अहवाल

शाळा महाविद्यालयांमध्ये ,वकृत्वस्पर्धा, स्नेहसंमेलन असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात.तसेच शासकीय ,सामाजिक ,आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात .या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात.

असे अहवाल भविष्यात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा तपशील माहिती होतो.

स्वरूप :एखाद्या कार्यालयात ,संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची ,समारंभांची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे ‘अहवाल लेखन ’ होय. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू ,तारीख ,वेळ,सहभागी व्यक्ती ,प्रतिसाद ,समारोप अश्या विविध मुद्यांचा समावेश असतो. कार्यक्रम ,समारंभ सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ किवा कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंदी अहवालात केली जाते .

अहवालाची प्रमुख चार अंगे :

  1. प्रास्ताविक(अहवालाचा प्रारंभ )
  2. अहवालाचा मध्य( विस्तार )
  3. अहवालाचा शेवट ( समारोप )
  4. अहवालाची भाषा

अहवाल लेखनाची वैशिष्टे :

  • वास्तुनिष्टत्ता आणि सुस्पष्टता :

अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण ,सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना ,हेतू ,निष्कर्ष इत्यादी अनेक महत्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात .

  • विश्वसनियता :

अहवालातील विश्वासनीय माहिती आणि तथ्यानच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसानीतेमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जाते .

  • सोपेपणा :

शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते.हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा ही सोपी होते.

  • शब्दमर्यादा :

अहवालाच्या विषयावर / स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रिडाविषयक ,इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात .

  • निःपक्षपातीपणा :

अहवालाचा विषय कोणताही असो ,प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट म्हणजे त्या अहवालाचा निःपक्षपातीपणा.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हळदरावेर लोकसभा मतदारसंघराम मंदिर (अयोध्या)व्यवस्थापनद्रौपदी मुर्मूमराठी व्याकरण२०२४ मधील भारतातील निवडणुकातुळशीबाग राम मंदिरसह्याद्रीमुलाखतरामनवमीपांडुरंग सदाशिव सानेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअहवालशालिनी पाटीलकलाबचत गटमानसशास्त्रवि.स. खांडेकरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)हॉकीनकाशावर्धा लोकसभा मतदारसंघगगनगिरी महाराजअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९नक्षत्रवि.वा. शिरवाडकरभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारतीय संविधानाची उद्देशिकानिसर्गविजय शिवतारेशारदीय नवरात्ररॉयल चॅलेंजर्स बंगलोरनृत्यएकनाथमराठा आरक्षणकांजिण्याभारत छोडो आंदोलनकावीळमुंबई उच्च न्यायालयप्रेमानंद गज्वीजैवविविधतालोकसंख्या घनतामहारबिबट्याकुळीथमतदानगहूघोणसबुद्धिबळहृदयजन गण मनलेस्बियनआमदारइतिहासमिया खलिफामैदान (हिंदी चित्रपट)प्रदूषणरस (सौंदर्यशास्त्र)महाराणा प्रतापभारतीय प्रजासत्ताक दिनराजू शेट्टीजागतिकीकरणवर्धमान महावीरभारतीय संविधानाचे कलम ३७०शुभेच्छायकृतमानवी हक्कभूगोललोकगीतसमुपदेशनक्रियाविशेषणविनयभंगचंद्रकोल्हापूरगोंधळमहाराष्ट्रातील घाट रस्तेगुरुत्वाकर्षण🡆 More