गोगलगाय

गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे.

गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणाऱ्या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी उभयलिंगी असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसऱ्यांशी गोगलगायींशी संभोग करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना भक्ष्

गोगलगाय
जमीनीवरील गोगलगाय

औरंगाबाद येथे डॉ प्रदीप देशमुख यांनी मायक्रोक्लमाईस या जमिनी वर सापडणारी गोगलगाय वर संशोधन केले आहे

उपयोग

काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात.

  • शंख - हिंदू धर्म पुरातन काळापासून शंखाचा उपयोग करत असल्याचे आढळते. हिंदू संस्कृतीत शंखनाद हा पूजेचा एक भाग असतो.

उपद्रव

शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्यास, रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायींनी रोपांची पाने खाल्ल्याने शेताचे नुकसान होते. महाराष्ट्रातील गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकाचवेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही.

  • शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात राख पसरवावी. त्यावर मोरचूद व कळीचा चुना दोनास तीन प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा त्यामुळे गोगलगाय तेथे येत नाही.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या मरतात.
  • कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.
  • शेतामध्ये ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग ठिकठिकाणी करावेत. त्यांखाली गोगलगायी मोठ्या संख्येने जमतात. लपलेल्या गोगलगायी सकाळीसकाळी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये त्यांनी घातलेली पिवळट पांढऱ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.

अधिक माहिती

बाह्य दुवे

Tags:

गोगलगाय उपयोगगोगलगाय उपद्रवगोगलगाय अधिक माहितीगोगलगाय बाह्य दुवेगोगलगायप्राणीशंखसंभोग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हवामान बदलकोल्हापूर जिल्हाइतर मागास वर्गदुसरे महायुद्धजालना जिल्हामिया खलिफाकाळूबाईवृत्तपत्रवृषभ रासशेकरूमहाराष्ट्र दिनसमुपदेशनवर्षा गायकवाडगायत्री मंत्रप्रीतम गोपीनाथ मुंडेयोगभारतातील राजकीय पक्षवंचित बहुजन आघाडी२०१९ लोकसभा निवडणुकाभगवानबाबाछत्रपती संभाजीनगर जिल्हाभूतसोनारनीती आयोगअहिल्याबाई होळकरगंगाखेड विधानसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धनागरी सेवाओवासम्राट अशोक जयंतीसांगली विधानसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणसोलापूर लोकसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघभारतीय प्रजासत्ताक दिनकुत्रासुशीलकुमार शिंदेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिवमहिलांसाठीचे कायदेजालना विधानसभा मतदारसंघशिरूर विधानसभा मतदारसंघराज्य मराठी विकास संस्थाकालभैरवाष्टकसविता आंबेडकरभारताचे राष्ट्रचिन्हरतन टाटापेशवेगर्भाशयआद्य शंकराचार्यनितंबशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपुणे करारवर्धमान महावीरप्रकाश आंबेडकरमावळ लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्र गीतशाळाक्षय रोगऊससातव्या मुलीची सातवी मुलगीभारतीय संसदमराठा आरक्षणविठ्ठलचिपको आंदोलनउंटइंडियन प्रीमियर लीगकलाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीतूळ रासजैवविविधताकवितासाहित्याचे प्रयोजनतुळजापूरनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघबाराखडीकरवंद🡆 More