मण्यार

मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे.

(इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.

मण्यार
मण्यार
मण्यार
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरपटणारे प्राणी
वर्ग: स्कामाटा
कुळ: बंगारस
योहान गोटलिब श्नायडर, १८०१

अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पालीसरडे, इतर छोटे सापबेडूक इत्यादी आहे

विष

मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. . मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

देशातील काही भागात उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडतात. मुख्यतः साप या प्राण्याला घाबरून माणसाचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे थोडा जरी सर्पदंश झाला आणि रक्तदाब वाढला तरी भीतीपोटी काही वेळा मृत्यू होतो. मोकळ्या जागेत मण्यार जास्त काळ थांबत नाही. अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो. हा साप खूप चपळ आहे. त्याचे विष खूप जहाल असते. जिभेद्वारे विष भक्षाच्या डोळ्यात टाकून सुद्धा आपली शिकार सहजतेने करतो. डोंगराळ भागात हा साप ठिकठिकाणी आढळतो. जास्तीत जास्त हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. म्हणून माणसाला हा साप चावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेस जास्त घडतात.

मण्यार चावल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन लवकर उपचार कसे करता येतील याची काळजी घ्यावी. सरकारी दवाखान्यात यावर उपचार माफक दरात आहेत.

संदर्भ

Tags:

पट्टेरी मण्यारसाप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सामाजिक समूहसातारा लोकसभा मतदारसंघएप्रिल २५फकिरा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाआईकरवंदसंभोगउंबरअण्णा भाऊ साठेपद्मसिंह बाजीराव पाटीलमानवी विकास निर्देशांकलोकमतसह्याद्रीपवनदीप राजनमाती प्रदूषणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमावळ लोकसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासातारा जिल्हावंचित बहुजन आघाडीअमेरिकेची संयुक्त संस्थानेनिवडणूकगाववृषभ रासकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघसुधा मूर्तीभारताची जनगणना २०११तापी नदीभारतीय संस्कृतीरायगड लोकसभा मतदारसंघमहाविकास आघाडीगांडूळ खतयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमहाराष्ट्र भूषण पुरस्कारपरभणी लोकसभा मतदारसंघदुष्काळजत विधानसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःबाराखडीउदयनराजे भोसलेआदिवासीजालना जिल्हालोकसभा सदस्यग्रामपंचायतपृथ्वीचे वातावरणराष्ट्रीय स्वयंसेवक संघज्ञानेश्वरीज्योतिबाओवाबीड जिल्हाबलवंत बसवंत वानखेडेवृत्तपत्रवर्णमालावायू प्रदूषणरयत शिक्षण संस्थासुषमा अंधारेनरसोबाची वाडीनगर परिषदपहिले महायुद्धशिल्पकलाबुद्धिबळभारताचे उपराष्ट्रपतीगोपाळ गणेश आगरकरभारतातील शेती पद्धतीलीळाचरित्रसंस्कृतीस्त्री सक्षमीकरणभारूडशेतकरीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)खंडोबाशनिवार वाडाशब्द सिद्धीपांडुरंग सदाशिव सानेविराट कोहलीरायगड जिल्हा🡆 More