सहारा

सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे.

उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्रॲटलास पर्वतरांग, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर दक्षिणेला साहेल पट्टा आहे. सहाराच्या उत्तरेस माघरेब हा भौगोलिक प्रदेश स्थित आहे.

सहारा
सहारा वाळवंटाचे नासाच्या उपग्रहाने टिपलेले चित्र
सहारा
सहाराचा पश्चिम लिब्यातील एक भाग

सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे. सहारा ह्या शब्दाचा अरबी भाषेमध्ये सर्वात भव्य वाळवंट असा अर्थ आहे.

प्राचीन काळी सहारा वाळवंट हे गवताळ होते. सहारा दर ४१००० वर्षांनी पृथ्वीच्या अक्षमुळे बदलते. पुढील बदल अजून १५००० वर्षांनी होणार आहे.

भूगोल

सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे आणि अनेक उत्तर आफ्रिकन देशांचे बहुतांश भाग हे या वाळवंटाने व्यापले आहेत. आफ्रिकेच्या ३१% भागावर सहारा वाळवंट आहे. सहाराच्या उत्तरेला भूमध्य समुद्र असून तिथे उष्ण उन्हाळा व हलक्या प्रमाणात पाऊस पडतो. सहाराच्या दक्षिणेला सहेल नावाचा कोरडी विषुववृतिय सवाना प्रदेश आहे. सहारा वाळवंटाचे अनेक विभाग आहेत. उदा. तानेझरुफ्त,तेणेरे, लिबीयन वाळवंट,पूर्व वाळवंट. नूबीयन वाळवंट.

हवामान

सहारा हे जगातील सर्वात मोठे कमी उंचीवरील वाळवंट आहे. वातावरणातील उष्णता व त्याची स्थिरता पावसाला निश्रप्रभ बनवते.त्यामुळे येथील हवामान उष्ण व कोरडे बनवते. सर्वाधिक उष्ण भाग हा पूर्वेकडील लीबियन वाळवंटामध्ये येतो. हा भाग अटकामा वाळवंटाएवढा उष्ण मानला जातो.

भाषा आणि संस्कृती

सहारा वाळवंटात अनेक भाषा बोलल्या जातात. अरबी भाषा सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. येथे अनेक संस्कृती व वंशाचे लोक वास्तव्य करतात. अरब लोक जवळ जवळ सगळ्या सहारात राहतात. बर्बर लोक पश्चिम इजिप्तपासून मोरोक्को पर्यंत तसेच तुआरेग भागात आढळतात. बेजा लोक लाल समुद्राजवळच्या टेकाड प्रदेशात राहतात.

देश

सहारा वाळवंटाने साधारणपणे खालील देश व्यापले आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

सहारा भूगोलसहारा हवामानसहारा भाषा आणि संस्कृतीसहारा देशसहारा हे सुद्धा पहासहारा संदर्भसहाराअटलांटिक महासागरउत्तर आफ्रिकाभूमध्य समुद्रमाघरेबलाल समुद्रवाळवंटॲटलास पर्वतरांग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेखडककोल्हापूरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीयोगभीमाशंकररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघतमाशामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)सायबर गुन्हानांदेड जिल्हासिंहगडबाबरजागतिक लोकसंख्यानिवडणूकनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघनामदेवशास्त्री सानपसंयुक्त महाराष्ट्र चळवळसुशीलकुमार शिंदेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९साम्राज्यवादमौर्य साम्राज्यभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकासारमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनफिरोज गांधीजलप्रदूषणझाडहृदयगजानन महाराजअजिंठा लेणीअतिसारभारतीय जनता पक्षमराठीतील बोलीभाषाऔंढा नागनाथ मंदिरवि.वा. शिरवाडकररमाबाई रानडेचलनवाढमराठा साम्राज्य२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील पर्यटनपद्मसिंह बाजीराव पाटीलसातव्या मुलीची सातवी मुलगीपसायदानस्त्री नसबंदी शस्त्रक्रियागगनगिरी महाराजसतरावी लोकसभान्यूटनचे गतीचे नियमकर्करोगफणसविवाहअध्यक्षस्त्री सक्षमीकरणजत विधानसभा मतदारसंघभारतहवामान बदलपरभणी विधानसभा मतदारसंघगंगाखेड विधानसभा मतदारसंघवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील घाट रस्तेजेजुरीकांजिण्याबखरमहानुभाव पंथराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)प्रीमियर लीगकरवंदएकविराअश्वत्थामाकुंभ रासमलेरियामुंजनवनीत राणाब्राझीलची राज्येवेदवर्धा विधानसभा मतदारसंघरयत शिक्षण संस्था🡆 More