स्त्रियांमधील जननांग छेदन

स्त्रियांमधील जननांग अंगच्छेदन (FGM), ज्याला स्त्रियांमधील जननांग कापून काढणे आणि स्त्रीचा सुंता करणे असे देखील म्हणतात, या सर्वांची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अशी व्याख्या केली आहे “सर्व कार्यपद्धती ज्यामध्ये स्त्रियांचे बाह्य जननेंद्रिय आंशिकरित्या किंवा पूर्णपणे काढून टाकणे किंवा स्त्रियांमधील जननांग अवयव वैद्यकीय नसलेल्या कारणांसाठी काढून टाकणे समाविष्ट असते”.

FGM हे वांशिक गटतसेच उप-सहारा आणि ईशान्य आफ्रिका यांमधील 27 देशांमध्ये, आणि आशिया, मध्य पूर्व आणि इतर ठिकाणच्या स्थलांतरित समुदायामध्ये कमी प्रमाणात, एक सांस्कृतिक विधी म्हणून करण्याचा प्रघात आहे. ते करण्याचे वय हे जन्माच्या दिवसापासून ते तारुण्यापर्यंत बदलत जाते, अर्ध्या देशांमध्ये जिथे राष्ट्रीय आकडे उपलब्ध आहेत, तेथे बऱ्याच मुलींना वयाच्या पाचव्या वर्षापूर्वी कापले जाते.

स्त्रियांमधील जननांग अंगच्छेदन
photograph
Road sign near Kapchorwa, Uganda, where FGM is outlawed but still practised by the Pokot, Sabiny and Tepeth people.
Description Partial or total removal of the external female genitalia or other injury to the female genital organs for non-medical reasons
Areas practised Most common in 27 countries in sub-Saharan and north-east Africa, as well as in Yemen and Iraqi Kurdistan
Numbers 133 million in those countries
Age performed Weeks after birth to puberty and beyond

या पद्धतीमध्ये एक किंवा अनेक कार्यपद्धती समाविष्ट आहेत, ज्या वांशिक गटानुसार बदलतात. त्यामध्ये योनिलिंग आणि चीरीटोप; संपूर्ण योनिलिंग किंवा त्याचा भाग आणि अंतर्गत चीरी; आणि त्याचे सर्वात गंभीर स्वरूप (योनी मुख शिवणे - इन्फिब्युलेशन) बाह्य चीरी आणि योनीचा शेवट हे सर्व किंवा त्यांचा भाग काढून टाकणे समाविष्ट असते. या शेवटच्या कार्यपद्धतीत, ज्याला WHO प्रकार IIIFGM म्हणते त्यामध्ये, लघवी आणि पाळीचे रक्त बाहेर पडण्यासाठी एक छोटेसे भोक ठेवले जाते आणि योनी संभोग आणि प्रसूतीसाठी उघडली जाते. आरोग्यावर होणारे परिणाम हे कार्यपद्धतीवर अवलंबून असतात पण त्यामध्ये वारंवार होणारे जंतूसंसर्ग, जुनाट वेदना, गाठी, गर्भवती होण्यासाठी असमर्थता, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत आणि जीवघेणा रक्तस्त्राव समाविष्ट असू शकतो.

या प्रथेचे मूळ लिंग असमानता, स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न आणि पवित्रता, नम्रता आणि दिसण्याबद्दलच्या कल्पना यांमध्ये आहे. हे सहसा बायकांद्वारे सुरू आणि पूर्ण केले जाते, ज्यांना ते करण्यात अभिमान वाटतो आणि ज्यांना अशी भीती वाटते की त्यांच्या मुलींना आणि नातींना तसे न कापल्यास मुलींवर सामाजिक बहिष्कारटाकला जाईल. ते एकवटलेले असलेल्या 29 देशांमधील 130 दशलक्ष स्त्रिया आणि मुलींनी FGM अनुभवलेले आहे. आठ दशलक्षांहून जास्त स्त्रियांचे योनी मुख शिवलेले आहे, अशी पद्धत जी ड्जिबौटी, एरिट्रेया, सोमालिया आणि सुदान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.

FGM जिथे घडते अशा अनेक देशांनी त्याला बेकायदेशीर ठरविले आहे किंवा मर्यादा घातल्या आहेत, पण कायद्यांच्या अंमलबजावणीची स्थिती असमाधानकारक आहे. 1970 पासून लोकांना ते सोडून देण्यासाठी मन वळविण्याचे प्रयत्न आंतर्राष्ट्रीय स्तरावर होत आहेत आणि 2012 मध्ये यूनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्ली ने FGMला मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून मान्य केले आहे. विरोधावरही टीका करणारे असतात, विशेषतः मानववंशशास्त्रज्ञ.एरिक सिल्वरमॅन लिहितात की FGM हे सांस्कृतिक सापेक्षवाद, सहनशीलता आणि मानवी हक्कांची सार्वत्रिकता यांबद्दल अवघड प्रश्न उपस्थित करून मानववंशशास्त्रज्ञांच्या नैतिक विषयांचा केंद्रबिंदू बनले आहे.

संदर्भ

Tags:

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कार्ल मार्क्सराम सातपुतेछावा (कादंबरी)संगीत नाटकस्वामी विवेकानंदपुन्हा कर्तव्य आहेबारामती लोकसभा मतदारसंघअर्जुन वृक्षकेळकराड उत्तर विधानसभा मतदारसंघअहवालसकाळ (वृत्तपत्र)उदयनराजे भोसलेपोवाडामहाराष्ट्रमातीक्रिकेटचा इतिहासऋतुराज गायकवाडआर्थिक विकासवडनिसर्गराशीप्रीमियर लीगनाशिकवस्तू व सेवा कर (भारत)देवेंद्र फडणवीसछगन भुजबळगांडूळ खतशनि (ज्योतिष)कुत्रामहालक्ष्मीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगबुद्धिबळॐ नमः शिवायमराठी भाषा दिनभारतातील मूलभूत हक्कवृत्तपत्रस्त्रीवादी साहित्यमुंजविवाहजागतिक कामगार दिनसप्तशृंगी देवीटरबूजयशवंत आंबेडकरमहाराणा प्रतापमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमराठा आरक्षणविठ्ठलराव विखे पाटीलडाळिंबस्थानिक स्वराज्य संस्थाशिवशेतकरीनंदुरबार लोकसभा मतदारसंघमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथनैसर्गिक पर्यावरणभोपाळ वायुदुर्घटनायोनीभारतीय निवडणूक आयोगभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीनागपूरदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकोकण रेल्वेपरभणी लोकसभा मतदारसंघलोकगीतधनु रासकादंबरीअर्थशास्त्रभारतरत्‍नशाश्वत विकासह्या गोजिरवाण्या घरातज्वारीए.पी.जे. अब्दुल कलामउच्च रक्तदाबभारत सरकार कायदा १९१९महाराष्ट्राचा इतिहासलीळाचरित्र🡆 More