सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.
त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. त्यांची अनेक राज्ये, शहरे व भरभराटीला आलेल्या संस्कृती व भाषा होत्या.
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. नंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९० टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.
आज त्यांच्या अनेक भाषा व संस्कृती या लुप्त झालेल्या आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
आजही संपूर्ण अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आज त्यांच्या अनेक जमाती आहेत. अमेरिका देशातील त्यांची लोकसंख्या २,७८६,६५२ म्हणजे संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या केवळ १% इतकी आहे. (२००३ जनगणना). इतर देशांतील त्यांची टक्केवारी बरीच जास्त आहे.
युरोपियन स्थलांतरानंतर त्यांना आपली संपन्न भूमी गमवावी लागली, अनेक जुलुमांना बळी पडावे लागले व छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. अनेक आरक्षित क्षेत्रे ही कोरड्या हवामानाची असल्यामुळे तिथे पुरेसे अन्न पिकत नाही.
नवाजो, चेरोकी, चॉक्टॉ, लखोटा, चिप्पेवा, आय्मारा, क्वेचुआ, एस्किमो, इनुइट, मापुचे, नाहुआ, माया या काही मूळ अमेरिकन जमाती आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article मूळचे अमेरिकन लोक, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.