एस्पेरांतो

एस्पेरांतो ही बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली एक कृत्रिम भाषा आहे.

एस्पेरांतो ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी कृत्रिम भाषा असून सध्या १२० देशांमधील १ लाख ते २० लाख लोक एप्सेरांतो भाषिक आहेत.

एस्पेरांतो
Esperanto
स्थानिक वापर प्रामुख्याने युरोप
भाषाकुळ
कृत्रिम भाषा
  • एस्पेरांतो
लिपी लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-१ eo
ISO ६३९-२ epo
ISO ६३९-३ epo[मृत दुवा]

भाषेचे जनक

पोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) एल.एल. झामेनहॉफ या व्यक्तीने इ‌. स. १८७७ ते १८८५ च्या मधात या भाषेची निर्मिती केली. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा ठाउक होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि अपसमजुतींना जामेनहोफ कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून या भाषेला प्रचलित केले.

भाषेच्या नावामागील इतिहास

जामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ.स. १८८७ वर्षी प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ आशा बाळगणारा असा होतो. या भाषेचे मूळ नाव ल इंतरनॅशिया लिंग्वो (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.


एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये

१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला अस्खलितपणे बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे.

२. साम्यता : ही भाषा सर्व लोकांना एकसारख्या पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या बळावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी सारखे परिश्रम घेतले असल्यामुळे ही साम्यतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.

३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा याअर्थी काम करू शकते.

४. सोपेपणा : ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.

५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच याही भाषेचा काळपरत्वे विकास होत गेला आहे आणि या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य आहे.


भाषेचा उद्देश

जगातील सर्व लोकांनी, परस्परांशी बोलण्यासाठी एक सारखी भाषा असावी; ती भाषा प्रांतमुक्त, जातीमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्दिष्ट्य होता. इ.स. १९५४ मध्ये युनेस्कोने या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.

बाह्य दुवे

Tags:

एस्पेरांतो भाषेचे जनकएस्पेरांतो भाषेच्या नावामागील इतिहासएस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्येएस्पेरांतो भाषेचा उद्देशएस्पेरांतो बाह्य दुवेएस्पेरांतोकृत्रिम भाषाभाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विराट कोहलीअभिव्यक्तीबारामती लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनरामायणजवसमहाराष्ट्र विधानसभासंस्‍कृत भाषातुळजापूरज्यां-जाक रूसोकेंद्रीय लोकसेवा आयोगमहादेव गोविंद रानडेवस्तू व सेवा कर (भारत)शेतीराजरत्न आंबेडकरमुरूड-जंजिरामौर्य साम्राज्यसाखरअहिल्याबाई होळकरत्सुनामीग्रामपंचायतटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनवरी मिळे हिटलरलाबुलढाणा विधानसभा मतदारसंघपद्मसिंह बाजीराव पाटीलजैन धर्मपर्यावरणशास्त्रभारतीय रेल्वेकादंबरीसत्यशोधक समाजवृद्धावस्थाहातकणंगले लोकसभा मतदारसंघव्यवस्थापननवग्रह स्तोत्रतिरुपती बालाजीढोलकीअभिनयदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघवाचनपृथ्वीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीबाबा आमटेमहाराष्ट्रातील किल्लेराम सातपुतेसामाजिक कार्यविठ्ठलबैलगाडा शर्यतज्ञानपीठ पुरस्कारउच्च रक्तदाबऊससांगली लोकसभा मतदारसंघपोवाडारायगड लोकसभा मतदारसंघभौगोलिक माहिती प्रणालीपरभणी विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेकुटुंबसंजय हरीभाऊ जाधवगोरा कुंभारजागतिक तापमानवाढबँकसंगीतातील रागजुने भारतीय चलनचलनघटसमाज माध्यमेविनायक दामोदर सावरकरहैदरअलीहापूस आंबाफकिरामराठी साहित्यमुखपृष्ठहिंदू लग्नदिंडोरी लोकसभा मतदारसंघमहानुभाव पंथराम🡆 More