फणसाड वन्यजीव अभयारण्य

फणसाड अभयारण्य हे महाराष्ट्रामधील अभयारण्य आहे.

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात १९८६ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ. कि. मी. आहे.

हे फणसाड अभयारण्य मुरुड अणि रोह तालुक्यांत येते. काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव वळास्ते, सर्वा, सुपेगाव आदी ३८ गावांनी ते वेढले आहे. हे अभयारण्य समुद्रकिनाऱ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २५ फेब्रुवारी १९८६ रोजी या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला.

फणसाडमध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे ७०० प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे प्राणी आणि ९०हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे आहेत. अभयारण्यात चिखलगाण, धरणगाण फणसाडगाण आदी ३० पाणस्थळे आहेत. अभयारण्याच्या जवळच अलिबाग-मुरुड रोडवरील बोर्ली येथून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेला फणसाड धबधबा आहे.

नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पती आहेत. गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.या वेलीची लांबी १०० मीटरहून अधिक असते. वेलींच्या शेंगांमधील गर येथील शेकरूंना खूप आवडतो.

महराष्ट्र राज्य शासनाने राज्य फुलपाखराचा मान दिलेले ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संखेत दिसते. महाराष्ट्राचे आणखी एक मानचिन्ह असलेले शेकरू येथे आहेत. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळिंदर आदी प्राणीही आहेत. बिबट्याचे हमखास दर्श येथे घडते. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप या अभयारण्यात आहेत. धनेश पक्षी हा या अभयारण्यात हमखास दिसतो.

सोयी

सुपेगाव वनविभागाचे व्हाईट हाऊस तंबू रहाण्यासाठी मिळतात. शिवाय खासगी निवास व्यवस्थाही आहे. बचत गटाच्या महिलांच्या हातचे जेवण येथे उपलब्ध आहे.


Tags:

अभयारण्यइ.स. १९८६महाराष्ट्ररायगड जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ग्रामपंचायतजगातील देशांची यादीनालंदा विद्यापीठमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीतिवसा विधानसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनभारताचे संविधानतुळजाभवानी मंदिरस्थानिक स्वराज्य संस्थागोपाळ कृष्ण गोखलेवाक्यव्यापार चक्रबाबासाहेब आंबेडकरकवितापाऊसराम सातपुतेवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघमधुमेहमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीठाणे लोकसभा मतदारसंघसह्याद्रीकिरवंतमुखपृष्ठयेसूबाई भोसलेअशोक चव्हाणश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघरायगड जिल्हामराठा साम्राज्यहिमालयदीपक सखाराम कुलकर्णीमहाराष्ट्रातील राजकारणहातकणंगले विधानसभा मतदारसंघभारतीय स्टेट बँकजागतिक व्यापार संघटनाविराट कोहलीक्रियापदटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाअकबरभोपाळ वायुदुर्घटनाजैवविविधतातुतारीगोंधळजनहित याचिकाविश्वजीत कदमआर्थिक विकासपोलीस पाटीलकॅमेरॉन ग्रीनसप्तशृंगी देवीवायू प्रदूषणमहाराष्ट्रातील आरक्षणगोवरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीतिथीआईकोकणपश्चिम महाराष्ट्रज्योतिबामांजर२०२४ मधील भारतातील निवडणुकाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारतीय रेल्वेदौंड विधानसभा मतदारसंघज्यां-जाक रूसोअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९एकपात्री नाटकविजयसिंह मोहिते-पाटीलन्यूझ१८ लोकमतजॉन स्टुअर्ट मिलबौद्ध धर्मउचकीलोकसंख्यारामदास आठवलेजिल्हा परिषददिवाळीभारूडबारामती विधानसभा मतदारसंघअमर्त्य सेनभारतातील शेती पद्धती🡆 More