मिखाइल शोलोखोव: रशियन लेखक

मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव (रशियन: Михаи́л Алекса́ндрович Шо́лохов; मे २४ १९०५ - फेब्रुवारी २१ १९८४) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील डॉन नदी किनाऱ्यावरील व्योशेन्स्काया ह्या गावी जन्मले.

१९०५">१९०५ - फेब्रुवारी २१ १९८४) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील डॉन नदी किनाऱ्यावरील व्योशेन्स्काया ह्या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती.

मिखाईल शोलोखोव
जन्म २४ मे १९०५ (1905-05-24)
व्योशेन्स्काया, रोस्तोव ओब्लास्त, रशियन साम्राज्य
मृत्यू २१ फेब्रुवारी, १९८४ (वय ७८)
सोव्हिएत संघ
राष्ट्रीयत्व रशियन
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरी मिखाइल शोलोखोव ह्यांची स्वाक्षरी

मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच मॉस्को येथील शाळेत शिकले. १९१८ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी रशियन क्रांती सेनेत सहभागी होत शिक्षण सोडून दिले. काही वर्षे सेनेच्या कामात गेल्यावर ते काम सोडून देऊन ते मॉस्को येथे पत्रकार होण्यच्या इच्छेने दाखल झाले. वेळप्रसंगी मजुरी करून, हिशेबनिस म्हणून किंवा अन्य मिळेल ते काम करून मिखाईल आला दिवस काढत. वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह डॉनच्या गोष्टी (Tales from the Don) प्रकाशित केला. यात रशियातील अंतर्गत युद्ध काळात आणि प्रथम विश्वयुद्धाच्या काळात उध्वस्त झालेल्या सामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या.

मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक अँड क्वाएट फ्लोज द डॉन ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे सोवियेत संघ होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना टॉलस्टॉय यांच्या वॉर अँड पीस शी केली जाते.

मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील व्हर्जिन सॉईल अपटर्नड् दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी

मागील
ज्यॉं-पॉल सार्त्र
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९६५
पुढील
श्मुएल योसेफ अग्नोन
नेली साक्स

Tags:

इ.स. १९०५इ.स. १९८४डॉन नदीफेब्रुवारी २१मे २४रशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाघनिबंधशुभं करोतियशवंत आंबेडकरकुबेरसकाळ (वृत्तपत्र)संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाम्हणीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराणी लक्ष्मीबाईखो-खोडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकीर्तनइंदुरीकर महाराजपुणे जिल्हाउद्योजकबाजरीतलाठीव्यसनअपारंपरिक ऊर्जास्रोतमहाराष्ट्र गीतमहात्मा गांधीवनस्पतीढोलकीजागतिकीकरणसंख्याॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीगुरुत्वाकर्षणगुढीपाडवागांधारीबाराखडीअकोला लोकसभा मतदारसंघसुप्रिया सुळेभीमा नदीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)बौद्ध धर्ममहाराष्ट्र पोलीसराम सातपुतेआमदारठाणे लोकसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हाशाळामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकुटुंबकृत्रिम बुद्धिमत्तामूलद्रव्यमुख्यमंत्रीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबैलगाडा शर्यतवेदपरभणी विधानसभा मतदारसंघहिंगोली विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा जीवनक्रमआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनागरी सेवावि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारतीय निवडणूक आयोगशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसाताराजगातील देशांच्या राजधान्यांची यादीधर्मो रक्षति रक्षितःवातावरणमहाराष्ट्रातील किल्लेवृत्तपत्रभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअकोला जिल्हाभारतीय संसदउच्च रक्तदाबनियोजनऔंढा नागनाथ मंदिरभारतातील शेती पद्धतीगुंतवणूकभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह🡆 More