सरकार

सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे.

प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.

प्रागैतिहासिक ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाही अल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.

जगातील देश

सरकार 
सरकार प्रकारांप्रमाणे जगतील देश.
  अध्यक्षीय प्रजासत्ताक
  अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
  संसदीय प्रजासत्ताक
  संसदीय प्रजासत्ताक जेथे संसदेद्वारे राष्ट्राध्यक्ष निवडला जातो.
  संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय प्रजासत्ताक जेथे राजा/राणीला औपचारिक अधिकार आहेत.
  संविधानिक एकाधिकारशाही जेथे राजा/राणीला प्रमुख अधिकार आहेत व संसद दुबळी आहे.
  संपूर्ण एकाधिकारशाही
  एकपक्षीय सरकार
  संविधानिक सरकार बरखास्त झाले आहे.
सरकार 
निळ्या रंगाने दर्शवलेल्या देशांमध्ये लोकशाही निवडणुकीद्वारे सरकार स्थापन केले जाते.

सरकार प्रकार

अध्यक्षीय प्रजासत्ताक

येथे राष्ट्राध्यक्ष सरकारचा कार्यशील भाग व सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख असतो:

संपूर्ण अध्यक्षीय पद्धत

राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख असतो.

अध्यक्षीय सरकारे
अध्यक्षीय सरकारे जेथे पंतप्रधान अस्तित्वात आहे.

अर्ध-अध्यक्षीय प्रकार

येथे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान दोघांनाही संविधानिक अधिकार असतात. राष्ट्राध्यक्ष हा सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख तर पंतप्रधान हा सरकारप्रमुख असतो.

संसदीय प्रजासत्ताक

येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो. ह्या प्रकारामध्ये राष्ट्राध्यक्षाला केवळ औपचारिक संविधानिक अधिकार असतात व त्याचे महत्त्व केवळ नाममात्र असते.

मिश्र प्रजासत्ताक प्रकार

राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख एकत्रितपणे निवडला जातो. परंतु तो संसदेला उत्तरदायी नाही.

संचालक पद्धत

संचालक पद्धतीमध्ये कार्यकारिणी समितीकडे प्रशासकीय अधिकार असतात. ही समिती संसदेद्वारे निवडली जाते.

संविधानिक एकाधिकारशाही

ह्या पद्धतीत राष्ट्रप्रमुख हा राजा किंवा राणीच्या स्वरूपात असतो. त्यांचे अधिकार संविधानिक कायद्याने आखून दिले आहेत.

संविधानिक एकाधिकारशाही व औपचारिक एकाधिकार

येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो. राष्ट्रप्रमुखाचे स्थान राजा/राणीकडे असते व ज्यांना केवळ औपचारिक अधिकार असतात.

संविधानिक एकाधिकारशाही व कार्यशील राजा/राणी

पंतप्रधान सरकारप्रमुख असला तरीही राजा/राणीला महत्त्वाचे राजकीय अधिकार आहेत.

संपूर्ण एकाधिकारशाही

येथील राजा/राणीची देशावर संपूर्ण पकड असून ते संविधानिक कायद्याला बांधील नाहीत.

धर्मशाही

देश जेथे राष्ट्रप्रमुख धर्मावर आधारित वर्गीकरणाद्वारे निवडला जातो..

एक राजकीय पक्षाची सत्ता

येथे केवळ एकच राजकीय पक्ष अस्तित्वात असून संविधानाने ह्या पक्षाला संपूर्ण अधिकार दिले आहेत.

लष्करी राजवट

येथे देशाची सत्ता लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात असते.

परिवर्तनीय

देश जेथे सत्तापरिवर्तन होत आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी

Tags:

सरकार जगातील देशसरकार प्रकारसरकार संदर्भसरकार हे सुद्धा पहासरकारभारत सरकारमहाराष्ट्र शासन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सांगोला विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगईमेलपुन्हा कर्तव्य आहेसाताराभौगोलिक माहिती प्रणालीदिवाळीसांगली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिनजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कादंबरीवर्धा लोकसभा मतदारसंघबुद्धिबळभूतलातूर लोकसभा मतदारसंघभारूडसिंधुताई सपकाळराज्यपालभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेगडचिरोली जिल्हाभारताची जनगणना २०११संत जनाबाईभारताचे संविधानराम सातपुतेमराठी व्याकरणनिबंधभरड धान्यखडकवासला विधानसभा मतदारसंघमाळशिरस विधानसभा मतदारसंघउन्हाळारामटेक विधानसभा मतदारसंघसुतकवर्णमालापर्यावरणशास्त्रसम्राट अशोक जयंतीकावळाभारतातील सण व उत्सवकोल्हापूर जिल्हासंघम काळमांगी–तुंगीकाळाराम मंदिर सत्याग्रहगोदावरी नदीपुणेपरभणी जिल्हाअक्षय्य तृतीयासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेग्रंथालयहृदयस्वादुपिंडदशावतारवातावरणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीगोपाळ कृष्ण गोखलेकुटुंबनियोजनप्राजक्ता माळीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीबसवेश्वरगुरुत्वाकर्षणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमझी मराठीसोलापूर लोकसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघपृथ्वीच्या अंतरंगाची रचनापश्चिम दिशाआंबेडकर जयंतीमहेंद्र सिंह धोनीमहाड सत्याग्रहभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेप्राण्यांचे आवाजसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)माद्रीअहवालबाळ ठाकरेअशोकाचे शिलालेखसात बाराचा उतारागर्भाशय🡆 More