लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेत व देवनागरी लिपीत असावीत.
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
अगोदर अनुमती न घेता केलेली व देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही, त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य साहाय्य पाने इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकांच्या मदतीने आणखीही साहाय्य-पाने तयार केली जातील, परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजेनुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षिने ठरलेलेत आहे.
व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये. [अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते (alphabetical categorisation)]. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.
जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. विनायक दामोदर सावरकर हे मूळ पान राहील व स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर सावरकर, वि.दा. सावरकर, विनायक सावरकर, व्ही.डी. सावरकर इ. चे पुनर्निर्देशन विनायक दामोदर सावरकरकडे करावे.
अपवाद - जर व्यक्तीचे उपनाव, उपाख्य, पदवीसह नाव तिच्या मुळ नावापेक्षा जास्त प्रचलित असेल तर हे तसे शीर्षक असावे. उदा.
अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.
काही प्रचलित नावांचा अपवाद सोडला (उदा. GNU/Linux) तर "/" देऊ नये. मुख्य नामविश्वात (namespace) उपपाने (subpages) नाहीत त्यामुळे तेथे "/" वापरून काही तांत्रिक फायदाही नाही.
आणखी एक सूचना म्हणजे "प्रकल्प अमुक" असे न ठेवता "अमुक प्रकल्प" असे ठेवावे. इंग्रजीत "project foo" असे प्रचलित आहे पण मराठीत "अमुक प्रकल्प", "तमुक योजना" असेच अधिक योग्य वाटते.
प्रकार | लेखन संकेत | संदर्भ आणि अधिक माहिती |
कालगणना आणि दिनांकांचे लिखाण | विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा | विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा |
इंग्रजी | मराठी | संदर्भ |
Wiki | विकिपीडिया | विकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा आणि विक्शनरी चावडीवरील चर्चा |
मीडियाविकिमध्ये (ज्याच्या साहाय्याने विकिपीडिया चालवण्यात येतो) पानांची शीर्षके दोन भागात असतात - नामविश्व आणि शीर्षक. उदा: या पानाचे नाव आहे [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]. यात विकिपीडिया हे झाले नामविश्व. तर नामविश्व हे या पानाचे शीर्षक आहे. म्हणजेच हे पान विकिपीडिया या नामविश्वात आहे. विकिपीडियावर अशी अनेक नामविश्वे असतात, जसे Wikipedia, Help, इ. जर एखाद्या पानाचे नामविश्व विशिष्टपणे उद्धृत केलेले नसले तर ते पान मुख्य नामविश्वात असल्याचे गृहीत धरले जाते.
एखाद्या लेखाचे नाव कसे बदलावे? लेखाच्या शीर्ष मेन्यू मधील स्थानांतरण येथे टिचकी मारा . "'लेखाचे नाव' हलवा" असे शीर्षक येईल. तिथे नवीन शीर्षकाकडे समोरील खिडकीत नवे सुयोग्य शीर्षक लिहा. शक्यतोवर शीर्षक देताना शुद्धलेखन आणि मराठी विकिपीडियावरील शीर्षक संकेतांचा आधार घेतला तर बरे.
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतल्या शब्दोच्चारणांमुळे जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले आहेत .असे लेखन मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्या |
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतले शब्दोच्चारण हलन्त नाही म्हणून, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले नाही. परंतु त्याभाषेत प्रत्यक्ष लेखन व्यंजनान्त होते .मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार |
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतल्या शब्दोच्चारणांमुळे, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले आहे .शुद्धलेखनाच्या नियमानुसार असे लेखन मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्या |
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतले शब्दोच्चारण हलन्त नाही म्हणून, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले नाही.परंतु त्या भाषेत प्रत्यक्ष लेखन व्यंजनान्त होते. (मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार) |
This article uses material from the Wikipedia मराठी article विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.