सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे.

हे उद्यान भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यात असून बांगलादेशाच्या सीमेलगत आहे. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या या उद्यानात आढळते. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर आढळणारे वन्यप्राणी व पक्षी यांमुळे सुंदरबनची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे.

  ?सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
সুন্দরবন জাতীয় উদ্যান
पश्चिम बंगाल • भारत
—  राष्ट्रीय उद्यान  —
IUCN वर्ग Ia (संरक्षित वनक्षेत्र)

२१° ४३′ ५९.४८″ N, ८८° ५२′ ०८.२८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१,३३०.१२ चौ. किमी
• ७ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,९२० मिमी (७६ इंच)

• ३४ °C (९३ °F)
• २० °C (६८ °F)
जवळचे शहर गोसाबा
जिल्हा    दक्षिण २४ परगणा जिल्हा
स्थापना १९८४

जंगल प्रकार

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 
सुंदरबनचे जंगल

याचे जंगल हे मुख्यत्वे खारफुटीचे जंगल आहे. खारफुटीला इंग्रजीत मॅग्रोव्ह म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबनमध्ये ६४ प्रकारच्या वनस्पती आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. सुंदरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये गेनवा, धुंदाल, पासुर, गर्जन, गोरान या प्रमुख वनस्पती आहेत.

भौगोलिक

हे उद्यान मुख्यत्वे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या प्रदेशात ५४ बेटे आहेत. सुंदरबनचा विस्तार कित्येक हजार चौ किमीचा आहे त्यातील खूपच छोटा भाग भारतात येतो बहुतांशी भाग हा बांगलादेशात आहे. जिथे गंगेचे गोडे पाणी समुद्रात मिळते अशा ठिकाणी हे सुंदरबन आहे. त्यामुळे उद्यानात काही जागी गोडे तर काही जागी खारे पाणी आढळते. त्रिभुज प्रदेश हा गंगेने हजारो वर्षात आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश आहे. या प्रदेशात काही ठिकाणी जमीन उंचावली आहे तर काही जागी कायम दलदल असते. अशा कारणांमुळे अतिशय वैविध्यपूर्ण असे हे जंगल तयार झाले आहे. पावसाळ्यात प्रचंड पुराने येथील पाण्याची पातळी वाढते.

वातावरण

समुद्राजवळ असल्याने येथे वर्षभर अत्यंत दमट हवा असते. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये प्रचंड पाऊस पडतो. सरासरी तापमान ३४ ते २० अंश सेल्शियस असते. हिवाळा नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीची आहेत.

प्राणी जगत

सुंदरबनचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करून वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खाऱ्या पाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे नरभक्षक बनतात; तरीही कोणीही ठामपणे सांगू नाही शकत की येथीलच वाघ माणसांबाबतीत आक्रमक का आहेत . काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारून खातात.

वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळबाराशिंगा ही हरणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खूर इतर चितळांपेक्षा थोडीसे वेगळी असून दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगुस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर येतात.

सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप यांसारखे अनेक विषारी साप सुंदरबनात आढळतात. शिवाय, इतर सरपटणाऱ्या प्रजाती उदा: घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे, तसेच जमिनीवरील काही जातीची कासवेही येथे आढळतात .

पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो. पहा सुंदरबनातील पक्षी Archived 2008-08-03 at the Wayback Machine.

माहिती

  • जवळचे गाव-गोसाबा ५० किमी
  • जवळचे शहर- कोलकाता ११२ किमी
  • जवळचे विमानतळ- कोलकाता डम डम विमानतळ ११२ किमी
  • जवळचे रेल्वेस्थानक- कॅनिंग ४८ किमी वर
  • भेट देण्याचा सर्वोत्तम काळ - नोव्हेंबर ते फेब्रुवारी
  • इतर - उद्यानाला भेट देण्यासाठी खास परवाने मिळवावे लागतात. पश्चिम बंगाल वनखात्याकडून ते मिळतात. उद्यानातील गाभा क्षेत्रात मनुष्य वावरावर पूर्ण बंदी आहे. पर्यटकांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित असते.

बाह्य दुवे

संदर्भ


Tags:

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जंगल प्रकारसुंदरबन राष्ट्रीय उद्यान भौगोलिकसुंदरबन राष्ट्रीय उद्यान प्राणी जगतसुंदरबन राष्ट्रीय उद्यान माहितीसुंदरबन राष्ट्रीय उद्यान बाह्य दुवेसुंदरबन राष्ट्रीय उद्यान संदर्भसुंदरबन राष्ट्रीय उद्यानजागतिक वारसा स्थानदक्षिण २४ परगणा जिल्हापश्चिम बंगालबांगलादेशभारतराष्ट्रीय उद्यानवाघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ हरी देशमुखजाहिरातभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीनक्षत्रकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघकुंभ रासविष्णुसहस्रनामगुरू ग्रहमहाराष्ट्रातील आरक्षणकोल्हापूरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअहिल्याबाई होळकरहुंडाराजरत्न आंबेडकरपुरंदर किल्लाजुने भारतीय चलनजागतिक बँकयूट्यूबमहालक्ष्मीनितीन गडकरीविठ्ठल रामजी शिंदेशेतीपृथ्वीचा इतिहासक्रिकेटतापमानहरभराकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघकेरळरोहित शर्माआचारसंहितामानसशास्त्रमुघल साम्राज्यदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघझांजएकनाथमहाराष्ट्र शासनजागतिक पुस्तक दिवसमराठी भाषा गौरव दिनपसायदानआंतरराष्ट्रीय न्यायालयशरद पवारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीधर्मो रक्षति रक्षितःसंयुक्त राष्ट्रेगेटवे ऑफ इंडियाराज्यसभागजानन दिगंबर माडगूळकरअण्णा भाऊ साठेनाशिक लोकसभा मतदारसंघपंढरपूरभारतीय रेल्वेनिबंधधोंडो केशव कर्वेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघययाति (कादंबरी)पत्रमहादेव जानकरभारतातील राजकीय पक्षनागरी सेवाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीबावीस प्रतिज्ञाखासदाररायगड (किल्ला)बसवेश्वरछावा (कादंबरी)दूरदर्शनअमरावती जिल्हारशियाचा इतिहासगोवरएकनाथ शिंदेराज्य निवडणूक आयोगअभिनयसंवादप्रहार जनशक्ती पक्षजालियनवाला बाग हत्याकांडसर्वनाम🡆 More