पारशी धर्म: एक धर्म

पारशी धर्म (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला पारशी लोकांचा एक धर्म व तत्त्वज्ञान आहे.

इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. स्थापनेनंतर दहा शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरू झाला. पारशी धर्माची स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे.

पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या
इराणच्या याझ्दमधील एक पारशी मंदिर

झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स.पूर्व १५ व्या शतकामध्ये पर्शिया मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. पर्शियातील लोकांना पर्शियन म्हटले जाते, त्यामुळेच कधी कधी झोराष्ट्रियन धर्मास पारशी धर्म असेदेखील म्हटले जाते. या धर्माच्या स्थापनेनंतर पारशीइराणी लोक अनेक शतके याच धर्माचे पालन करत होते. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्य सोबत केलेल्या युद्धानंतर झोराष्ट्रियन धर्माची वाढ खुंटली. इसवीसनाच्या सातव्या शतकातील इस्लामच्या आगमनामुळे झोराष्ट्रियन धर्माच्या ऱ्हासाची सुरुवात झाली. अवेस्तन भाषेमध्ये लिहिला गेलेला अवेस्ता हा झोराष्ट्रियनचा धर्मग्रंथ मानला जातो.

सध्या भारतात जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारशी व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे ऋग्वेद आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरात मध्ये आले . ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. इरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे. देशामध्ये फारशी धर्मियांची संख्या ही खूप कमी आहे. वास्तविक भारतामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही फारशी धर्मियांनी केलेले आहे. त्यांनीच भारतातील सुधारणा चळवळींमध्येही मोठे योगदान दिलेले आहे. जमशेदजी टाटा सारखे उद्योजक या समाजा मधूनच पुढे आले आहेत. पारशी समाजातील सुधारकांनी शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे.

तत्त्वज्ञान

झोराष्ट्रियन धर्माच्या शिकवणुकीनुसार आहूर माझदा ने सृष्टी निर्माण करताना केवळ चांगलेच निर्माण केले, वाईट काहीच नाही. अशा प्रकारे झोराष्ट्रियनिझम मध्ये मंगल व अमंगल गोष्टींचे निरनिराळे स्रोत आहेत. जेव्हा अमंगल स्रोत (दरूज) माझदाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मंगल स्रोत त्याचे रक्षण करतो. जेव्हा अहूर माझदा या जगात संचार करत नसतो, तेव्हा त्याच्या निर्मितीचे रक्षण सात अमेशा स्पंद आणि इतर याझातांचे प्रमुख करतात. त्यांच्या माध्यमातून मानवतेसाठी परमेश्वराचे कार्य काय आहे, ते स्पष्ट होते व माझदाची आराधना कशी करावी याचेही मार्गदर्शन केले जाते. झोराष्ष्ट्रियन धर्मग्रंथाचे नाव अवेस्ता. या ग्रंथाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग हरवलेला आहे. हा हरवलेला भाग केवळ संदर्भांच्या माध्यमातून व ९ व्या व ११ शतकांपासून केल्या गेलेल्या काही संक्षिप्त नोंदींवरून थोडाफार समजतो.

व्याख्या

मझदेइझम ही संज्ञा १९ व्या शतकात उदयास आली. अहुरा माझदा या नावातून माझदा हा शब्द घेऊन त्याच्यापुढे धर्म वा प्रणालीवर विश्वासदर्शक इझम या प्रत्यय जोडून मझदेइझम ही संज्ञा तयार करण्यात आली आहे. या धर्माचे झोराष्ट्रियन नाव माझदायासना असे आहे. माझदा व अवेस्तान भाषेतील शब्द यासना (पूजा किंवा आराधना) या दोन शब्दांच्या संयोगातून ते तयार झाले आहे.

लोकसंख्या

देश लोकसंख्या
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  भारत ६९,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  इराण २०,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  अमेरिका ११,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  अफगाणिस्तान १०,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  युनायटेड किंग्डम ६,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  कॅनडा ५,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  पाकिस्तान ५,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  सिंगापूर ४,५००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  अझरबैजान २,०००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  ऑस्ट्रेलिया २,७००
इराणचे आखात २,२००
पारशी धर्म: तत्त्वज्ञान, व्याख्या, लोकसंख्या  न्यूझीलंड २,०००
एकूण १,३७,४००

हे देखील पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

पारशी धर्म तत्त्वज्ञानपारशी धर्म व्याख्यापारशी धर्म लोकसंख्यापारशी धर्म हे देखील पहापारशी धर्म संदर्भपारशी धर्म बाह्य दुवेपारशी धर्मअलेक्झांडर द ग्रेटइंग्लिश भाषाइस्लाम धर्मझरथ्रुस्ट्रपर्शियापारशीहखामनी साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संख्याजवमहिलांसाठीचे कायदेवस्त्रोद्योगवातावरणमासिक पाळीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशिवाजी महाराजबडनेरा विधानसभा मतदारसंघपोक्सो कायदाएकनाथआदिवासीखंडोबानाशिक लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणहवामानाचा अंदाजचलनवाढपश्चिम दिशाकुळीथनाटकमहाविकास आघाडीदशावतारदिशावनस्पतीकाळाराम मंदिर सत्याग्रहचंद्रगुप्त मौर्यकर्नाटकरवी राणामहेंद्र सिंह धोनीमहाराष्ट्र भूषण पुरस्काररामायणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचिपको आंदोलनउद्योजकप्रार्थना समाजबखरबाबा आमटेदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाअभिनयलोणार सरोवरदीपक सखाराम कुलकर्णीनर्मदा नदीपरभणी विधानसभा मतदारसंघअजिंठा-वेरुळची लेणीकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघबीड जिल्हाभारतीय लष्करनवरी मिळे हिटलरलासंयुक्त राष्ट्रेवंदे मातरममानवी हक्ककोरेगावची लढाईवर्तुळहिंगोली विधानसभा मतदारसंघभूकंपाच्या लहरीहवामानसम्राट हर्षवर्धनजागतिक दिवसपिंपळभारतीय निवडणूक आयोगपारंपारिक ऊर्जाबुलढाणा लोकसभा मतदारसंघनक्षत्रसंवादसोलापूर लोकसभा मतदारसंघअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमआमदारचलनघटकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)पुणे करारसंगीतब्राझीलची राज्येपुणेप्रेरणाभारतातील समाजसुधारकनैसर्गिक पर्यावरणकरवंद🡆 More