मोर

मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे.

या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे मोराचा नाच हा प्रेशणीय असतो. गोव्यात मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात.

मोर
भारतीय मोर
भारतीय मोर
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
जातकुळी: पावो
इतर प्रकार

पावो क्रिस्टॅटस (भारतीय मोर)
पावो म्युटिकस (हिरवा मोर)
आफ्रोपावो काँगेंसिस (आफ्रिकन मोर)

मोराचे एकूण मुख्य तीन प्रकार आढळतात; दोन आशियाई प्रजाती, भारतीय उपखंडातील भारतीय मोर आणि दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर; तसेच आफ्रिकेच्या काँगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर.

खाद्य

मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात.

वास्तव्य

मोर पानझडी जंगलांत व अरण्यात राहतात व ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात.

महाराष्ट्रात मोरांचे स्थान

महाराष्ट्रात बऱ्याच गावांजंलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हा पक्षी सरस्वती देवीचे वाहन आहे अशी मान्यता आहे. अर्थात अनेक प्राण्यांना विशिष्ट देवतांशी वा दैवतांशी जोडून त्यांचे जतन केले जावे व नैसर्गिक जीवसाखळी अबाधित राखावी असा विचार त्यापाठी असावा. या श्रद्धेपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोराची चिंचोली' नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. इतर क्षेत्रातही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये मोरांचा मुक्त संचार आहे.झुंडीने आढळतात तसेच मोरांसाठी प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील नायगाव मयुर अभयारण्य हे भारतातीत/महाराष्ट्रातील एकमेव मयुर अभयारण्यात भरपुर प्रमाणात मोर अढळतात व या मोरांचे संरक्षण व संगोपणासाठी वन्यजीव विभागा मार्फत विविध उपक्रम द्वारे मोरांच्या वाढीसाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत.

आवाज

मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात.केकारव म्यॉंव म्यॉंव किंवा म्यूॅंहू...म्यूॅंहू... असा भासतो. मोर  मोराचा आवाज ऐका

जंगल क्षेत्रातील त्यांच्या जोरदार केकारवामुळे त्यांचा सहजपणे शोध घेता येतो.

प्रकार

पांढरा मोर

पांढरा मोर दुर्मिळ आहे. हे प्रामुख्याने मोकळ्या  जंगलात  किंवा शेतात आढळतात, जेथे त्यांना फीडसाठी बेरी आणि धान्य मिळते परंतु साप, मांजर, उंदीर आणि खार(गिलहरी) इ. खातात.वपावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात.

सांस्कृतिक संदर्भ

मोर हे सरस्वती तसेच कार्तिकेय यांचे वाहन आहे. मोराच्या रंगीत पिसाऱ्यामुळे तसेच डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान मिळवले आहे.

क्षणचित्रे

मोर 
Peacock
मोर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

भारतीय मोर

हिरवा रंगाचा मोर

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

मोर खाद्यमोर वास्तव्यमोर महाराष्ट्रात ांचे स्थानमोर आवाजमोर प्रकारमोर सांस्कृतिक संदर्भमोर क्षणचित्रेमोर संदर्भमोर बाह्य दुवेमोरपक्षीभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुणबीमराठीतील बोलीभाषारामायणआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनातीभारतीय आडनावेअष्टांगिक मार्गभौगोलिक माहिती प्रणालीसंगणक विज्ञानखडकवासला विधानसभा मतदारसंघजास्वंदलहुजी राघोजी साळवेविजय शिवतारेलक्ष्मीनालंदा विद्यापीठहिंदू कोड बिलविजयसिंह मोहिते-पाटीलतबलाभोपळाआनंद शिंदेन्यायालयीन सक्रियताखासदारराखीव मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघमानवी हक्कसायाळकैकाडीहोमी भाभाभीमराव यशवंत आंबेडकरअजिंठा लेणीविदर्भातील पर्यटन स्थळेवर्णसमुपदेशनकृष्णा नदीहिरडावायू प्रदूषणउद्धव ठाकरेलातूर लोकसभा मतदारसंघमहाभियोगसमर्थ रामदास स्वामीविंचूध्वनिप्रदूषणएकांकिकाशिर्डीमेष रासआनंदराज आंबेडकरअल्बर्ट आइन्स्टाइनपूर्व दिशाचीनमाळशिरस विधानसभा मतदारसंघकृष्णमुंबईपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमुंबई उच्च न्यायालयवेरूळ लेणीपांडुरंग सदाशिव सानेविरामचिन्हेड-जीवनसत्त्वशाहू महाराजसंयुक्त राष्ट्रेप्रेमानंद गज्वीप्रार्थनास्थळपुरंदर किल्लाविहीरपारू (मालिका)सप्तशृंगी देवीजय श्री रामगोंधळभूगोलस्वस्तिकपृथ्वीचे वातावरणरमाबाई आंबेडकरकेंद्रशासित प्रदेशभारताचे राष्ट्रपतीरामचरितमानस🡆 More