अभयारण्य

अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय.

ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.

अभयारण्य
१८२१ मध्ये चार्लस वाटरटन यांनी पहीले अभयारण्य बनवले.
अभयारण्य
अमेरीकेतील अभयारण्य

उद्देश

अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मीळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. डायनोसॉर किंवा भीमसरट, स्मायलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वूली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडो पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मीळ जैवसंपदेची अधिक माहिती दुर्मिळ जैवसंपदा या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती लुप्त जैवसंपदा या लेखामध्ये मिळेल.

जगातील अभयारण्ये

प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यांसाठी संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषित केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.

काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:

आशियातील अभयारण्ये

भारतातील अभयारण्ये

अभयारण्य जिल्हा (राज्य) संरक्षित जैवसंपदा
ताडोबा-अंधारी अभयारण्य चंद्रपूर, महाराष्ट्र भारतीय वाघ
भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्र शेकरू, भारतीय सांबर
मेळघाट अभयारण्य महाराष्ट्र भारतीय वाघ
गीर अभयारण्य गुजरात भारतीय सिंह
काझीरंगा अभयारण्य आसाम भारतीय एकशिंगी गेंडा
ईगलनेस्ट अभयारण्य पश्चिम कामेंग, अरुणाचल प्रदेश बुगुन लिओसिकला पक्षी व इतर अनेक पक्ष्यांच्या प्रजाती

भारतातील अन्य अभयारण्ये, भेट देण्यासाठी सोईस्कर महिने आणि राज्ये

    पक्षी अभयारण्य
  • कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान – सिक्कीम
  • गोरुमारा राष्ट्रीय उद्यान – पश्चिम बंगाल
  • मानस व्याघ्र प्रकल्प, काझीरंगा – आसाम,
  • फुलपाखरांसाठी पक्के अभयारण्य, नामदफा राष्ट्रीय उद्यान, मिश्मी हिल्स (खास पक्ष्यांसाठी) – अरुणाचल प्रदेश
  • लोकतक (सरोवर) राष्ट्रीय उद्यान (संपूर्ण जगात केवळ ६० इतकिच संख्या असलेली थामिन जातीची हरणं येथे पाहता येतील.) – मणीपूर
    एप्रिल आणि मे
  • दाचिगम राष्ट्रीय उद्यान येथे हंगूल ह्य़ा रेडडिअर जातीची भारतात सापडणारी एकमेव प्रजाती पाहता येते. – काश्मीर
  • दाल लेक हे केवळ बोटिंगसाठीच नाही तर पक्षिवैभव पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे – काश्मीर
  • ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान – हिमाचल प्रदेश
  • कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, राजाजी राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड,
  • गीर राष्ट्रीय उद्यान आणि वेलावदर वन्यजीव अभयारण्य, मरिन नॅशनल पार्क, खेजडिया पक्षी अभयारण्य – गुजरात
  • रणथंबोर व्याघ्र प्रकल्प – राजस्थान,
  • कान्हा बांधवगड, पन्ना, पेंच व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश
  • ताडोबा, मेळघाट, नागझिरा, नवेगाव, बोर, उमरेड-करंडा – महाराष्ट्र
  • सुंदरबन व्याघ्र प्रकल्प – पश्चिम बंगाल
  • पक्ष्यांसाठी बिंसर वन्यजीव अभयारण्य – (कुमाऊ) उत्तराखंड
  • काली व्याघ्र प्रकल्प (दांडेली) पक्षी आणि प्राणी दोन्हीसाठी. मुख्यत पक्ष्यांसाठी खास – कर्नाटक
  • पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, मुन्नार राष्ट्रीय उद्यान, पेरंबिकुलम राष्ट्रीय उद्यान – केरळ

चीनमधील अभयारण्ये

अफ्रिकेतील अभयारण्ये

टांझानियातील अभयारण्ये

अभयारण्य जिल्हा (राज्य) संरक्षित जैवसंपदा
सेरेंगेटी अभयारण्य ?? नू, अफ़्रिकन सिंह, अफ़्रिकन गेंडा, अफ़्रिकन चित्ता, अफ़्रिकन हत्ती, अफ़्रिकन झेब्रा

उत्तर अमेरिकेतील अभयारण्ये

दक्षिण अमेरिकेतील अभयारण्ये

युरोपातील अभयारण्ये

ऑस्ट्रेलियातील अभयारण्ये

आर्क्टिकमधील अभयारण्ये

अंटार्क्टिकामधील अभयारण्ये

पहा : विदर्भातील अभयारण्ये

बाह्य दुवे

Tags:

अभयारण्य उद्देशअभयारण्य जगातील ेअभयारण्य भारतातील अन्य े, भेट देण्यासाठी सोईस्कर महिने आणि राज्येअभयारण्य बाह्य दुवेअभयारण्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कादंबरीविदर्भअनुवादइतिहासलता मंगेशकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीराजाराम भोसलेपंजाबराव देशमुखइतिहासाच्या अभ्यासाची साधनेयेसाजी कंकसोळा सोमवार व्रतआवळाखो-खोगणपतीअजिंठा-वेरुळची लेणीभारतीय स्वातंत्र्य दिवसराजरत्न आंबेडकरघारापुरी लेणीतुकडोजी महाराजगायनागपूरसातवाहन साम्राज्यआयुर्वेदभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तअनुदिनीगहूरॉबिन गिव्हेन्सभारत सरकार कायदा १९१९अश्वत्थामाअकबररायगड जिल्हानेतृत्वप्रेरणाकुष्ठरोगनर्मदा नदीभारतीय अंतराळ संशोधन संस्थापुणे करारथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळअणुऊर्जामराठी भाषा गौरव दिनभारतीय रिझर्व बँकशाश्वत विकासवित्त आयोगकृष्णा नदीहत्तीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीहॉकीभारतातील जातिव्यवस्थासापमराठा साम्राज्यचंद्रशेखर आझादटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगकृष्णभारतीय राष्ट्रीय काँग्रेसशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकपसायदानमराठी रंगभूमीमहाराष्ट्रातील पर्यटनजीवनसत्त्वराष्ट्रवादशाहू महाराजचमारवर्तुळबुद्धिबळनाटकाचे घटककेवडाबीबी का मकबरापी.टी. उषानाथ संप्रदायहरितगृह परिणामबाजरीभारताचा भूगोलमहारअंधश्रद्धासोलापूरशनिवार वाडामहाराष्ट्र केसरी🡆 More