पहारा आणि गस्त
खरेतर विकिपीडियाचे सर्वांत अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे साहाय्य या गोष्टींत करतात. अर्थात हा पहारा, गस्त किंवा साहाय्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते.बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्याची सूचीत सम्मीलीत करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात.तर त्याही पेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चुका बरोबर करून अथवा परतवून वेळेचे योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषेतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पार करत इतर विविध प्रकल्पातही गस्त घालत मार्गक्रमण करतात.
गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंत करतात.
अनामिक सदस्यांची पाने तपासल्यानंतरची प्राथमिकता नवागत सदस्यांचे संपादन तपासण्याचे असते.
आपण एखाद्या विशीष्ट विषयातील वर्गीकृत पानातील बदलांवरसुद्धा लक्ष टेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्हाला या पानाशी संबंधित बदल विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया:पहारा_आणि_गस्त येथे पहावयास मिळतील अथवा विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/वर्ग:पहारा आणि गस्त येथे या वर्गातील सर्व लेखा संबंधित अलिकडील बदल तपासता येतात.
तसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात,
एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते. बरेच अनुभवी संपादक स्वयंचलीत सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्तसुद्धा देतात.
त्या शिवाय एखाद्या चूक शब्द योजनेचा शोधही शोधयंत्रातून घेऊन ज्या कोणत्या लेखात अशी चुकीची शब्द योजना आहे ती दुरूस्त करता येते.
लेखपानावर लावण्याकरिता {{लेखनऔचित्य}}
ह्या लेखात/हे पानात किंवा विभागात, प्रथम दर्शनी मराठी विकिपीडिया विश्वासार्हता लेखन संकेतास अनुसरून लेखन विषयक औचित्य पाळले न गेले असण्याची शक्यता आहे.हितसंबध अथवा हितसंघर्ष असलेल्या व्यक्तिने स्वतः अथवा इतरांकरवी व्यक्तिगत हितसंबंधाना जपणारे लेखन करवून घेतल्याची शंका आल्यास हा साचा लावला जातो. साचा केव्हापर्यंत काढूनये या बद्दल अत्यावश्यक सुचना आणि इतर सदस्यांना पहारा-गस्त सुधारणा विनंती स्वतःच्या हितसंबंधाशी संबधीत नसलेल्या, व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या इतर विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराचा वापर बद्दल माहिती असे का ? या संदेशाचा विस्तार आपल्या सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |
सदस्य चर्चा पानावर लावण्याकरिता {{हितसंघर्ष}}
श्री./श्रीमती. पहारा आणि गस्त, सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती असे का ? या संदेशाचा विस्तार आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |
१) 58.68.8.188 हा अंकपत्ता 202.138.97.9चा सॉकपपेट आहे का ते चेकयूजरकडून तपासून घेणे. 58.68.8.188 या अंक पत्त्यानेही इंग्रजी आणि मराठी विकिपीडियात साधारणपणे एकाच प्रकारचा उत्पात केल्याचे भासते.
This article uses material from the Wikipedia मराठी article विकिपीडिया:पहारा आणि गस्त, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.