भारताच्या अधिकृत भाषांची यादी

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात.

भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी आणि हिंदी या दोन केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात. उदाहरणार्थ, केंद्र शासन माहिती इंग्रजी भाषेत महाराष्ट्र शासनाकडे पाठवते. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाशी संवाद साधताना मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करते.
भारताच्या २१ भाषा या अधिकृत भाषा आहेत. केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सेवांच्या परीक्षांसाठी, कोणताही उमेदवार या २१ पैकी एक किंवा हिंदी/इंग्रजी भाषेची निवड परीक्षेचे माध्यम म्हणून करू शकतो.
भारतीय राज्यघटना किंवा कायद्याने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा असा दर्जा दिलेला नाही. भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत भारतीय संघराज्याची सर्व राज्ये मान्यता देत नाहीत तोपर्यंत कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य करता येणार नाही.
घटनेच्या ३४३ व्या कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र शासनाच्या व्यवहाराची प्रमुख भाषा तर इंग्रजी ही व्यवहाराची सहकारी भाषा आहे. १९५० साली इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते. दक्षिणेकडील राज्यांच्या विरोधामुळे इंग्रजीचा व्यवहारातील वापर हा १९६५ पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या केंद्र शासनाशी व्यवहार करताना उपरोल्लेखित दोन भाषांपैकी एका भाषेचा वापर करण्यात येतो.
वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव यामुळे इंग्रजी हीच आता केंद्र शासनाशी व्यवहाराची प्रमुख भाषा झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाशी व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करणे अवघड झाले आहे.

Every state almost have Sindhi language but we don't have specific state or Union territory but Sindhi is official language of India you can see on Indian currency notes as fifteenth /Last language
भारताचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त बोलली जाणारी अधिकृत भाषा.

अधिकृत भाषा - केंद्र सरकार

केंद्र सरकारतर्फे प्रशासनामध्ये दोन भाषांचा वापर केला जातो.

  1. इंग्रजी भाषा: ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी नाही त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.
  2. हिंदी भाषा: ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी आहे त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.

अधिकृत भाषा - राज्य सरकारे

राज्ये

क्र. राज्य अधिकृत भाषा इतर ओळखले भाषा
१. अरुणाचल प्रदेश इंग्रजी भाषा, हिंदी भाषा
२. आंध्र प्रदेश तेलुगू, हिंदी भाषा, उर्दू
३. आसाम असमी, बोडो, बंगाली, करबी
४. उत्तर प्रदेश हिंदी भाषा, उर्दू
५. उत्तराखंड हिंदी भाषा संस्कृत भाषा
६. ओडिशा ओरिया
७. कर्नाटक कन्नड
८. केरळ मल्याळम
९. गुजरात गुजराती
१०. गोवा कोंकणी, मराठी पोर्तुगीज
११. जम्मू आणि काश्मीर उर्दू, काश्मीरी
१२. छत्तीसगड हिंदी भाषा, छत्तीसगडी
१३. झारखंड हिंदी भाषा बंगाली
१४. तमिळनाडू तमिळ, इंग्रजी भाषा
१५. त्रिपुरा बंगाली, कोकबोरोक
१६. नागालॅंड इंग्रजी भाषा
१७. पंजाब पंजाबी
१८. पश्चिम बंगाल बंगाली नेपाळी
१९. बिहार हिंदी भाषा, उर्दू, भोजपुरी, मगधी, मैथिली
२०. मध्य प्रदेश हिंदी भाषा
२१. मणिपूर मैतेई
२२. महाराष्ट्र मराठी
२३. मिझोरम मिझो, इंग्रजी भाषा
२४. मेघालय खासी, गारो, इंग्रजी भाषा
२५. राजस्थान हिंदी भाषा, राजस्थानी
२६. सिक्कीम नेपाळी
२७. हरियाणा हिंदी भाषा, पंजाबी
२८. हिमाचल प्रदेश हिंदी भाषा, पहाडी संस्कृत भाषा

केंद्रशासित प्रदेश

क्र. केंद्रशासित प्रदेश अधिकृत भाषा
१. अंदमान आणि निकोबार निकोबारी, बंगाली, इंग्रजी भाषा, मल्याळम, पंजाबी, तमिळ, तेलुगू, हिंदी भाषा, उर्दू
२. चंदीगड पंजाबी, हिंदी भाषा
३. दमण आणि दीव इंग्रजी भाषा, गुजराती, मराठी
४. दादरा आणि नगर हवेलीलक्षद्वीप गुजराती, मल्याळम मराठी
५. दिल्ली पंजाबी,इंग्रजी भाषा, उर्दू, हिंदी भाषा
६. पुदुच्चेरी तमिळ, फ्रेंच
७. जम्मू आणि काश्मीर काश्मीरी
८. लडाख लडाखी

अधिकृत भाषांची सूची

इंग्रजी आणि हिंदीप्रमाणेच खाली दिलेल्या २१ भाषांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत आणि राजभाषा असा दर्जा दिला आहे.

क्र. अधिकृत भाषा राज्य/समाज
१. आसामी आसाम
२. उर्दू जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश
३. ओडिया ओडिशा
४. कन्नड कर्नाटक
५. काश्मिरी जम्मू आणि काश्मीर
६. कोंकणी गोवा
७. गुजराती दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गुजरात
८. डोगरी जम्मू आणि काश्मीर
९. तमिळ तमिळनाडू, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार
१०. तेलुगू आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार
११. नेपाळी सिक्कीम
१२. पंजाबी पंजाब, चंदीगढ, दिल्ली, हरयाणा
१३. बंगाली त्रिपुरा, पश्चिम बंगाल
१४. बोडो आसाम
१५. मराठी महाराष्ट्र, गोवा
१६. मल्याळम केरळ, पुदुच्चेरी, लक्षद्वीप
१७. मैतेई मणिपूर
१८. मैथिली बिहार
१९. संथाली छोटा नागपूर पठारावरील संथाली टोळ्या
२०. संस्कृत पुरातन भाषा
२१. सिंधी सिंधी समाज

इतर महत्त्वाच्या राज्यभाषा

खालील भाषा या विशिष्ट राज्यांच्या अधिकृत भाषा आहेत. मात्र त्यांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत दर्जा दिलेला नाही.

क्र. राज्य अधिकृत भाषा
१.. गोवा पोर्तुगीज
२.. त्रिपुरा कोकबोरोक
३. मिझोरम मिझो
४. मेघालय खासी, गारो
५. पुदुच्चेरी फ्रेंच

भारतातील इतर लोकप्रिय भाषा

खालील भाषांच्या भाषिकांची संख्या ही ५० लाखांपेक्षा जास्त आहे. या भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. यातील बहुतेक भाषा या हिंदीच्या बोलीभाषा आहेत.

बिहारी

खालील बिहारी भाषांच्या भाषिकांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त आहे. यांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही.

  1. अंगिका — उत्तर आणि दक्षिण बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील माल्डा जिल्ह्यात बोलली जाते.
  2. भोजपुरी — बिहार
  3. मागधी — दक्षिण बिहार

राजस्थानी

राजस्थान राज्यातील ५ कोटी लोक हे राजस्थानी भाषिक आहेत. मात्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये फरक आहे. यातील बहुतेक लोक हिंदी बोलू शकतात. अनेकांचे मते राजस्थानी ही हिंदीचीच एक बोलीभाषा आहे. राजस्थानी भाषेचे खालील प्रकार आहेत.

  1. मारवाडीमारवाड: जोधपूर, नागौर आणि बिकानेर परिसर.
  2. मेवाडीमेवाड: उदयपूर, चित्तोड आणि कोटाबुंदी परिसर.
  3. शेखावती — शेखावती: सिकर, चुरू, झुंझूनू परिसर.

इतर भाषा

१.कच्छीगुजरातमधील कच्छ प्रदेश. २.कोडवा टाक, कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यात बोलली जाते. ३.गोंडी (गोंड टोळ्या) ४.तुळू — कर्नाटक व केरळमधील तुळू लोकांकडून बोलली जाते. ५.भिल्ली (भिल्ल टोळ्या) ६संकेती — कर्नाटक, केरळ व तमिळनाडूतील संकेती लोकांकडून बोलली जाते. ७.हरयाणवी - हरयाणामधील एक बोलीभाषा.

अल्पसंख्याक लोकांच्या भाषा

खालील भाषांच्या भाषिकांची संख्या ही दहा लाखांपेक्षा कमी आहे. १.महल — लक्षद्वीप प्रदेशातील मिनिकॉय बेटावर ही भाषा बोलली जाते.

हेसुद्धा पहा

दुवे

संदर्भ


Tags:

भारताच्या अधिकृत भाषांची यादी अधिकृत भाषा - केंद्र सरकारभारताच्या अधिकृत भाषांची यादी अधिकृत भाषा - राज्य सरकारेभारताच्या अधिकृत भाषांची यादी अधिकृत भाषांची सूचीभारताच्या अधिकृत भाषांची यादी इतर महत्त्वाच्या राज्यभाषाभारताच्या अधिकृत भाषांची यादी भारतातील इतर लोकप्रिय भाषाभारताच्या अधिकृत भाषांची यादी हेसुद्धा पहाभारताच्या अधिकृत भाषांची यादी दुवेभारताच्या अधिकृत भाषांची यादी संदर्भभारताच्या अधिकृत भाषांची यादीइंग्रजी भाषादेवनागरीबोलीभाषाभारतीय राज्यघटनाहिंदी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ओमराजे निंबाळकरभारतातील जागतिक वारसा स्थानेलोकमतजागतिक दिवसरेणुकाबुद्धिबळबलुतेदारमिलानलोकसंख्यामहाराष्ट्रातील पर्यटनप्राजक्ता माळीकावीळराणी लक्ष्मीबाईसिंधुताई सपकाळभारत सरकार कायदा १९१९बाबासाहेब आंबेडकरसाम्राज्यवादयोगमराठी भाषा गौरव दिनवातावरणमहाराष्ट्र दिनलीळाचरित्रभारताच्या पंतप्रधानांची यादीमुघल साम्राज्यइंग्लंडजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीप्रहार जनशक्ती पक्षहनुमानजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भोपळाछगन भुजबळजैन धर्मउच्च रक्तदाबभारतीय रिपब्लिकन पक्षसात बाराचा उताराबारामती विधानसभा मतदारसंघगोदावरी नदीराहुल गांधीसम्राट अशोकन्यूझ१८ लोकमतवाचनश्रीया पिळगांवकर२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील राजकारणआंबेडकर जयंतीकार्ल मार्क्सधाराशिव जिल्हाबाराखडीरामदास आठवलेबाबरउंटभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीनाणेगुकेश डीक्रियापदमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभाऊराव पाटीलउत्पादन (अर्थशास्त्र)प्रदूषणअजिंठा लेणीसाईबाबासंत जनाबाईस्थानिक स्वराज्य संस्थाक्रिकेटकबड्डीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमीन रासजागतिक तापमानवाढनांदेड जिल्हापरातसम्राट अशोक जयंतीसंत तुकारामयशवंतराव चव्हाणकापूसमराठी साहित्य🡆 More