नीरज चोप्रा: भारतीय भालाफेकपटू

नीरज चोप्रा हे भारतीय भाला फेक पटू आहेत.

७ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके गोळा केली आहेत. २०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.त्याने फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१३ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेक मध्ये ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.

नीरज चोप्रा
नीरज चोप्रा: पार्श्वभूमी, कारकीर्द, पुरस्कार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद नीरज चोप्राला खेलरत्न पुरस्कार प्रदान करताना (२०२१)
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव नीरज चोपडा (चोप्रा)
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान पानिपत, हरियाणा
जन्मदिनांक २४ डिसेंबर, १९९७ (1997-12-24) (वय: २६)
जन्मस्थान पानिपत, हरियाणा
उंची 179 cm
वजन 86 kg
खेळ
देश भारत
खेळ मैदानी खेळ
खेळांतर्गत प्रकार भालाफेक
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर भाला फेक
सर्वोच्च जागतिक मानांकन भालाफेक 2020 सुवर्ण पदक व 2022मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला

पार्श्वभूमी

नीरज चोप्राचा जन्म खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा येथे झाला. त्याचे शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली.

नीरज चोप्राचे मूळ आडनाव चोपडे आहे. चोपडे हरियाणातील पानिपत येथील रोड मराठा समाजातून येतात. रोड मराठा हा तोच समाज आहे जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर देखील हरियाणातल्या पानिपत सोनिपतकडच्या भागात वस्ती करून राहिला.

कारकीर्द

२०२२ जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा

नीरज चोप्राने २०२२ मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत ८८.१३ मीटरपर्यंत भला फेकून रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. एकंदरीत या स्पर्धेत पदक मिळवणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्ज हिने २००३ साली लांब उडीमध्ये कांस्य पदक मिळवले होते.

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळ टोकियो

नीरज चोप्राने २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भला फेकून सुवर्णपदक जिंकले, हे भारतीय खेळाडूने जिंकलेले ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. आतापर्यंत वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा फक्त दुसरा भारतीय आहे. ह्या आधी ११ ऑगस्ट २००८ रोजी अभिनव बिंद्राने २००८ च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या १० मीटर एर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

२०१८ राष्ट्रकुल खेळ

२०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.

२०१८ आशियाई खेळ

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान त्यांना मिळाला. आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले.

पुरस्कार

  • २०१८ मध्ये भारत सरकारतर्फे नीरजला अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
  • २०२१ मध्ये नीरजला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.
  • २०२२ मध्ये नीरजला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ

Tags:

नीरज चोप्रा पार्श्वभूमीनीरज चोप्रा कारकीर्दनीरज चोप्रा पुरस्कारनीरज चोप्रा संदर्भनीरज चोप्राअभिनव बिंद्राफ्रान्ससुवर्णपदक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नांदेड जिल्हासिंधुताई सपकाळमुंबईभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्रातील आरक्षणराजाराम भोसलेबारामती लोकसभा मतदारसंघकाळभैरवबलवंत बसवंत वानखेडेब्राझीलची राज्येहिंदू धर्मातील अंतिम विधीबच्चू कडूसंत जनाबाईबुद्धिबळदक्षिण दिशाअक्षय्य तृतीयावसंतराव नाईकभाषा विकासशेवगाबुलढाणा विधानसभा मतदारसंघचोळ साम्राज्यहडप्पा संस्कृतीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११लोकसंख्याआंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यटनअमोल कोल्हेमिलानयवतमाळ जिल्हारमाबाई रानडेजागतिक कामगार दिनवाघवायू प्रदूषणपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामाहितीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीलोकगीतवंचित बहुजन आघाडीअण्णा भाऊ साठेअध्यक्षमहाराष्ट्रातील पर्यटनक्रिकेटचा इतिहासभारताचे पंतप्रधानगुढीपाडवामिरज विधानसभा मतदारसंघपु.ल. देशपांडेमराठी भाषा दिनमहासागरभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितानिलेश लंकेभोपाळ वायुदुर्घटनामराठी भाषा गौरव दिनबसवेश्वरसम्राट हर्षवर्धनरामायणपेशवेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकिरवंतप्रेमपृथ्वीचे वातावरणवि.स. खांडेकरमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसिंहगडजवाहरलाल नेहरूभारतीय रिझर्व बँकवि.वा. शिरवाडकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकविधान परिषदमराठी लिपीतील वर्णमालाआंब्यांच्या जातींची यादीभारतीय संसदराज्यशास्त्रशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पोक्सो कायदापारू (मालिका)दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाहातकणंगले विधानसभा मतदारसंघइंदिरा गांधी🡆 More