अमेरिकेची संयुक्त संस्थाने

अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे.

त्याला अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स (संयुक्त संस्थाने) या नावानींही ओळखले जाते.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अमेरिका
United States of America
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अमेरिकाचा ध्वज अमेरिकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: E Pluribus Unum (पारंपरिक; अर्थ : विविधतेत एकता)
In God We Trust (अधिकृत, १९५६ पासून)
राष्ट्रगीत: स्टार स्पॅंगल्ड बॅनर
अमेरिकाचे स्थान
अमेरिकाचे स्थान
अमेरिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी वॉशिंग्टन डी.सी.
सर्वात मोठे शहर न्यू यॉर्क शहर
अधिकृत भाषा इंग्लिश भाषा
इतर प्रमुख भाषा इंग्रजी
सरकार संघीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जोसेफ बायडेन, जुनियर (राष्ट्राध्यक्ष)
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
जुलै ४,१७७६ (घोषित)
सप्टेंबर ३, १७८३ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ९६,३१,४२० किमी (४वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.८७
लोकसंख्या
 - २०१० ३४,११,९५,००० (३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.२८ निखर्व अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,३९९ अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर (USD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -५ ते -१०/ -४ ते -१० तास
आय.एस.ओ. ३१६६-१ US
आंतरजाल प्रत्यय .us, .gov, .edu, .mil, .um
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +१
[[Image:
|300px|center|राष्ट्र_नकाशा]]


अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.

अमेरिकन डॉलर हे अमेरिकेचे चलन आहे.

इतिहास

सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. असे असले तरी अमेरीका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता.

१९ नोव्हेंबर १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळेयुरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९५ टक्के मूळचे अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.

४ जुलै, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागलेली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चिनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून अमेिका उदयास आली.

याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धीने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्नधान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस, तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून आफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्धत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वतःची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अशा प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.

सन १८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडील शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा सशस्त्र विरोध मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजित गृहयुद्धात झाली. याला अमेरिकन यादवी युद्ध असे म्हणतात. अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवित हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे झाले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धावर नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगिरी हळूहळू सर्व राज्यांत संपवण्यात आली. युरोपप्रमाणेच अमेरिकेने उद्योगीकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.

प्रशासकीय संरचना

अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर बहुतांशी एकसंध देशाची, प्रशासकीय उद्देशाने, भाषावार रचना आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन राज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वातंत्र्याच्या वेळेस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात या संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला.

अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक अश्या पातळ्यांमध्ये विभागलेले आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वक ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे.

राष्ट्राध्यक्ष

५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिकेचा) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यांत विभाजित झाली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डाकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.

प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.

राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल ४ वर्षे असून, राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर दोन पूर्ण कार्यकालांहून अधिक वेळ राहू शकत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिले आहे.

काँग्रेस

अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिकेतील) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.

काँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार काँग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युद्धाची घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.

दोनही सभागृहांचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथील 'कॅपिटॉल' नावाच्या इमारतीत आहे.

५० राज्ये

संयुक्त अमेरिका देशात ५० राज्ये (संस्थाने) आहेत. ह्यांपैकी अलास्काहवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. डेलावेर हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ चौरस मैल, १७,१७,८५४ चौरस किमी आकारमानाचे) तर ऱ्होड आयलंड हे सर्वांत लहान (१,५४५ चौरस मैल, ४,००२ चौरस किमी आकारमानाचे) राज्य आहे. कॅलिफोर्निया हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर वायोमिंग हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे.

प्रत्येक राज्य हे अनेक काउंट्यामध्ये (किंवा तत्सम प्रशासकीय प्रभागात) विभागलेले असते. प्रत्येक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असते. पन्नास राज्यांमध्ये एकूण ३,००७ काउंट्या आहेत. यांशिवाय २३६ काउंटी स्तराचे प्रभाग आहेत.

अर्थव्यवस्था

अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात जगात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगीकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वतःला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २०व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा जगात तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शवतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची भांडवलशाही (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तीजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये सबप्राईम संकटानंतर लेहमन ब्रदर्स या मोठ्या कंपनीने दिवाळखोर जाहीर केले व त्यानंतर आलेल्या मंदीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य विम्याच्या बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे.

वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचे प्रचंड आकारमान कारणीभूत आहे. राज्यांचे आकारमान व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनिक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. शिवाय हवामानही थंड असल्याने विसाव्या शतकात मोटारगाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स ही अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत जर्मन व जपानी गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वांत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यांत शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. अमेरिका हा देश शस्त्रांस्त्रांचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

वस्तीविभागणी

    मुख्य पाने: अमेरिकेची वस्तीविभागणी व अमेरिकेला स्थलांतर
अमेरिकेची संयुक्त संस्थाने 
२००० साली अमेरिकेतील राहणाऱ्या लोकांची मूळ देशानुसार विभागणी

अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे. पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्येच्या वाढीचा वार्षिक दर ०.८९% आहे. जन्मदर दरहजारी १४.१६ आहे. २००७ च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणारे बहुसंख्या मेक्सिकन आहेत. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे असा जगातील प्रगत देशांतील अमेरिका हा एकमेव देश आहे.

क्रीडा

    मुख्य पान: अमेरिकेतील क्रीडा
अमेरिकेची संयुक्त संस्थाने 
फुटबॉलचा खेळाडू सहकाऱ्याला पास देताना

१९ व्या शतकापासून बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेन विद्यार्थ्यांमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. मुष्टियुद्ध व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय वैयक्तिक खेळा होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रिय आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसचीपण लोकप्रियता बरीच आहे.

अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डिंग, स्नोबोर्डिंग चिअरलीडिंग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच त्या स्पर्धांत कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत. तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..

अमेरिकेवरील मराठी पुस्तके

  • अमेरिकी राष्ट्रपती (अतुल कहाते)
  • पुन्हा यांकीजच्या देशात (डाॅ. अच्युत बन)

पर्यटन स्थळे

नायगारा धबधबे (नायगारा फॉल्स)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थाने इतिहासअमेरिकेची संयुक्त संस्थाने प्रशासकीय संरचनाअमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षअमेरिकेची संयुक्त संस्थाने काँग्रेसअमेरिकेची संयुक्त संस्थाने ५० राज्येअमेरिकेची संयुक्त संस्थाने अर्थव्यवस्थाअमेरिकेची संयुक्त संस्थाने वस्तीविभागणीअमेरिकेची संयुक्त संस्थाने क्रीडाअमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिकेवरील मराठी पुस्तकेअमेरिकेची संयुक्त संस्थाने पर्यटन स्थळेअमेरिकेची संयुक्त संस्थाने संदर्भ आणि नोंदीअमेरिकेची संयुक्त संस्थानेउत्तर अमेरिकासंयुक्त संस्थाने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महादेव गोविंद रानडेविनयभंगशिरसाळा मारोती मंदिरशिवाजी गोविंदराव सावंतभारताची जनगणना २०११भारतीय प्रजासत्ताक दिनविमाजळगाव जिल्हाकडुलिंबमराठी नावेमावळ लोकसभा मतदारसंघसामाजिक कार्यतिरुपती बालाजीहिमालयनामदेवज्योतिबाधनुष्य व बाणकर्करोगजागतिक व्यापार संघटनाबीड विधानसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षकल्याण लोकसभा मतदारसंघपृथ्वीवसंतराव दादा पाटीलनर्मदा परिक्रमामूलद्रव्यमहाराष्ट्रउष्माघातप्रणिती शिंदेसोनारमहाभारतजिल्हाधिकारीमाहिती अधिकारऋतुराज गायकवाडराजकारणतुळजापूरभारताची अर्थव्यवस्थासमीक्षाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसर्वनाममहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)संयुक्त महाराष्ट्र चळवळमुळाक्षरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबावीस प्रतिज्ञाबृहन्मुंबई महानगरपालिकासुप्रिया सुळेक्रिकेट मैदानठाणे लोकसभा मतदारसंघनेहरू युवा केंद्र संघटनबखरकन्या रासयूट्यूबभूकंपाच्या लहरीबीड जिल्हाशांता शेळकेसदा सर्वदा योग तुझा घडावासरपंचमुंबई उच्च न्यायालयएकनाथअभंगरामोशीमहावीर जयंतीकाळभैरवस्त्री सक्षमीकरणकळसूबाई शिखरनवनीत राणामहाराष्ट्रातील घाट रस्तेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकरवंदरयत शिक्षण संस्थायोनीत्रिरत्न वंदनामांजरस्वरएकविरामाहितीगणपती🡆 More