नागालँड: भारतातील एक राज्य.

नागालॅंड उच्चार (सहाय्य·माहिती) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.

या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमी व चॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊसकापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.

  ?नागालँड

भारत
—  राज्य  —

२६° १३′ ४५.०१″ N, ९४° ३९′ ०९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १६,५७९ चौ. किमी
राजधानी कोहिमा
मोठे शहर दीमापुर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
१९,८८,६३६ (24th)
• १२०/किमी
भाषा इंग्रजी
राज्यपाल निखिल कुमार
मुख्यमंत्री नैफीउ रीयो
स्थापित १ डिसेंबर इ.स. १९६३
विधानसभा (जागा) नागालँड विधानसभा (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-NL
संकेतस्थळ: Nagaland.nic.in
नागालँड चिन्ह
नागालँड चिन्ह

इतिहास

नागभूमीत राहणाऱ्यांना किरात म्हटले जाई.. नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा साऱ्या किरातांना 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचेचंद्रकुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव सूर्य आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाणस्वरूप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष. रेंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर [[]] हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याची पत्‍नी नागभूमीची होती, तर. उलुपी ही अर्जुनाची पत्‍नी नागकन्या होती.

नागालॅंडमधील भारत सरकारविरोधी फुटीरवादी संघटना

  • एनएससी‍एन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालॅंड :- या संस्थेची निर्मिती, एनएससी‍एन-आयएम या संघटनेतील अंतर्गत संघर्षातून झाली. ही संघटना भारत सरकारशी शस्त्रसंधीला तयार होती, पण मार्च २०१५मध्ये त्यांनी हा विचार रद्द केला.
  • एनएससी‍एन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालॅंडचा काही भाग :- एनएससी‍एन-खापलांग संघटनेत ब्रह्मदेशीय व भारतीय असे भेद पडल्याने या संघटनेचा जन्म झाला. खोले कोनयाक व कितोवी झिमोमी या दोन नेत्यांमधील स्पर्धेमुळे ही (केके) संघटना जन्माला आली.
  • एनएससी‍एन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश : खापलांग संघटनेशी संघर्ष झाल्यामुळे चिशी स्यू व थुइंगलेंग मुईवा हे दोन नेते बाहेर पडले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. इ.स. १९९७ मध्ये या संघटनेने सरकारशी केलेला शस्त्रसंधी अजून कायम आहे.याच संघटनेशी भारत सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये नवा करार केला आहे.
  • एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. :- ही पहिली फुटीरवादी नागा संघटना, अंगामी झापू फिझो यांनी इ.स. १९४० मध्ये स्थापन केली. त्यानंतर ती पाच गटात विखुरली गेली. त्यांतील एनएनसी हामूळचा गट आहे. या गटाला फिझोची मुलगी इंग्लंडमधून मार्गदर्शन करते.
  • झेडयूएफ : झेलियांगग्रॉंग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालॅंड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.
नागालँड: इतिहास, नागालॅंडमधील भारत सरकारविरोधी फुटीरवादी संघटना, नागालॅंडवरील पुस्तके 
लांगवा गाव, नागालँड मधील एक हेडहंटर

नागालॅंडवरील पुस्तके

  • नागालॅंडच्या अंतरंगात (लेखिका - डॉ. अर्चना जगदीश). या मराठी पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाचा २०१७ सालचा ना.के. बेहेरे पुरस्कार मिळाला आहे.

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - नागालॅंडमधील जिल्हे

नागालॅंड राज्यात एकूण ८ जिल्हे आहेत.


Tags:

नागालँड इतिहासनागालँड नागालॅंडमधील भारत सरकारविरोधी फुटीरवादी संघटनानागालँड नागालॅंडवरील पुस्तकेनागालँड भूगोलनागालँडNagaland.oggअरुणाचल प्रदेशआसामईशान्य भारतउत्तरउद्योगऊसकापूसकोहिमाक्षेत्रफळचित्र:Nagaland.oggडाळतांदूळदक्षिणपश्चिमपूर्वभाषामणिपूरम्यानमारराजधानीराज्यलोकसंख्याविकिपीडिया:मिडिया सहाय्यशहरशेतीसंस्कृतीसाक्षरताहातमाग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिमालयमहाविकास आघाडीआंबामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)घोणसशिरूर विधानसभा मतदारसंघभारताच्या अधिकृत भाषांची यादीधुळे लोकसभा मतदारसंघभारताचे संविधाननांदेड लोकसभा मतदारसंघगुढीपाडवानागरी सेवामण्यारयशवंतराव चव्हाणअचलपूर विधानसभा मतदारसंघमहेंद्र सिंह धोनीसंत जनाबाईपंकजा मुंडेराहुल कुलआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंग्रहालयसमासजागतिक बँकसंदीप खरेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीउंबरहातकणंगले विधानसभा मतदारसंघराशीतलाठीरामायणभारताचा ध्वजभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हअरिजीत सिंगमुखपृष्ठपांढर्‍या रक्त पेशीभोपाळ वायुदुर्घटनाशिवनेरीतिवसा विधानसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र समितीभारताचा इतिहाससोलापूर लोकसभा मतदारसंघसत्यनारायण पूजाग्रंथालयउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरकर्करोगरमाबाई रानडेसदा सर्वदा योग तुझा घडावाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेओशोमाढा लोकसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सपहिले महायुद्धगालफुगीमहाराष्ट्राचे राज्यपालओवाकुर्ला विधानसभा मतदारसंघप्रतापगडकालभैरवाष्टकजयंत पाटीलमुंबईरावणप्राथमिक आरोग्य केंद्रउमरखेड विधानसभा मतदारसंघविधान परिषदसुतकहृदयदिंडोरी लोकसभा मतदारसंघसविता आंबेडकरब्रिक्सउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशेकरूभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीपुणेप्रतिभा पाटीलआद्य शंकराचार्यकुष्ठरोग🡆 More