लोणी

दुधावर आलेल्य स्निग्ध सायीला एखाद्या आंबट पदार्थाचे, साधारणपणे आंबट दह्याचे, विरजण लावले की सायीचे दही बनते.

असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.

थालीपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेवून खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.

दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे.

असेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात.


उत्पादन

औद्योगिक उत्पादन

प्रकार

इतिहास

दुधाच्या या अल्प भागाचे संहतीकरण (एकत्रीकरण) करण्यास आणि त्याचा साठविण्यासारखे व उच्च ऊर्जायुक्त अन्न म्हणून उपयोग करण्यास मानव केव्हा वा कोठे शिकला हे अज्ञात आहे परंतु याची सुरुवात पशुसंवर्धनाच्या इतिहासपूर्व कालीन टप्प्यात झाली असावी, असा अंदाज आहे. खाद्यपदार्थाच्या (उदा., पावाच्या) पृष्ठभागावर लावण्यासाठी व पाकक्रियेतील एक वसा म्हणून लोण्याचा निश्चितपणे दीर्घकाळ उपयोग होत आहे. उत्तर यूरोप, उत्तर अमेरिका व ओशिॲनिया या प्रदेशांत व यूरोपीय लोकांनी स्थलांतर केलेल्या प्रदेशांत लोणी ही आवडती खाद्य वसा म्हणून लोकप्रिय आहे. लोण्याचे बरेचसे उत्पादन या प्रदेशांत होते परंतु काही इतर प्रदेशांत (विशेषतःभारतात) त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो.

आपल्या लोण्याविषयीच्या आवडीची प्राचीन हिंदूंनी ३५०० वर्षापूर्वीच नोंद केलेली आढळते. श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये लोण्याचा (नवनीताचा) निर्देश अनेकदा आलेला आहे. बायबलमध्ये लोण्यासंबंधी कित्येक निर्देश आढळतात. प्राचीन ग्रीक व रोमन लोक लोण्याचा उपयोग अन्न म्हणून करण्याबरोबरच केसांना लावण्यासाठी तसेच मलम व औषध म्हणून करीत असत. रोमन लोक ताज्या लोण्यापेक्षा खवट लोण्याची चव पसंत करीत असत.

व्यापारी लोणी तीन रूपांत उपलब्ध असते. गोड लोणी (स्वीट बटर) किंवा मीठरहित लोणी बऱ्याच प्रदेशांत लोकिप्रिय आहे. ते गोड ⇨पाश्चरीकरण केलेल्या मलईपासून मीठ न घालता तयार करतात. गोड मलई लोणी (स्वीट क्रीम बटर) हेही गोड, पाश्चरीकरण केलेल्या मलईपासून पण मीठ घालून तयार करतात. व्हिप्ड लोणी तयार करताना गोड लोण्याचा किंवा गोड मलई लोण्याचा हवेशी वा अल्प अक्रिय वायूशी संयोग करून लोणी अधिक सुलभपणे पसरेल व त्याचे घनफळ वाढेल असे करतात

लोण्याच्या लादीचे आकार

साठवणूक व पाककृती

आरोग्य

  • मुळव्याधीवर ताजे लोणी उपयुक्त आहे असे म्हणतात.लोणी पित्तवर्धक आहे. त्याच्या सेवनाने डोळ्यांचे आलोचक पित्त वाढते. त्यामुळे लोणी नियमित सेवन करणाऱ्याला चष्मा लागत नाही व पर्यायाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

संदर्भ

बाह्य दुवे

लोणी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Cookbook साचा:Wiktionary

Tags:

लोणी उत्पादनलोणी प्रकारलोणी इतिहासलोणी लोण्याच्या लादीचे आकारलोणी साठवणूक व पाककृतीलोणी आरोग्यलोणी संदर्भलोणी बाह्य दुवेलोणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पेशवेपुणेविनयभंगभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघनक्षलवादवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्मवाघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारप्रतापगडभारतीय संस्कृतीपहिले महायुद्धभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तअहिल्याबाई होळकरवर्णनात्मक भाषाशास्त्रअध्यक्षकाळूबाईटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीउत्पादन (अर्थशास्त्र)कावळानामदेवशास्त्री सानपरावणराम गणेश गडकरीअमरावती लोकसभा मतदारसंघआर्थिक विकासन्यूटनचे गतीचे नियमगोदावरी नदीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)दत्तात्रेयसरपंचशेकरूहनुमान जयंतीसतरावी लोकसभास्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमहाबळेश्वरभारताची जनगणना २०११संभोगमाती प्रदूषणमहाराष्ट्रातील आरक्षणसंजीवकेईशान्य दिशाराहुल कुलपंकजा मुंडेराणाजगजितसिंह पाटीलजैवविविधताकरचाफादुसरे महायुद्धवसंतराव दादा पाटीलदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेगर्भाशयआकाशवाणीशीत युद्धभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीनांदेड जिल्हाबच्चू कडूआनंद शिंदेजोडाक्षरेसाईबाबाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९वसंतराव नाईकभाषा विकाससूर्यमालाभाषालंकारआरोग्यकडुलिंबसदा सर्वदा योग तुझा घडावादिल्ली कॅपिटल्समानवी शरीरलोकशाहीमहाड सत्याग्रहहिरडाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रताराबाईराज्यसभा🡆 More