सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे (जन्म: पाडोळी - मुरुड, ८ नोव्हेंबर, इ.स.

१९७६/ १९८४) ह्या एक वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.

सुषमा अंधारे
जन्म ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६/८४
पाडोळी (कळंब तालुका)
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम.ए., बी.एड., पीएचडी
पेशा वकील, सामाजिक कार्यकत्या, बौद्ध कार्यकर्त्या, स्त्रीवादी अभ्यासक
राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धर्म बौद्ध धर्म
वडील दत्ताराव गूत्ते
नातेवाईक दगडू अंधारे (आजोबा)

शिवसेनेच्या (ठाकरे गट) २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते.

सुरुवातीचे जीवन

सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी कळंब तालुक्यातील 'पाडोळी' (जिल्हा - उस्मानाबाद) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.

सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गुट्टे हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.

सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी खडी बोली सहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत.[ संदर्भ हवा ] महात्मा फुले-शाहू महाराजबाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.

व्यक्तिगत जीवन

सुषमा अंधारे बौद्ध आहेत. त्या कबीर पंथीय आहेत.

त्यांनी २ ऑक्टोबर, २००६ रोजी भदंत नागार्जुन सुरई ससाई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व 'उपरा'कार लक्ष्मण माने, एकनाथ आवाड यांच्यासह बौद्धधर्माची दीक्षा घेतली.[ दुजोरा हवा]

कारकीर्द

व्यावसायिक कारकीर्द

सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र इ.स. २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.

सामाजिक कारकीर्द

लातूर जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.

सुषमा अंधारे या 'भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या' प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.[ संदर्भ हवा ] भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.

राजकीय कारकीर्द

इ.स. २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.[ संदर्भ हवा ]

२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आणि पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली. यापुर्वी त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या.

तथापि शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्या गणराज्य संघात कार्यरत होत्या आणि त्यांनी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. मात्र या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला नाही. ऑक्टोबर २०२२ च्या एका मुलाखतीत अंधारे यांनी म्हटले की, "लोक मला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याचे बोलतात. मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्य देखील नव्हते. शिवसेना हा माझा पहिलाच पक्ष असून दसरा मेळाव्यातील माझं पहिलंच राजकीय भाषण होतं."

लेखन

सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा कविता संग्रह इ.स. २०१० मध्ये पुण्यातील देवाशिष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.[ संदर्भ हवा ] शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह कोल्हाटी जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.

पुरस्कार व सन्मान

  • धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने.
  • भीमरत्‍न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच उत्तम खोब्रागडे यांच्या हस्ते प्रदान.
  • सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.
  • बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

सुषमा अंधारे सुरुवातीचे जीवनसुषमा अंधारे व्यक्तिगत जीवनसुषमा अंधारे कारकीर्दसुषमा अंधारे लेखनसुषमा अंधारे पुरस्कार व सन्मानसुषमा अंधारे हे सुद्धा पहासुषमा अंधारे संदर्भसुषमा अंधारेआंबेडकरी चळवळपाडोळी (कळंब)राज्यशास्त्रसमाजशास्त्रस्त्रीवाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्र शासनपरभणी विधानसभा मतदारसंघमोबाईल फोननागरी सेवाआदिवासीभारतीय चित्रकलाट्विटरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारताची अर्थव्यवस्थाप्रहार जनशक्ती पक्षसूर्यनमस्कारसात आसरान्यूझ१८ लोकमतशिवाजी महाराजांचा जीवनक्रमचंद्रशेखर वेंकट रामनकोल्हापूर जिल्हागोपाळ हरी देशमुखद प्रॉब्लम ऑफ द रूपीपंचायत समितीसंधी (व्याकरण)जिंतूर विधानसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीकेदारनाथ मंदिरलोकशाहीमूलद्रव्यमहाराष्ट्रातील किल्लेनवनीत राणामहाराष्ट्रातील लोककलाबाराखडीपुरातत्त्वशास्त्रराज्य निवडणूक आयोगकोल्हापूरहस्तकलादिनकरराव गोविंदराव पवारकावीळभारताची संविधान सभामहादेव जानकरजालना लोकसभा मतदारसंघनिलेश साबळेलावणीगुरू ग्रहसातवाहन साम्राज्यलखनौ करारसंत जनाबाईलातूर लोकसभा मतदारसंघमुंबईयशवंत आंबेडकरनाणकशास्त्रतेजस ठाकरेमुंबई उच्च न्यायालयमहाराष्ट्र गीतपारिजातकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९आणीबाणी (भारत)पेशवेहोमरुल चळवळगोपाळ गणेश आगरकरवर्णमालावर्ण२०१४ लोकसभा निवडणुकापानिपतची पहिली लढाईझाडचोखामेळातुतारीजय श्री रामभारतातील शेती पद्धतीउत्तर दिशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघब्रिक्सऔद्योगिक क्रांतीअहमदनगर लोकसभा मतदारसंघखिलाफत आंदोलनहवामानहैदरअलीभारताचे राष्ट्रपतीकला🡆 More