सुधा मूर्ती

सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.

विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.

सुधा कुळकर्णी-मूर्ती
सुधा मूर्ती
जन्म १९ ऑगस्ट १९५०
शिगगाव, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
शिक्षण अभियंता
प्रशिक्षणसंस्था बी.व्ही. भूमराद्दी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (बीव्हीबीसीईटी)
पेशा सामाजिक कार्य, अभियंत्रिकी, लेखिका
जोडीदार एन.आर. नारायण मूर्ती
अपत्ये रोहन मूर्ती (मुलगा), अक्षता मूर्ती (मुलगी).
नातेवाईक ऋषी सुनक (जावई)
पुरस्कार

 • पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००६),
 •  दान चिंतामणी अतिमब्बे पुरस्कार,

 • पद्मभूषण (इ.स. २०२३)

शैक्षणिक अर्हता

  • सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत.
  • त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक. ही पदवी आहे.

कामाचा अनुभव

सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात.

सामाजिक योगदान

त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या सर्व(?) शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.

सुधा मूर्ती यांचे प्रकाशित साहित्य

  • अस्तित्व
  • आजीच्या पोतडीतील गोष्टी
  • आयुष्याचे धडे गिरवताना
  • द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी)
  • कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
  • गोष्टी माणसांच्ता
  • जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
  • डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी)
  • तीन हजार टाके (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी)
  • थैलीभर गोष्टी
  • परिधी (कानडी) [1]
  • परीघ (मराठी)
  • पितृऋण
  • पुण्यभूमी भारत
  • बकुळ (मराठी)
  • द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
  • महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
  • वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी)
  • सामान्यांतले असामान्य (अनुवाद उमा कुलकर्णी) २०१७
  • सुकेशिनी
  • हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज (इंग्रजी)

पुरस्कार आणि सन्मान

  • इ.स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड )
  • इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार
  • इ.स. २००६ - भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
  • इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार
  • श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार.
  • इ.स. २०१० - एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार.
  • सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान
  • सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी
  • इ.स. २०२३ - भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:Commmonscat

Tags:

सुधा मूर्ती शैक्षणिक अर्हतासुधा मूर्ती कामाचा अनुभवसुधा मूर्ती सामाजिक योगदानसुधा मूर्ती यांचे प्रकाशित साहित्यसुधा मूर्ती पुरस्कार आणि सन्मानसुधा मूर्ती संदर्भसुधा मूर्ती बाह्य दुवेसुधा मूर्तीइन्फोसिसएन.आर. नारायणमूर्तीकर्नाटकगुरुराज देशपांडेजयश्री कुळकर्णी-देशपांडेश्रीनिवास कुळकर्णी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाळामहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्र पोलीसनकाशाकर्कवृत्तपेशवेसंख्याशिव जयंतीसावित्रीबाई फुलेभारताचा स्वातंत्र्यलढाबावीस प्रतिज्ञाविजयादशमीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेसर्वेपल्ली राधाकृष्णनसंयुक्त राष्ट्रेए.पी.जे. अब्दुल कलामवृत्तपत्रसंत तुकारामसीतावंजारीविधानसभा आणि विधान परिषदभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेहिरडाछगन भुजबळनागपूर लोकसभा मतदारसंघमच्छिंद्रनाथइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसप्तशृंगी देवीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशजेजुरीनाणेपाऊसविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसुरेश भटमुळाक्षरआंब्यांच्या जातींची यादीउंबरयादव कुळपाठ्यपुस्तकेकुटुंबभारताचे राष्ट्रपतीसविता आंबेडकरलोकसभा सदस्यशिल्पकलामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीतुळजाभवानी मंदिरश्रीरामनवमीकोल्हापूरलेस्बियनमण्यारविजयसिंह मोहिते-पाटीलदिंडोरी लोकसभा मतदारसंघजवसधाराशिव जिल्हाखो-खोचंद्रयान ३मूळव्याधपोहरादेवीस्थानिक स्वराज्य संस्थाव्हॉट्सॲपतापमानक्षय रोगअहवाल लेखनसांगली लोकसभा मतदारसंघबहावावर्धा लोकसभा मतदारसंघनाशिककुत्राकालभैरवाष्टकभाषाशुद्धलेखनाचे नियमहवामानप्रणिती शिंदेलिंगभावपटकथास्वस्तिक🡆 More