तांदूळ: गुण

तांदूळ हे एक धान्य आहे.

शेतातून मिळणाऱ्या तांदळावर एक पापुद्रा-साळ असते. साळीसकटच्या तांदळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.

तांदूळ
तांदूळ: तांदुळाच्या जाती, कर्करोगाशी लढण्याची क्षमता, महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती
शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: पोएसी (Poaceae)
शास्त्रीय नाव
oryza sativa ( औराइजा सैटाइवा )

तांदुळाच्या जाती

तांदूळ: तांदुळाच्या जाती, कर्करोगाशी लढण्याची क्षमता, महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती 
काळी साळ

तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे.

"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.

न्यू यॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्‍न केला. जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजातींचे मूळ एकच असल्याचे त्यांना आढळून आले. कारण दोन्हींच्या जनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य होते. त्यानंतर संशोधकांनी "मॉलेक्‍युलर' घड्याळाच्या तंत्राचा वापर करून त्या पहिल्यांदा केव्हा लावण्यात आल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला. त्यावरून असे ध्यानात आले की इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदूळ पहिल्यांदा शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आला असला पाहिजे. इसवी सनपूर्व २००० च्या आसपास जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजाती वेगळ्या झाल्या. या संशोधकांच्या मते इतिहासातील दाखलेही या शोधाची पुष्टी करतात. इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.

आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.

कर्करोगाशी लढण्याची क्षमता

छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले.

महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती

  • आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
  • कमोद, काळी साळ, कोलपी, कोलम (वाडा कोलम), कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ, घुड्या
  • चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिनी, झिल्ली
  • टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा
  • तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ
  • पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
  • रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, सुरती
  • हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा
    तामिळनाडूमधील जाती
  • कादिरमंगलम्
    कर्नाटकातील जाती
  • नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,

इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.

तांदुळावरील रोग

तांदुळाच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास ते या पिकावरील रस शोषून घेतात, त्यामुळे ते पीक पिवळे पडते, धानाची वाढ होत नाही..

सेंद्रिय तांदूळ

'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे. याचे उत्पादन बहुधा दशपर्णी अर्क, पालापाचोळा आणि सोनबुरूड खत वापरून केले जाते. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या आतेगाव या गावी अशा प्रकारचा सेंद्रिय तांदूळ पिकविण्यात येतो.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

तांदूळ तांदुळाच्या जातीतांदूळ कर्करोगाशी लढण्याची क्षमतातांदूळ महाराष्ट्रातील तांदळाच्या जातीतांदूळ तांदुळावरील रोगतांदूळ सेंद्रिय तांदूळ हे सुद्धा पहातांदूळ संदर्भतांदूळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उत्पादन (अर्थशास्त्र)भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७कल्की अवतारमराठा आरक्षणकादंबरीगर्भाशयशिवाजी महाराजांचा जीवनक्रमछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभोपाळ वायुदुर्घटनागोवरअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघअर्थ (भाषा)३३ कोटी देवसंगीतातील रागवर्णनात्मक भाषाशास्त्रहस्तमैथुनआणीबाणी (भारत)ज्ञानेश्वरव्हॉट्सॲपप्रदूषणभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशरद पवारभरती व ओहोटीभौगोलिक माहिती प्रणालीवातावरणपुरातत्त्वशास्त्रपर्यावरणशास्त्रअमरावती लोकसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरन्यूझ१८ लोकमतजगदीश खेबुडकरबाबासाहेब आंबेडकर२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीगूगलशिक्षकसंस्‍कृत भाषामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबीड विधानसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनातानाजी मालुसरेसमर्थ रामदास स्वामीसाईबाबाताराबाई शिंदेरशियाविठ्ठल रामजी शिंदेपत्ररायगड जिल्हाजनहित याचिकाआयुर्वेदविधानसभाकर्ण (महाभारत)लातूरभाषाआदिवासीकृष्णमानवी हक्ककोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसाखरअन्नशाहू महाराजराजन गवसतत्त्वज्ञानकाळूबाईजय श्री रामरत्‍नागिरी जिल्हारायगड (किल्ला)मेष रासगोरा कुंभारकामसूत्रराज्यपालवाघमाहिती अधिकारअहवालपवनदीप राजनगोपाळ गणेश आगरकरमराठी व्याकरण🡆 More