शिव जयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.

हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

शिवजयंती
शिव जयंती
औरंगाबाद मधील क्रांतिचौकात

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना

छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त, १९ फेब्रुवारी २०१९
अधिकृत नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती
इतर नावे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव
साजरा करणारे महाराष्ट्रातील प्रजा
प्रकार सामाजिक
उत्सव साजरा एक दिवस
दिनांक १९ फेब्रुवारी
वारंवारता वार्षिक

इतिहास

शिव जयंती

१८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाउन पोहोचला.

बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. देउस्कर जन्माने महाराष्ट्रीय परंतु बंगालमधे स्थायिक होते. पुढे १९०५ मधे जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल फाळणीचा प्रस्ताव आणला तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला. शिवरायांच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली. तसेच महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यात एकोपा तयार होण्यास बरीच मदत झाली.

रवींद्रनाथ टागोर यांनीही त्याकाळी 'शिवाजी उत्सव' नावाची कविता लिहून शिवाजी महाराजांची स्तुती केली. त्यांच्या त्या कवितेत ते म्हणतात - हे शिवाजीराजा हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात स्फुरला तेव्हा माझी बंगभूमी मूक राहिली. पण तुम्ही दिलेला स्वातंत्र्यप्रेरकतेचा मंत्र कायम आमच्या मनात तेवत राहील.

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. ३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.

जन्मतारीख वाद

महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.

उद्देश

शिव जयंती
शिवजयंती सार्वजनिक उत्सव

शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.

हे सुद्धा पहा

शिव जयंती

Tags:

शिव जयंती इतिहासशिव जयंती जन्मतारीख वादशिव जयंती उद्देशशिव जयंती हे सुद्धा पहाशिव जयंती संदर्भशिव जयंतीछत्रपती शिवाजी महाराजफेब्रुवारी १९मराठा साम्राज्यमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात आसराएकांकिकामहाराष्ट्रज्ञानपीठ पुरस्कारदीपक सखाराम कुलकर्णीअजिंठा लेणीपरशुरामनारळझांजआंब्यांच्या जातींची यादीभारताची अर्थव्यवस्थाआकाशवाणीप्रेमानंद गज्वीसंशोधनमुरूड-जंजिराअहिराणी बोलीभाषाअर्जुन पुरस्कारआवळाअजिंठा-वेरुळची लेणीलोकगीतग्रामदैवतभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याभारताची फाळणीभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७विराट कोहलीनेतृत्वअर्थशास्त्रराशीमहात्मा गांधीसिंहगडजगदीश खेबुडकरज्योतिर्लिंगहिंदू धर्मातील अंतिम विधीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशिव जयंतीपाणीमहाराष्ट्राचे राज्यपालज्ञानेश्वरीविमास्त्रीशिक्षणमहेंद्र सिंह धोनीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तवसंतराव नाईकराष्ट्रीय स्वयंसेवक संघसोवळे (वस्त्र)कांजिण्यामराठी भाषा गौरव दिनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रविशेषणबहिष्कृत भारतभारत सेवक समाजजलप्रदूषणमहाराष्ट्र पोलीसमानवी हक्कसचिन तेंडुलकरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धध्वनिप्रदूषणऔरंगजेबभीमराव यशवंत आंबेडकरसंजय हरीभाऊ जाधवकृष्णहस्तमैथुनतेजस ठाकरेए.पी.जे. अब्दुल कलामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामौद्रिक अर्थशास्त्रजहांगीरघुबडभीमा नदीभारतीय रेल्वेसूर्यजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येमराठीतील बोलीभाषाशेतकरी कामगार पक्षपुस्तकपश्चिम दिशा🡆 More