मूळ पुरुष मानला जातो. त्याच्या नावावरून त्या देशाला हयस्तान हे नाव मिळाले. कोरेनच्या मोझेसनुसार हय्कने बाबिलोनियाचा राजा बेल ह्याला ख्रिस्तपूर्व २४९२ मध्ये युद्धात हरवले व अरारात ह्या भूभागावर आपले राज्य स्थापन केले.

प्राचीन फारसी कोरीव लेखात (इ.स.पू. ५१५) आर्मेनियाचा उल्लेख आर्मिना असा आढळतो. झेनोफोन या ग्रीकांच्या सेनापतीने आर्मेनियन लोकजीवन व आदरातिथ्याबद्दल लिहून ठेवले आहे. त्याच्या नोंदीनुसार आर्मेनियन लोक फारसीसदृश्य भाषा बोलतात.

राजकीय विभाग

आर्मेनिया दहा प्रांतात (आर्मेनियन भाषेत "मार्झर"एकवचन "मार्झ") विभागला गेला असून येरेवान ह्या शहराला (आर्मेनियन कघाक)राजधानी म्हणून विशेष प्रशासकीय दर्जा देण्यात आला आहे. रत्येक प्रांताचा मुख्य कार्यकारी अधिकारी (मार्झपत) हा आर्मेनिया सरकारकडून नियुक्त केला जातो. येरेवानचा मुख्य कार्यकारी अधिकारी महापौर असून त्याची नेमणूक राष्ट्राध्यक्षांकडून केली जाते.

प्रत्येक प्रांतात स्वयंशासित असे विभाग (आर्मेनियन हमान्क्नेर/एकवचन हमान्क) येतात.प्रत्येक विभागात नागरी किंवा ग्रामीण वस्त्या असतात.२००७ मधील नोंदींनुसार आर्मेनियात ४९ नागरी भाग असून ८६६ ग्रामीण भाग आहेत. येरेवान या राजधानीच्या शहराचे १२ स्वायत्त विभाग आहेत.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

आर्मेनिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आर्मेनिया इतिहासआर्मेनिया समाजव्यवस्थाआर्मेनिया राजकारणआर्मेनिया अर्थतंत्रआर्मेनिया खेळआर्मेनिया संदर्भआर्मेनिया बाह्य दुवेआर्मेनियाअझरबैजानआर्मेनियन भाषाइराणउत्तर दिशाकाळा समुद्रकॅस्पियन समुद्रकॉकेशसजॉर्जियातुर्कस्तानदक्षिणदक्षिण दिशापश्चिम आशियापश्चिम दिशापूर्व दिशापूर्व युरोपभूपरिवेष्टित देशयुरेशियायुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रपु.ल. देशपांडेभारताचे संविधानमुखपृष्ठआर्थिक विकासरायगड लोकसभा मतदारसंघसोळा संस्कारइंदिरा गांधीसंभोगअष्टांगिक मार्गटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीलोकगीतसात आसराकरवंदचिन्मय मांडलेकरमहाराष्ट्र भूषण पुरस्कारभारतीय निवडणूक आयोगतानाजी मालुसरेसातारा लोकसभा मतदारसंघजागतिक बँकहिंदू धर्मातील अंतिम विधीकोळी समाजबलुतं (पुस्तक)भारतीय संस्कृतीकथकमहाराष्ट्रातील राजकारणलॉर्ड डलहौसीप्राणायामरायगड (किल्ला)कोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघभारताचा भूगोलहिंदू कोड बिलबहिष्कृत भारतमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभीमराव यशवंत आंबेडकरहवामानाचा अंदाजपंचांगगुंतवणूकइतिहासमहिलांसाठीचे कायदेराज्य निवडणूक आयोगआंबापश्चिम दिशासाताराकर्ण (महाभारत)अर्जुन पुरस्कारवेदभारतातील सण व उत्सवबीड लोकसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातभारताची संविधान सभालोकमतदारिद्र्यॐ नमः शिवायमावळ लोकसभा मतदारसंघगोवामराठी संतमाढा विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेरक्षा खडसेक्रिकेटचे नियमशाश्वत विकासटरबूजबँकपोलीस पाटीलफकिरागर्भाशयमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेजनहित याचिकासमाजशास्त्रप्राण्यांचे आवाजभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७निलेश लंकेप्रेमानंद गज्वीतमाशालखनौ करारखडकवासला विधानसभा मतदारसंघसंगणक विज्ञान🡆 More