पाच आधारस्तंभ

विकिपीडियाचे काम ज्या मूलभूत तत्त्वांवर चालते, ते पाच आधारस्तंभ थोडक्यात असे :

Blue pillar (1: Encyclopedia) विकिपीडिया एक ऑनलाइन ज्ञानकोश आहे. यात सर्वसाधारण, तसेच विशिष्ट विषयकेंद्रित ज्ञानकोश, पंचांगे / दिनदर्शिका, गॅझेटियरे इत्यादीं माहितीसंग्रहांतील घटक तत्त्वे अंतर्भूत आहेत. विकिपीडिया वादविवादांचे व्यासपीठ, सामाजिक चर्चामंच, जाहिरातीचे माध्यम, पत्रकारितेचे माध्यम, अराजकवादाचा किंवा लोकशाहीचा प्रयोग, माहितीच्या अंदाधुंद साठवणुकीचे केंद्र किंवा वेब निर्देशिका नव्हे. तसेच विकिपीडिया शब्दकोश, वृत्तपत्र किंवा स्रोत दस्तऐवजांचे संकलनस्थळ नव्हे; या स्वरूपाचा आशय कदाचित विकिपीडिया बंधुप्रकल्पांवर नोंदवता येऊ शकतो.
 
Green pillar (2: NPOV) विकिपीडियाचा दृष्टिकोन निष्पक्षपाती आहे. लेखातील विषयाबद्दल प्रचलित असणारे प्रमुख दृष्टिकोन संतुलित व निष्पक्षपाती पद्धतीने वाचकांपुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही एखाद्या गोष्टीचा पुरस्कार करण्याचे टाळतो आणि वादग्रस्त मुद्द्यांवर वादप्रतिवाद करण्याऐवजी वादग्रस्त मुद्द्यांच्या पैलूंचा परामर्ष घेतो. काही वेळा एखाद्या विषयाबद्दल एकच सर्वमान्य दृष्टिकोन असू शकतो; मात्र इतर अनेक वेळा आम्ही विषयाशी संबंधित अनेक दृष्टिकोन मांडतो व त्यांतील एखाद्या दृष्टिकोनालाच "सत्य" किंवा "योग्य" म्हणून पुरस्कारण्याऐवजी ते त्या-त्या संदर्भांत नेमकेपणे सादर करतो. या उद्दिष्टानुसार, सर्व लेखांमधील माहिती पडताळण्याजोगी अचूक हवी : संदर्भस्रोत न नोंदवलेली सामग्री / आशय वगळला जाऊ शकतो; त्यामुळे संदर्भस्रोत जरूर नोंदवा. संपादकांचे वैयक्तिक अनुभव, अन्वयार्थ किंवा विचारसरणी यांना इथे स्थान नाही. त्यामुळे पडताळण्याजोगा व विश्वसनीय / अधिकारी संदर्भस्रोत नोंदवणे - विशेषकरून वादग्रस्त विषयांवर किंवा जिवंत व्यक्तींविषयी लिहिताना - अत्यावश्यक आहे. निष्पक्षपातीपणाबद्दल वाद उद्भवल्यास संबंधित लेखाच्या चर्चापानावर चर्चा करा किंवा चावडीवर तंटा मिटवण्यासाठी विषय मांडा.
 
Yellow pillar (3: Free) विकिपीडियावरील आशय मुक्त असून कोणीही त्याचे संपादन व वितरण करू शकते. प्रताधिकार कायदे पाळा व अन्य स्रोतांवरून उचलेगिरी करू नका. उचित वापर तत्त्वांतर्गत अ-मुक्त आशय वापरणे चालू शकत असले, तरीही, विकिपीडियावर तुम्ही लिहू/चढवू इच्छित असलेल्या आशयास, चित्रांना किंवा अन्य माध्यमी संचिकांना मुक्त पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही येथे केलेले योगदान सार्वजनिक वापरासाठी मुक्त परवान्यांतर्गत मोडत असल्यामुळे, एखाद्या लेखावर कुणाही संपादकाला हक्क सांगता येत नाही ; तुम्ही येथे केलेली सर्व संपादने बेधडकपणे संपादली किंवा बदलली, तसेच पुन्हा वितरली जाऊ शकतात.
 
Orange pillar (4: Code of conduct and etiquette) विकिपीडिया सदस्यांनी परस्परांशी आदराने व सभ्यतेने वागावे. विकिपीडियावरील अन्य सदस्यांशी मतभेद असले, तरीही आदराने व सौजन्याने व्यवहार करा. विकिपीडियावरील शिष्टसंकेत पाळा व वैयक्तिक हल्ले करू नका. सहमती साधा, संपादनयुद्धे टाळा आणि मराठी विकिपीडियावर मेहनत घ्यायला, चर्चा करायला ९६,१६३ लेख उपलब्ध आहेत, हे ध्यानात ठेवा. एखादा मुद्दा किंवा मत दामटण्यासाठी वादंग निर्माण करून विकिपीडिया ढवळून काढू नका; भल्या हेतूने वागा आणि इतर सदस्यही भल्या हेतूनेच विकिपीडियावर सामील होतात, असे गृहित धरा. स्वागतशील आणि दिलखुलास राहा.
 
Red pillar (5: Ignore all rules) विकिपीडियावर कडक नियम नाहीत. विकिपीडियावरील नियम काळ्या दगडावरील रेषा नव्हेत; त्यांचे मसुदे व अन्वयार्थ कालौघात बदलू शकतात. विकिपीडियावरील नियमांच्या शब्दश: रचनेपेक्षा, त्यातील मथितार्थ व त्यातून व्यक्त होणारी विकिपीडियाची मूलभूत तत्त्वे अधिक महत्त्वाची मानावीत. काही प्रसंगी विकिपीडियाच्या सुधारणेसाठी एखाद्या नियमाला अपवाद करावा लागू शकतो. लेख संपादताना बिनधास्त व्हा (मात्र बेपर्वा होऊ नका!); चुका घडण्याविषयी चिंता करू नका. तुमचे प्रयत्न निर्दोष आणि सर्वगुणसंपन्न असायलाच हवे, असे काही नाही. तुमच्या संपादनाआधीच्या लेखाच्या सर्व आवृत्त्या जतन केलेल्या असतात; त्यामुळे भरून न निघण्याजोगे नुकसान घडेल, अशी धास्ती बाळगू नका.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंदू तत्त्वज्ञानकराड उत्तर विधानसभा मतदारसंघविद्या माळवदेआमदारभारतीय जनता पक्षहिरडाजिल्हाधिकारीकेळकाळूबाई२०१४ लोकसभा निवडणुकाआईस्क्रीमपवनदीप राजनमांजरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारतीय रिझर्व बँकसप्तशृंगी देवीकोल्हापूर जिल्हासंदिपान भुमरेशिखर शिंगणापूरशिवाजी महाराजहिंदू धर्मभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्र दिनदक्षिण दिशादुसरे महायुद्धकडुलिंबमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय संविधानाचे कलम ३७०रामजी सकपाळसदा सर्वदा योग तुझा घडावाघोणसहनुमान जयंतीबडनेरा विधानसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रचिन्हकिशोरवयपु.ल. देशपांडेअकोला जिल्हाभगवानबाबाबाळराम सातपुतेमाढा लोकसभा मतदारसंघसाहित्याचे प्रयोजनसुधा मूर्तीनिवडणूकभाषाजीवनसत्त्वए.पी.जे. अब्दुल कलामदेवेंद्र फडणवीसगुढीपाडवाताराबाईसामाजिक समूहभारताचे पंतप्रधानकृष्णगोंधळअरिजीत सिंगइंदिरा गांधीलिंगभावबाबासाहेब आंबेडकरवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघधाराशिव जिल्हामराठी भाषा दिननाटकरायगड जिल्हाअर्थसंकल्पबारामती विधानसभा मतदारसंघब्रिक्सनरसोबाची वाडी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपारू (मालिका)शिल्पकलाअतिसारमहाराष्ट्रातील घाट रस्तेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)लोणार सरोवरमहाविकास आघाडीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा🡆 More