प्रचालक (Administrator) अथवा प्रबंधक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामांसंबंधी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात.
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
विकिपीडियावर प्रचालक अधिकार अशा सदस्यांना मिळतात, जे काही काळ विकिपीडिया वर संपादन करीत आलेले आहेत, जे विकिपीडियाच्या कामासंबंधी माहितगार आहेत तसेच ज्यांना इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. असे प्रचालक पाने सुरक्षित अथवा असुरक्षित करू शकतात, तसेच काही सदस्यांना संपादन अधिकार नाकारू शकतात (Block user) तसेच ही सर्व कार्ये रद्द करू शकतात. प्रचालक अधिकार हे कायमस्वरूपी दिले जातात व अतिशय कमी वेळा हे परत घेतले जातात. प्रचालक स्वत:हून ही जास्तीची जबाबदारी सांभाळत असतात व ते विकिमीडिया फाऊंडेशनचे कर्मचारी नसतात.
विकिपीडियाच्या सुरवातीच्या दिवसांत, सर्व सदस्यांना प्रचालकाचे अधिकार दिले जात होते आणि आत्तासुद्धा ते तसेच असायला हवे होते. सुरवातीपासूनच असा विचार मांडण्यात आला होता की प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच असावेत. विकिपीडियाचा सर्वसाधारण निर्वाह हा कुणीही (अगदी नोंदणी न केलेला सदस्यसुद्धा) करू शकतो. फक्त अशा काही क्रिया ज्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास खूप त्रासदायक ठरू शकतात अशा क्रियांचे अधिकार हे प्रचालकांना दिले जातात. प्रचालकांना दिली जाणारी कार्ये ही तांत्रिक प्रकारची असल्याने कुठल्याही प्रकारे अधिकार देत नाहीत.
प्रचालक हे विकिपीडियाचे जुने संपादक असल्याने, नवीन सदस्यांना मदत करण्याचे काम त्यांच्यावर येऊन पडते. साधारणपणे प्रचालकांनी कुठल्याही चर्चेमध्ये (अथवा वादामध्ये) स्वत: तटस्थ राहून इतरांना मदत करणे अपेक्षित असते.
मराठी विकिपीडियावर १० प्रचालक आहेत. (प्रशासक विशेषाधिकारांसह खात्यांची पूर्ण सूची पहा)
विकी प्रणाली मध्ये काही विशिष्ट क्रिया अशा आहेत ज्या सर्वांना करता येत नाहीत. या मध्ये पाने वगळणे, पानांची सुरक्षा पातळी बदलणे, सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे अथवा देणे (ब्लॉक व अनब्लॉक) या क्रियांचा समावेश होतो. तसेच मिडियाविकिचे प्रणाली संदेश बदलणे व विशेष पृष्ठे संपादित करणे ह्या क्रियासुद्धा प्रचालकांनाच करता येतात.
प्रचालकांच्या सर्व कार्यांची यादी विकिपीडिया:प्रचालक/कामे इथे दिलेली आहे.
मराठी विकिपीडियावर प्रचालक बनणे ही मोठी गोष्ट नाही आहे. प्रचालकांनी इतर सदस्यांची मदत करणे तसेच विकिपीडियावर स्वच्छतेची (clean-up) कामे करणे अपेक्षित असते. विकिपीडियाची स्थापना करणारे जिमी वेल्स यांचे या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे आहेत.
“ | I just wanted to say that becoming a sysop is *not a big deal*. I think perhaps I'll go through semi-willy-nilly and make a bunch of people who have been around for awhile sysops. I want to dispel the aura of "authority" around the position. It's merely a technical matter that the powers given to sysops are not given out to everyone. I don't like that there's the apparent feeling here that being granted sysop status is a really special thing. - Jimbo Wales | ” |
प्रचालक बनण्यासाठी तुम्ही काही काळ विकिपीडियावर योगदान केलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रचालक बनू इच्छित असाल तर प्रचालकपदाची मागणी प्रचालकपदासाठी अर्ज इथे नोंदवू शकता. आपल्या मागणीवर इतर प्रचालक तसेच सदस्य आपआपले विचार तसेच कौल मांडतील. जर सर्वानुमते आपणांस प्रचालक पद द्यायचे निश्वित झाले तर एखादा प्रशासक आपणांस प्रचालक अधिकार देईल.
प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच आहेत. तरीसुद्धा काही विशिष्ट ठिकाणी प्रचालकांचे अनुकरण इतरांनी करावे अशी अपेक्षा असते. प्रचालकांनी उत्तम संपर्क साधणे आवश्यक असते.
प्रचालकांनी खालील गोष्टी टाळाव्यात:
खालील बाबींमध्ये विशेषत: प्रचालकांची मदत होऊ शकते.
जर एखाद्या सदस्याच्या असे निदर्शनास आले की एखाद्या प्रचालकाने त्याच्या पदाचा गैरवापर केलेला आहे, तर त्या सदस्याने ही गोष्ट त्या प्रचालकांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करावा. तरीही जर सहमती मिळाली नाही तर ही बाब प्रशासकांच्या नजरेत आणून द्यावी.
अधिकारांचा गैरवापर करणे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. प्रचालनाचे अधिकार हे फक्त काही आदरणीय सदस्यांनाच दिले जातात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर हा योग्य प्रकारे करणे अपेक्षित आहे.
काही बाबी ज्यामध्ये अधिकारांचा वापर टाळावा:
जर एखाद्या विशिष्ट बाबीमध्ये प्रचालकांचे अधिकार वापरावेत का नाही याची शंका आली तर दुसऱ्या प्रचालकाशी संपर्क करून त्याला ती कृती करण्यास सांगावे.
जर तुम्ही केलेली कृती दुसऱ्या प्रचालकांने रद्द केली तर चर्चा न करता ती कृती पुन्हा करणे कुठल्याही परिस्थितीत टाळावे. तसेच एखाद्या प्रचालकाने केलेली कृती रद्द करतानासुद्धा त्या प्रचालकाशी संपर्क करणे अपेक्षित आहे.
दुसऱ्या प्रचालकांनी केलेल्या क्रिया उलटविण्यासाठी खालील अपवाद आहेत.
जर प्रचालक अधिकारांचा गैरवापर केला तर प्रचालक पद रद्द होऊ शकते. प्रचालक पद रद्द करण्याचे अधिकार फक्त प्रतिपालकांनाच (इं:स्टिवर्ड्सला) असतात.
प्रचालक स्वत:हून आपले अधिकार काढून घेण्याची विनंती करू शकतात.
१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग एक(१) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.
२) असे दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वत:हून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना (प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.
३) कोणत्याही मराठी विकि(मिडिया) प्रकल्पावर कोणत्याही कारणाने प्रचालक संख्या भविष्यात फार घटली तरी किमान एक मराठी भाषी प्रचालक सदैव शिल्लक राहीलाच पाहीजे, नवीन प्रचालक नियुक्ती नंतर अथवा एखादा जुना प्रचालक वापस आल्या नंतरच अशा प्रकल्पावरचा प्रचालक दूर केला जाऊ शकेल.
४) सर्व निवृत्त प्रचालक/प्रशासक (कोणत्याही विशेषाधिकारा शिवाय,) निमंत्रित सदस्य समजले जातील आणि त्यांच्या मतांचा सुयोग्य आदर विकिपीडिया जाणत्या सदस्यांप्रमाणे राखला जाईल.
प्रचालकांनी आपले परवलीचे शब्द अतिशय गुप्त ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यांना एका संपादनात संपूर्ण संकेतस्थळावर परीणाम करता येऊ शकतो. याच कारणास्तव प्रचालकांनी आपले परवलीचे शब्द इतरांना सांगणे धोकादायक ठरू शकते.
सर्व प्रचालकांना एकदाच एकत्रितपणे साद घालण्यासाठी {{साद प्रचालक}} हा साचा वापरावा.
विकिपीडिया प्रचालकांच्यापुढे> विकिपीडिया प्रशासक व त्यापुढे> विकिपीडिया प्रतिपालक अशी पदावली असते.
This article uses material from the Wikipedia मराठी article विकिपीडिया:प्रचालक, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.