बैकाल सरोवर

बैकाल सरोवर (रशियन: о́зеро Байка́л; मंगोलियन: Байгал нуур) हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे.

अंदाजे ३ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली ७४४.४ मी (२,४४२ फूट) तर कमाल खोली तब्बल १,६४२ मी (५,३८७ फूट) इतकी आहे. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या ह्या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे (२३,६१५.३९ किमी (५,७०० घन मैल)). इतर सरोवरांच्या तुलनेत केवळ कॅस्पियन समुद्राचे घनफळ बैकालपेक्षा अधिक आहे परंतु कॅस्पियन समुद्रामधील पाणी खारे आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो (सुपिरियर सरोवरव्हिक्टोरिया सरोवरांखालोखाल).

बैकाल सरोवर
Lake Baikal  
बैकाल सरोवर Lake Baikal -
बैकाल सरोवर
Lake Baikal -
स्थान सायबेरिया
गुणक: 53°30′N 108°0′E / 53.500°N 108.000°E / 53.500; 108.000
प्रमुख अंतर्वाह सेलेंगा नदी व इतर
प्रमुख बहिर्वाह अंगारा नदी
पाणलोट क्षेत्र ५,६०,००० वर्ग किमी
भोवतालचे देश रशिया ध्वज रशिया
कमाल लांबी ६३६ किमी (३९५ मैल)
कमाल रुंदी ७९ किमी (४९ मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३१,७२२ चौ. किमी (१२,२४८ चौ. मैल)
सरासरी खोली ७४४.४ मी (२,४४२ फूट)
कमाल खोली १,६४२ मी (५,३८७ फूट)
पाण्याचे घनफळ २३,६१५.३९ किमी (५,७०० घन मैल)
किनार्‍याची लांबी २,१०० किमी (१,३०० मैल)
उंची ४५५.५ मी (१,४९४ फूट)
बैकाल सरोवर
बैकाल हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख उत्तरी समुद्र असा आढळतो. १६४३ साली पहिला रशियन शोधक बैकालपर्यंत पोचला, त्यापूर्वी युरोपीय लोकांना बैकालच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेल्या सायबेरियन रेल्वेमुळे पश्चिम रशियाहून बैकालचा प्रवास करणे सुलभ झाले.

बैकालच्या वायव्येला रशियाचे इरकुत्स्क ओब्लास्त व आग्नेयेला बुर्यातिया प्रजासत्ताक आहेत. बैकालच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत. सायबेरियाचा मोती ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले बैकाल सरोवर एक मोठे पर्यटनकेंद्र आहे व उन्हाळ्यांमधील उबदार महिन्यांत येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

बैकाल सरोवरामध्ये सुमारे १,७०० विविध प्रकारचे जंतू, प्राणी व वनस्पती आढळतात. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. ह्या काळात सरोवरावरील बर्फाचा थर चालण्यासाठी व वाहने चालविण्यासाठी पुरेसा जाड असतो. १९२० सालच्या रशियन यादवी दरम्यान पांढऱ्या सेनेने सुटकेसाठी जानेवारी महिन्यात बैकाल चालत ओलांडण्याचा निर्णय घेतला परंतु अतिथंड आर्क्टिक वाऱ्यांमुळे पुष्कळसे सैनिक गोठून मृत्यूमुखी पडले.

गॅलरी

संदर्भ

बाह्य दुवे

बैकाल सरोवर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कॅस्पियन समुद्रमंगोलियन भाषारशियन भाषारशियाव्हिक्टोरिया सरोवरसरोवरसायबेरियासुपिरियर सरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वृत्तपत्रपुणे लोकसभा मतदारसंघवर्तुळजास्वंदसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामराठारशियन क्रांतीमण्यारनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहादेव जानकरअतिसारबाळशास्त्री जांभेकरवडमुंजमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४क्रिकेटचा इतिहासमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीगुळवेलकुटुंबनियोजनदहशतवादनवग्रह स्तोत्रअशोक चव्हाणहस्तकलामराठी भाषा गौरव दिननितीन गडकरीताराबाई शिंदेमुघल साम्राज्यज्यां-जाक रूसोभाषा विकासमराठी संतमावळ लोकसभा मतदारसंघपहिले महायुद्धगोवरगुरू ग्रहशिवनेरीगालफुगीमतदानराष्ट्रकूट राजघराणेनाणेसमर्थ रामदास स्वामीखडकसंत तुकारामतरसमराठा आरक्षणघनकचरालक्ष्मीनारायण बोल्लीअमरावती विधानसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकाबखरभारतातील सण व उत्सवशनिवार वाडाआंब्यांच्या जातींची यादीउत्पादन (अर्थशास्त्र)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघम्हणीभूगोलनातीजय श्री रामजागतिक पुस्तक दिवसमृत्युंजय (कादंबरी)ज्ञानपीठ पुरस्कारहस्तमैथुनमहेंद्र सिंह धोनीमेंदूजिल्हा परिषदमहाराष्ट्राचे राज्यपालभारतातील शेती पद्धतीभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७सूर्यनमस्कारमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीअर्जुन पुरस्कारकलासत्यशोधक समाजराज्य निवडणूक आयोगसुजात आंबेडकररस (सौंदर्यशास्त्र)जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढताज महाल🡆 More