बँक

अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.

अधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असीरियन, सुमेरियन, चिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे.

इतिहास

असीरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीत इ.स पूर्व २००० मध्ये मंदिराच्या साधकांनी व्यापाऱ्याना कर्जे दिल्याचे  उल्लेख आढळतात. या संस्कृतीमधल्या शिलालेख आणि मातीच्या छोट्या टॅब्लेट्सवर कोरलेल्या हम्मुराबी सांकेतिक भाषेत बँकिंगविषयक नियमांचा  उल्लेख आढळतो. बँकिंग इतिहासातील हा सर्वात जुना उल्लेख आहे. भारतात मौर्य काळात "आदेश" नावाचे कागदपत्र त्रयस्थ व्यक्तीला सावकाराने पैसे देण्यासाठी वापरले जात असते. हुंडी व्यवहाराचा हा भारतातील पहिला उल्लेख आहे.ग्रीक तसेच रोमन साम्राज्यात मंदिरात बसणारे सावकार पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे व्यवहार करत असत.

आधुनिक अधिकोषांची जडणघडण मुख्यत्वे इटलीमधील फ्लाॅरेन्स, जिनोआ, व्हेनिस या शहरांत झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील युरोपमध्ये बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोषांच्या शाखा अनेक शहरांत होत्या. १३९७साली उघडलेली जिओव्हानी मेडिची यांची मेडिची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्यूका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी लेखांकनाची पद्धत शोधून काढली.

१७७० साली सुरू झालेली 'बँक ऑफ हिंदुस्तान ' ही भारतातील पहिली बँक. १८२६ साली ही बँक बंद पडली. जून १८०६मधे कलकत्ता येथे सुरू झालेली बँक ऑफ कलकत्ता हिचे नाव बदलून १८०९ मध्ये बँक ऑफ बेंगाल ठेवले गेले. तत्कालीन ब्रिटीश सरकारने १८४० मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि १८४३ मध्ये बँक ऑफ मद्रास सुरू केल्या. १९२१ मध्ये या तिन्ही बँका एकत्र करून 'इम्पीरियल बँक ऑफ इंडिया ' बनवली गेली. १९५५मध्ये या बँकेचे नाव बदलून भारतीय स्टेट बँक केले गेले

सुविधा

अधिकोषांमध्ये विविध प्रकारच्या खालील सुविधा ग्राहकांना दिल्या जातात

१) बचत खाते

२) चालू खाते

३) रोख पत खाते

४) विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना

५) विविध प्रकारच्या कर्ज योजना

६) सुरक्षा जमा कक्ष

७) बँक हमी

८) पत पत्र व्यवहार

९) हुंडी व्यवहार

१०) विमा विक्री

११) परदेशात पैसे पाठवणे

१२) कर संकलन

१३) देय रकमांची वसुली (इंग्लिश : Bill Collection)

१४ ) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरण सुविधा

बँक या विषयावरची मराठी पुस्तके

  • इन्व्हेस्टमेन्ट प्लॅनिंग (अंकित गाला)
  • बँक गरिबाच्या दारात (मूळ इंग्रजी - बँकर टु द पुअर, लेखक - महंमद युनूस, मराठी अनुवाद - शरद पाटील)
  • बँकिंग आणि विमा (लेखक विनायक कुळकर्णी, सकाळ प्रकाशन)
  • भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
  • मला श्रीमंत व्हायचंय (वसुधा जोशी, माधवी प्रकाशन)
  • स्वेच्छानिवृत्ती व निवृत्तीचे नियोजन (गोपाल गलगली)
  • द प्रॉब्लम ऑफ द रूपी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)
बँक 
हम्मुराबीच्या मातीपासून बनलेल्या विटांवर व्याजाने दिलेल्या कर्जांचा उल्लेख आहे
बँक 
1970

बाह्य दुवे

Tags:

बँक इतिहासबँक सुविधाबँक या विषयावरची मराठी पुस्तकेबँक बाह्य दुवेबँकइंग्लिश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)हिंगोली विधानसभा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभरती व ओहोटीमराठवाडाजागतिक कामगार दिनभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीहोमी भाभाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीव्यंजनजागतिक तापमानवाढभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसंवादबखरविष्णुसहस्रनामहनुमान चालीसारमाबाई आंबेडकरफुटबॉलव्हॉट्सॲपधर्मनिरपेक्षताकुष्ठरोगमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीहृदयमलेरियामानवी हक्कमानसशास्त्ररेणुकानाचणीवृत्तपत्रअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्राचा इतिहासजागतिक लोकसंख्यामराठा घराणी व राज्येहिंगोली जिल्हाविष्णुबसवेश्वरअर्थ (भाषा)महाराष्ट्राची अर्थव्यवस्थापृथ्वीचे वातावरणतापी नदीतिरुपती बालाजीनाटकवर्षा गायकवाडचांदिवली विधानसभा मतदारसंघम्हणीमुखपृष्ठशिवाजी महाराजांची राजमुद्रास्वामी विवेकानंदकार्ल मार्क्सअजिंठा लेणीदहशतवाददक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारआर्थिक विकासमहाराष्ट्र शासनलावणीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाशिक्षणजळगाव जिल्हाहिरडारायगड लोकसभा मतदारसंघहवामान बदलवाक्यताम्हणहिंगोली लोकसभा मतदारसंघमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीसंदिपान भुमरेरत्‍नागिरीपुणेचाफाअशोक चव्हाणछत्रपती संभाजीनगरमातीभारतीय निवडणूक आयोगकडुलिंबगोपाळ गणेश आगरकरमराठा साम्राज्य🡆 More