उभयलैंगिकता

उभयलैंगिकता म्हणजे नर व मादी दोघांप्रती, किंवा एकापेक्षा जास्त लिंगा प्रती असलेले प्रणयपुर्ण आकर्षण, लैंगिक आकर्षण किंवा लैंगिक वर्तन.

उभयलैंगिकता हा शब्द पुरुष आणि स्त्रिया दोघांबद्दलच्या प्रणयपुर्ण किंवा लैंगिक भावना दर्शविण्यासाठी, मुख्यतः मानवी आकर्षणाच्या संदर्भात वापरला जातो. ही संकल्पना लैंगिक प्रवृत्तीच्या तीन मुख्य वर्गीकरणांपैकी एक आहे जसे: विषमलैंगिकता आणी समलैंगिकता.

उभयलैंगिकता
उभयलिंगी अभिमान ध्वज

वैज्ञानिकांना लैंगिक प्रवृत्तीचे नेमके कारण माहित नाही, परंतु ते सिद्धांत सांगतात की हे अनुवांशिक, हार्मोनल आणि पर्यावरणीय प्रभावांच्या जटिल गुंतागुंतमुळे उद्भवले आहे, आणि ही एक निवड म्हणून त्या दृष्टीने पाहत नाहीत. लैंगिक अभिमुखतेच्या कारणास्तव अद्याप कोणत्याही एका सिद्धांताला व्यापक पाठिंबा मिळाला नाही, परंतु वैज्ञानिक जैविक दृष्ट्या आधारित सिद्धांतांना जास्त अनुकूल मानत आहेत.

उभयलैंगिकता विविध मानवी समाजात आणि इतरत्र प्राणी साम्राज्यात आढळली जाते. तथापि, उभयलिंगी हा शब्द, विषमलैंगिकता आणि समलैंगिकता या शब्दाप्रमाणेच १९व्या शतकात आला.

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असे नमूद करते की लैंगिक प्रवृत्ती सतत बदलत जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एखाद्याला केवळ समलैंगिक किंवा विषमलैंगिक असणे आवश्यक नसते, परंतु त्या दोघांचे वेगवेगळे अंश जाणवू शकतात. लैंगिक आवड एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात विकसित होते व वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात ज्याने त्यांच्या जीवनात असे मुद्दे दर्शवतात की ते भिन्नलिंगी, उभयलिंगी किंवा समलिंगी आहेत.

एक सामान्य समज आहे की प्रत्येकजण उभयलिंगी आहे (विशेषतः पुरुषांपेक्षा स्त्रिया), किंवा ती उभयलैंगिकता एक वेगळी ओळख म्हणुन अस्तित्वात नाही.

लोकसंख्याशास्त्र

उभयलिंगीपणासाठी लोकसंख्याशास्त्र अंदाज लावणाऱ्या अभ्यासाचे भिन्न परिणाम आहेत. १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या लैंगिक वर्तनावरील जॅनस अहवालात असे दिसून आले आहे की ५ टक्के पुरुष आणि ३ टक्के स्त्रिया स्वतःला उभयलिंगी मानतात आणि ४ टक्के पुरुष आणि २ टक्के स्त्रिया स्वतःला समलैंगिक मानतात. सर्व संस्कृतींमध्ये, उभयलिंगी वर्तनाच्या व्याप्तीत काही भिन्नता आढळते, परंतु समलैंगिक आकर्षणाच्या दरामध्ये बरेच भिन्नता असल्याचा कोणताही खात्री पटणारा पुरावा नाही.

समुदाय

इतर एलजीबीटी लैंगिकतेच्या लोकांप्रमाणेच, उभयलिंगी लोकांना बऱ्याचदा भेदभावाचा सामना करावा लागतो. होमोफोबियाशी संबंधित भेदभावाव्यतिरिक्त, उभयलिंगी लोकांना गेलेस्बियन समाजातील भेदभावांना सामोरे जावे लागते.

इतिहास

प्राचीन ग्रीक आणि रोमन लोक लैंगिक संबंध चांगल्या परिभाषित शिक्क्यां सोबत जोडत नव्हते जसे आधुनिक पाश्चात्य समाज करतो. पुरुषांवर प्रेम करणारे पुरुष समलैंगिक म्हणून ओळखले जात नव्हते आणि कदाचित त्यांच्या बायका किंवा इतर महिला प्रेमी पण असत.

मीडिया

उभयलैंगिकता दाखवणारे अनेक चित्रपट आहेत जसे कि ब्रोकबॅक माउंटन (२००५), कॉल मी बाय युअर नेम (२०१७).

ॲंजेलिना जोली ही एक खुलेआम उभयलिंगी अमेरिकन अभिनेत्री आहे.

संदर्भ

Tags:

उभयलैंगिकता लोकसंख्याशास्त्रउभयलैंगिकता समुदायउभयलैंगिकता इतिहासउभयलैंगिकता मीडियाउभयलैंगिकता संदर्भउभयलैंगिकताविषमलैंगिकतासमलैंगिकता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)पश्चिम दिशामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)सायबर गुन्हातुळजापूरमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदानांदेड लोकसभा मतदारसंघइंदिरा गांधीज्ञानेश्वरएकपात्री नाटककावीळकार्ल मार्क्सकेंद्रशासित प्रदेशजगातील देशांच्या राजधान्यांची यादीनाशिक लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदाहिंदू धर्मातील अंतिम विधीहोमी भाभारविकिरण मंडळहडप्पा संस्कृतीरयत शिक्षण संस्थाभारतीय जनता पक्षसरपंचसावित्रीबाई फुलेहिंगोली लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीधृतराष्ट्रवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेवनस्पतीशिक्षणस्त्रीवादभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीचोखामेळाभारतातील जागतिक वारसा स्थानेदत्तात्रेयहनुमान जयंतीसंत तुकारामविराट कोहलीवि.स. खांडेकरकादंबरीटरबूजज्योतिर्लिंगराहुल गांधीस्वामी समर्थअकोला लोकसभा मतदारसंघऔरंगजेबकोल्हापूर लोकसभा मतदारसंघश्रीपाद वल्लभसदा सर्वदा योग तुझा घडावासेवालाल महाराजसकाळ (वृत्तपत्र)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षबीड लोकसभा मतदारसंघदेवनागरीउमरखेड विधानसभा मतदारसंघखाजगीकरणकराड उत्तर विधानसभा मतदारसंघकलाप्रहार जनशक्ती पक्षप्रतापगडभाषामहेंद्र सिंह धोनीओमराजे निंबाळकरकोल्हापूरजालना जिल्हादीपक सखाराम कुलकर्णीआंबेडकर जयंतीहिंदू तत्त्वज्ञानमांजररामदास आठवलेविनयभंगभारूडमुळाक्षरपरातगुळवेलयूट्यूब🡆 More