क्वांटास

क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.

हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे. क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

क्वांटास
क्वांटास
आय.ए.टी.ए.
QF
आय.सी.ए.ओ.
QFA
कॉलसाईन
QANTAS
स्थापना १६ नोव्हेंबर १९२०
हब मेलबर्न विमानतळ (मेलबर्न)
सिडनी विमानतळ (सिडनी)
ब्रिस्बेन
ॲडलेड
पर्थ
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (दुबई)
मुख्य शहरे केर्न्स
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (लॉस एंजेल्स)
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या जेटस्टार एअरवेज
विमान संख्या १३१
ब्रीदवाक्य The Spirit of Australia
मुख्यालय सिडनी, न्यू साउथ वेल्स
संकेतस्थळ qantas.com.au
क्वांटास
लंडन हीथ्रो विमानतळावर थांबलेले क्वांटासचे बोइंग ७४७ विमान

२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे.

इतिहास

क्वांटासची स्थापना १६ नोव्हेंबर, इ.स. १९२० रोजी क्वीन्सलॅंडच्या विन्टन शहरात क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली. या कंपनीचे पहिले विमान ॲव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये डार्विन ते सिंगापूर हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, इ.स. १९५९मध्ये क्वांटासने बोईंग ७०७-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.

मुख्यालय

क्वांटासचे क्वान्टास सेंटर या नावाचे मुख्यालय बॉटनी बेजवळ आहे. सन १९२० मध्ये क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटरी एरियल सर्व्हिसेसचे लिमिटेडचे मुख्यालय क्वीन्सलॅंडमध्ये होते. सन १९२१ मध्ये लोंगरिच क्वीन्सलॅंडचे मुख्यालय सन १९३० मध्ये ब्रिस्बेन येथे स्थानांतरित झाले. सन १९५७ मध्ये सिडनीच्या हंटर स्ट्रीटवर कोन्ट्रास हाऊस उघडले. क्वांटासने ऑस्ट्रेलियाचे मूळचे आदिवासी तसेच टॉरस राज्याच्या बेटावरील रहिवासी यांच्याशी नेहमीच सुसंवाद साधलेला आहे. क्वान्टास एअरवेजने सन २००७ पासून जवळजवळ १० वर्षे या समाजातील १ ते २ % जनतेला एअरवेजच्या कामासाठी सामावून घेतलेले आहे. त्यासाठी एक त्रयस्थ व्यक्ती नियुक्त केली आहे आणि त्याच्यावर ही संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. क्वान्टास एअरवेजने आदिवासींचे कलागुण जोपासले आहेत. तसेच त्यासाठी मदतही केली आहे. सन १९९३ मध्ये क्वान्टास एअरवेजने 'हनी, ॲन्ट ॲन्ड ग्रासहॉपर' नावाचे पेंटिंग मध्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात खरेदी केले. क्वान्टास एअरवेजने हे पेंटिंग न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीला थोड्या दिवसासाठी दिले आहे. क्वान्टास एअरवेजने सन १९९६ मध्ये या आर्ट गॅलरीला आणखी ५ पेंटिगे दिली. क्वान्टास एअरवेजने या पूर्वीही या आदिवासी कलावंतांना प्रोत्साहित करून समर्थनही दिले आहे. क्वान्टास एअरवेजने फार पूर्वी म्हणजे सन १९६७ मध्ये अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीनवर एक जाहिरातवाजा कार्यक्रम चालू केला होता, तो अनेक दशके चालला. त्यात एका कावळ्याला दाखविले होते. अनेक अमेरिकन ऑस्ट्रेलियात येतात पण ते क्वान्टास एअरवेजची घृणा करतात असे तक्रारीचे सूर या जाहिरातीत उमटले होते.. क्वान्टास एअरवेज ही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय रग्बी टीमची मुख्य प्रायोजक आहे. क्वान्टास एअरवेज ऑस्ट्रेलियाच्या ससेक्स फुटबॉल टीमलाही प्रायोजित करते. दि. 26-12-2011 रोजी क्वान्टास एअरवेज ने आस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडूंच्या प्रवासी वाहतुकीसाठीचा ४ वर्षाचा करार केलेला आहे.

क्वांटासच्या उपकंपन्या

क्वांटास 
क्वान्टास एम्पायर एअरवेज इंटरनॅशनलचे रोज बे येथे येत असलेले विमान (सी .१९३९)
  1. ऑस्ट्रेलिया एशिया एर
  2. इंपल्स
  3. ऑस्ट्रेलियाई
  4. क्वान्टास लिंक
  5. जेट स्टार
  6. नेटवर्क
  7. जेट कनेक्ट

नवीन पोषाख

पॅरिसमध्ये राहणाऱ्या मार्टिन ग्रॅंट या ऑस्ट्रेलियन डिझाईनरने क्वान्टास एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोषाख तयार केला होता. क्वान्टासने हा जनतेला दाखविला असता, पोषाख शरीरावर अतिशय घट्ट बसत असल्या कारणाने कर्मचारी नाराज झाले. अंगावर असे घट्ट कपडे असले तर काम करताना त्रास होतो हा त्यांचा मुद्दा होता.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

क्वांटास 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

क्वांटास इतिहासक्वांटास मुख्यालयक्वांटास च्या उपकंपन्याक्वांटास नवीन पोषाखक्वांटास संदर्भ आणि नोंदीक्वांटास बाह्य दुवेक्वांटासऑस्ट्रेलियाविमान वाहतूक कंपनीसिडनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चित्ताभाऊराव पाटीलराजरत्न आंबेडकरना.धों. महानोररमाबाई आंबेडकरपुरस्कारस्मृती मंधानाआंतरजाल न्याहाळकअमेरिकेची संयुक्त संस्थानेदुधी भोपळामंगळ ग्रहभाषालंकारचंद्रयान ३महाराष्ट्रातील लेण्यांची यादीभरती व ओहोटीदिवाळीज्योतिर्लिंगआनंदीबाई गोपाळराव जोशीरामनितीन गडकरीजागतिक व्यापार संघटनापी.व्ही. सिंधूम्हणीअणुऊर्जातणावचंद्रपूर लोकसभा मतदारसंघहवामाननाचणीगुड फ्रायडेसायकलिंगशिवराम हरी राजगुरूप्रज्ञा विवर्धन स्तोत्रगुरू ग्रहविराट कोहलीईमेलसेंद्रिय शेतीमहागणपती (रांजणगाव)संभाजी भोसलेवनस्पतीदक्षिण दिशाअतिसारजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमुक्ताबाईव्हॉलीबॉलहस्तमैथुनबीड लोकसभा मतदारसंघमीरा (कृष्णभक्त)बँकसह्याद्रीखेळजवकोल्हापूर जिल्हाशिवलाल किल्लाख्रिश्चन धर्मदेवेंद्र फडणवीसपोपटमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेशरद पवारजाहिरातगोविंद विनायक करंदीकरसूर्यपंचायत समितीतुकडोजी महाराजसर्वेपल्ली राधाकृष्णनखंडोबासनरायझर्स हैदराबादशुभेच्छागणितदिंडोरी लोकसभा मतदारसंघचंद्रशेखर आझादरवींद्रनाथ टागोरजलप्रदूषणमराठी लिपीतील वर्णमालाधबधबाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ🡆 More