बेडूक: एक उभयचर प्राणी

बेडूक हा उभयचर प्राणी आहे.

बेडूक आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते.त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात बेडूक जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही बेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात.पुराणात बेडकावर 'मान्दुकासुक्त' आहे.

बेडूक: स्वरूप, उडता बेडूक, कायदा
बेडूक

स्वरूप

नर बेडकाचा आवाज घोगरा, खोल आणि मोठा असतो. मादी बेडूक क्वचितच आणि हळू आवाज काढते. बेडूक संपूर्ण मांसाहारी असतात. हल्लीच्या काळात तंगड्यांची परदेशी निर्यात करण्याच्या मोहात बेडकांची हत्या जास्त प्रमाणात होते. त्यामुळे बेडकांचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात शीतनिद्रा अवस्था संपवून बेडूक प्रजननासाठी बाहेर येतात, तेव्हा अशा मोठ्या बेडकांना प्रजननाआधीच मारले जाते. काही बेडूक शेतात टाकलेल्या आणि नंतर पाण्यात विरघळलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रदूषित झालेले पाणी, त्वचेद्वारे श्वसनक्रियेसाठी शोषून घेतो. यामुळेही बेडूक मृत्युमुखी पडत आहेत.

उडता बेडूक

आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर परिसरातही या बेडकाची नोंद डॉ. गणेश मर्गज व सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांनी घेतली आहे.

कायदा

बेडकांना संरक्षण मिळावे म्हणून त्यांना वन्य प्राणी म्हणून घोषित केले गेले आहे. त्यासाठी १९८५ साली भारताच्या वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडण्यावर व मारून खाण्यावर बंदी घातली गेली आहे. दोषी ठरलेल्यांसाठी कायद्याने पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षे कैद अशी कडक सजा दिलेली आहे.

२९ एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाह्य दुवे

ठळक मजकूर

Tags:

बेडूक स्वरूपबेडूक उडता बेडूक कायदाबेडूक बाह्य दुवेबेडूकउभयचर प्राणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजागतिक लोकसंख्याऑलिंपिकसम्राट अशोक जयंतीप्रल्हाद केशव अत्रेपंचायत समितीकल्पना चावलारामटेक विधानसभा मतदारसंघमोबाईल फोनज्ञानेश्वरमहाराष्ट्र पोलीसअणुऊर्जाअल्बर्ट आइन्स्टाइनपुरंदरचा तहपुणे लोकसभा मतदारसंघज्वारीरावेर लोकसभा मतदारसंघकविताहनुमानसंशोधनभारताचा स्वातंत्र्यलढागणितनाशिकजायकवाडी धरणभारतीय रेल्वेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीभगतसिंगॲरिस्टॉटलदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमतदानहातकणंगले लोकसभा मतदारसंघनांदेड लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)क्रांतिकारकआणीबाणी (भारत)वाघविनायक दामोदर सावरकरडाळिंबमराठा साम्राज्यनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादीताज महालकोल्हापूर जिल्हाइंदिरा गांधीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघजळगावबहिणाबाई चौधरीहळदघुबडजेराल्ड कोएत्झीराजू देवनाथ पारवेविठ्ठल रामजी शिंदेखेळटेबल टेनिसवायू प्रदूषणभारताचे पंतप्रधानटोपणनावानुसार मराठी लेखकसेंद्रिय शेतीप्रकाश आंबेडकरअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपोवाडाऋतूनवरत्‍नेगाडगे महाराजपवन ऊर्जाबँकचाफामण्यारसंख्याभारत छोडो आंदोलनऔद्योगिक क्रांतीगहूविज्ञानराजा राममोहन रॉय🡆 More