एरंड

एरंड (इंग्लिश : कॕस्टर् बीन् प्लॕन्ट् / Castor bean plant; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.

" | एरंड
एरंड
" | शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: Euphorbiaceae

उत्पत्तीस्थान

भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.

वर्णन

एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.
पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.
फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.
बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.

प्रकार

रंगावरून प्रकार

  1. पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात.
  2. तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.

आयुष्यानुसार प्रकार

  1. वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड.
  2. दीर्घवर्षायू - बरीच वर्षे जगणारे, मोठ्या आकाराचे बी व फळे असणारे झाड.

चवीनुसार प्रकार

  1. गोड.
  2. कडू.

उपयोग

आयुर्वेदात एरंडाचा उपयोग होतो.

वातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सूज येणे, कृमि होणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केल्या जातो. प्राचीन काळी, एरंडेल तेलाचा वापर दिव्यांना इंधन देण्यासाठी, डोंळयांची जळजळ यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आणि गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी देखील केला जात असे एरंडाची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

  • वातनाशक, वेदनाशामक,सुजनाशक असल्याने एरंडाचे तेल चोळण्यासाठी वापरतात.
  • दुखणाऱ्या भागावर एरंडाची पने गरम करून बांधतात.
  • एरंडाच्या बिया, गाईचे तूप अ भीमसेन कापूर यांच्या योग्य मिश्रणाने तयार केलेले काजळ डोळे आल्यास वापरतात.

एरंडापासून बनणारी औषधे

  • एरंडेल तेलावर परतलेले हिरडा चूर्ण म्हणजे गंधर्व हरितकी. एरंडाची पाने खूप खूप मुलायम म्हणजे गंधर्वाच्या तळहातासारखी असतात. म्हणून या चूर्णाला गंधर्व हरितकी चूर्ण असे नाव स्वाभाविकपणे पडले आहे.
  • एरंडपाक
  • एरंडाची लापशी : ज्यांना एरंडेल तेलाचा नॉशिया आहे त्यांच्यासाठी ताज्या एरंड बियांची साले काढून, त्या बिया दुधात वाटून थोडे साखर व तूप टाकून लापशी करतात.
  • एरंडेल तेलाने आतड्यातील श्लेष्मल त्वचेस मृदुपणा येतो व त्यामुळे मळाच्या गाठी सैल होऊन खाली निसटतात. एरंडेल तेलाचे कार्य लहान आतड्यावर होत असते.
  • एरंडेल तेलाबरोबर आल्याचा रस हे अनुपान आहे.
  • एरंडाच्या बियापासून तेल काढतात.
  • याचा उपयोग वेदनाशमक म्हणून केला जातो. खोकला, कफ,आमवात, मुतखडा,ताप अशा अनेक रोगांवर एरंडाचा उपयोग केला जातो. आयुर्वेदात सुद्धा एरंडाचा विशिष्ट मात्रेत उपयोग केला जातो.

इतर माहिती: एरंडाचा उपयोग इतर पदार्थनिर्मितीसाठी सुद्धा होतो; त्यामुळे एरंड या झाडाचे पांढरा व तांबडा असे दोन प्रकार आहेत. एक जोडधंदा ,म्हणून शेतकरी लोक एरंडाची लागवड करून, याचा उपयोग करतात.

चित्रदालन

मोगली एरंड

हे एक वेगळेच औषधी झाड आहे. याच्या खोडा-पानांना चीक असल्याने जनावरे याला तोंड लावत नाहीत. म्हणून मोगली एरंडाची (Jatropa curcus) झाडे कुंपणावर लावतात.

हे सुद्धा पहा

Tags:

एरंड उत्पत्तीस्थानएरंड वर्णनएरंड प्रकारएरंड उपयोगएरंड ापासून बनणारी औषधेएरंड चित्रदालनएरंड मोगली एरंड हे सुद्धा पहाएरंडइंग्लिश भाषालॅटिन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गणेश चतुर्थीवर्तुळपालघर जिल्हाकळसूबाई शिखरशिवराम हरी राजगुरूदादाजी भुसेस्वामी विवेकानंदकबूतरचार्ल्स डार्विनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशाहीर साबळेइ.स. ४४६पसायदानअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदक्रांतिकारकसत्यशोधक समाजसंगणक विज्ञानभूकंपबाजी प्रभू देशपांडेबौद्ध धर्मचाफाबखरपुणे करारकडधान्यकुणबीनिवृत्तिनाथशिवाजी महाराजभारतीय संस्कृतीकोरफडमहाराष्ट्रातील नद्यांची यादीहिंदू धर्मशिक्षणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५रतिचित्रणरेबीजकडुलिंबकेंद्रशासित प्रदेशअंधश्रद्धामहारवनस्पतीहोमी भाभाहरितक्रांतीहैदराबाद मुक्तिसंग्राममोरआर्द्रतामेळघाट व्याघ्र प्रकल्पपुणे जिल्हाज्ञानेश्वरखंडोबाचंद्रगुप्त मौर्यजपानसत्यकथा (मासिक)कुपोषणमोगरापंचांगगृह विभाग, महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळआकाशवाणीमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पअटलांटिक महासागरजी-२०भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेहनुमान चालीसामहादेव गोविंद रानडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभरती व ओहोटीक्रिकेटचा इतिहासअशोक सराफबहिणाबाई चौधरीनारळशिव जयंतीतरसमौर्य साम्राज्यतुळजाभवानी मंदिरफुटबॉलदालचिनी🡆 More