परिचय

विकिपीडिया मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! हा लेख विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून देईल.

परिचय

विकिपीडियामधील इतर मदतलेख मदत मुख्यालयात उपलब्ध आहेत तसेच आपल्याला काही शंका असतील तर त्या मदतकेंद्र येथे विचारा.

विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्हीसुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पानसुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरू करू शकता.

बिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि विकिपीडिया वापरून इतरांना करून द्या.

मोफत

विकिपिडिया हा मुक्त माहिती स्रोत आहे माहिती वाचण्यास, वापरण्यास पैसे लागत नाहीत. अर्थात माहितीचा तारतम्याने वापर करणे अपेक्षित आहे कारण ही माहिती काही वेळा चुकीची असू शकते.मुद्रणाधिकार असलेली माहिती सुयोग्य परवानगीशिवाय येथे वापरणे अपेक्षित नसले तरी काही नवागतांच्या चुकीमुळे असे घडले तर असा मसुदा लगेच आपण स्वत:सुद्धा गाळून टाकू शकता.

सहज संदर्भ

लेखांमध्ये सहज परस्पर संदर्भ देता येतात. उदाहरणार्थ, तुम्ही संदर्भ येथे टिचकी मारुन संदर्भ या शब्दाबद्दल माहिती पाहू शकता.

शोध निबंध संकल्पना सुरवात

विकिपीडियावरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबून राहण्याइतपत खात्रीलायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरुवात करता येते.

व्यापक परीघ

विषयांचा परीघ सामान्य ज्ञानकोशापेक्षा व्यापक असतो. अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमूहातील लोकांकडच्या छोट्यात छोट्या माहितीचे संकलन शक्य होते.

व्यापक चर्चा

अधिकाधिक संपादनानंतर कालपरत्वे लेख परिपक्व होत जातात.

वेग

वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असू शकते.

तर्कसंगत

विकिपीडियावरील लेख पुनः पुनः आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तिगणिक त्यातील एकांगीपणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्कनिष्ठता वाढू शकते. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.

त्रोटक आणि विस्तृत

छापील मजकुरासाठी आवश्यक असलेली कागदाची मर्यादा नसल्यामुळे मजकूर त्रोटक आणि विस्तृत- दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून देता येतो.

महत्त्वाचे विकी आधारस्तंभ

  • विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे.
  • विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते.
  • विकिपीडिया मुक्‍त आहे.
  • विकिपीडिया वापरणार्‍यास फुकट आहे.
  • विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत राहतात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे न देता , दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात व चर्चा पानावर परस्पर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते.
  • मुद्रणाधिकार असलेली माहिती जशीच्या तशी वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घ्यावी. याचे कुठे उल्लंघन आढळ्ल्यास, संबधित भाग वगळावा. शक्यतो चर्चापानावर भाग वगळण्याचे कारण नोंदवावे.
  • विकिपीडियाचे बहुसंख्य नियम व बंधने अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. अचूकपणा अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा.

अधिक माहिती

धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे

विकिपीडियावरील लेख कसे असू नयेत

  • विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
  • विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
  • विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्‍तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश येथे आहे.
  • विकिपीडिया लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
  • विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
  • विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
  • विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्‍तिगत, शासकीय,निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या- निवारण जागा नाही.
  • विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
    • नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी नाही.
    • दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
    • विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
    • आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्‍तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
    • पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
    • हे व्यक्‍ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
    • दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
    • चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.
    • विकिपीडियातील लेख "कसे करावे" ची पाने नाहीत. (फक्‍त) विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
    • आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
    • पाठ्यपुस्तक नाही.
    • ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
    • संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
  • विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
  • विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्‍तिपरत्वे व्यक्‍तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्‍या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. विकी धोरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.

विकिपीडिया समाज

  • विकिपीडिया समाज कसा आहे.

विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे[1] स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[2] फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त[3] करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेउनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते.

  • विकिपीडिया समाज काय नाही.
    • आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
    • विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात
    • विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
    • विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.

विकिपीडियाचे सहप्रकल्प

परिचय 

उपरोल्लेखित विकिपीडियाच्या मुक्‍त ज्ञानकोशात समाविष्ट हो‍ऊ न शकणार्‍या काही गोष्टी विकीच्या इतर सहप्रकल्पात अंतर्भूत करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा

परिचय  मोबाईल ?

Tags:

परिचय मोफतपरिचय सहज संदर्भपरिचय शोध निबंध संकल्पना सुरवातपरिचय व्यापक परीघपरिचय व्यापक चर्चापरिचय वेगपरिचय तर्कसंगतपरिचय त्रोटक आणि विस्तृतपरिचय महत्त्वाचे विकी आधारस्तंभपरिचय विकिपीडियावरील लेख कसे असू नयेतपरिचय विकिपीडिया समाजपरिचय विकिपीडियाचे सहप्रकल्पपरिचय हे सुद्धा पहापरिचयHelpमदतकेंद्रविकिपीडिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संवादरामायणकुटुंबनियोजनबारामती विधानसभा मतदारसंघखो-खोग्रामपंचायतविराट कोहलीआळंदीउदयभान राठोडचोखामेळासर्पगंधासंयुक्त राष्ट्रेभगतसिंग२०१४ लोकसभा निवडणुकावाल्मिकी ऋषीभारताची जनगणना २०११माहितीब्राझीलची राज्येकावीळमहाराष्ट्र गीतरामचरितमानससाडेतीन शुभ मुहूर्तफळभारताचा ध्वजचिमणीतणावएकनाथ शिंदेसंशोधनअर्थसंकल्पबलुतेदारज्ञानपीठ पुरस्कारजायकवाडी धरणसर्वेपल्ली राधाकृष्णनपाऊसभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकाऔद्योगिक क्रांतीसावित्रीबाई फुलेसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)चाफासकाळ (वृत्तपत्र)भीम जन्मभूमीक्रियापदमृत्युंजय (कादंबरी)काळभैरवमानवी हक्कअहिल्याबाई होळकरमानवी भूगोलबौद्ध धर्मरामटेक लोकसभा मतदारसंघआम्ही जातो अमुच्या गावाऔंढा नागनाथ मंदिरउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमुलाखतभारताचे राष्ट्रपतीगणपत गायकवाडस्त्री नसबंदी शस्त्रक्रियासुषमा अंधारेसंगणक विज्ञानकोहळासिंधुताई सपकाळपुराणेएकनाथस्वामी विवेकानंदसिंहगडउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगराजू शेट्टीभगवद्‌गीतादिशामानवी विकास निर्देशांकऋतुराज गायकवाडशारदीय नवरात्रहिंदू धर्मातील अंतिम विधी२०१९ लोकसभा निवडणुकाधर्मो रक्षति रक्षितः🡆 More