लॉस एंजेलस

लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए.

(LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.

लॉस एंजेलस
Los Angeles
अमेरिकामधील शहर

लॉस एंजेलस

लॉस एंजेलस
ध्वज
लॉस एंजेलस
चिन्ह
लॉस एंजेलस is located in कॅलिफोर्निया
लॉस एंजेलस
लॉस एंजेलस
लॉस एंजेलसचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८५०
महापौर अँटोनिओ व्हिलारायगारोसा
क्षेत्रफळ १,२९०.६ चौ. किमी (४९८.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३३ फूट (७१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३७,९२,६२१
  - घनता ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.lacity.org


दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगरटोकियो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो. लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते. येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.

शहर रचना

मलहॉलंड रस्त्यावरून टिपलेले लॉस एंजेलसचे विस्तृत छायाचित्र. डावीकडून: सांता अ‍ॅना डोंगर, लॉस एंजेलस शहरकेंद्र, हॉलिवूड, लॉस एंजेलस बंदर, पालोस व्हर्देस द्वीपकल्प, सांता कातालिना बेट व लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ.

लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी इतक्या विस्तारात पसरलेले आहे

हवामान

लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.

लॉस एंजेलस (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसर) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से) 68.1
(20.1)
69.6
(20.9)
69.8
(21)
73.1
(22.8)
74.5
(23.6)
79.5
(26.4)
83.8
(28.8)
84.8
(29.3)
83.3
(28.5)
79.0
(26.1)
73.2
(22.9)
68.7
(20.4)
75.6
(24.2)
दैनंदिन °फॅ (°से) 58.3
(14.6)
60.0
(15.6)
60.7
(15.9)
63.8
(17.7)
66.2
(19)
70.5
(21.4)
74.2
(23.4)
75.2
(24)
74.0
(23.3)
69.5
(20.8)
62.9
(17.2)
58.5
(14.7)
66.2
(19)
सरासरी किमान °फॅ (°से) 48.5
(9.2)
50.3
(10.2)
51.6
(10.9)
54.4
(12.4)
57.9
(14.4)
61.4
(16.3)
64.6
(18.1)
65.6
(18.7)
64.6
(18.1)
59.9
(15.5)
52.6
(11.4)
48.3
(9.1)
56.6
(13.7)
सरासरी पर्जन्य इंच (मिमी) 3.33
(84.6)
3.68
(93.5)
3.14
(79.8)
0.83
(21.1)
0.31
(7.9)
0.06
(1.5)
0.01
(0.3)
0.13
(3.3)
0.32
(8.1)
0.37
(9.4)
1.05
(26.7)
1.91
(48.5)
15.14
(384.7)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.01 inch) 6.5 6.0 6.4 3.0 1.3 0.6 0.3 0.5 1.2 2.0 3.1 4.3 35.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 225.3 222.5 267.0 303.5 276.2 275.8 364.1 349.5 278.5 255.1 217.3 219.4 ३,२५४.२
स्रोत: NOAA

खेळ

लॉस एंजेलस शहराने १९३२१९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
लॉस एंजेलस लेकर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९४९
लॉस एंजेलस क्लिपर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९८४
अ‍ॅनाहाइम डक्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग होंडा सेंटर १९९३
लॉस एंजेलस किंग्ज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्टेपल्स सेंटर १९६७
लॉस एंजेलस डॉजर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल डॉजर पार्क १९५८
लॉस एंजेलस एंजल्स ऑफ अ‍ॅनाहाइम बेसबॉल मेजर लीग बेसबॉल एंजल्स स्टेडियम ऑफ अ‍ॅनाहाइम १९६१

संदर्भ

बाह्य दुवे

लॉस एंजेलस 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

लॉस एंजेलस शहर रचनालॉस एंजेलस हवामानलॉस एंजेलस खेळलॉस एंजेलस संदर्भलॉस एंजेलस बाह्य दुवेलॉस एंजेलसEn-us-los-angeles.oggअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाकॅलिफोर्नियान्यू यॉर्क शहरप्रशांत महासागर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कन्या रासनालंदा विद्यापीठहत्तीरोगमहाराष्ट्र विधानसभाभारत छोडो आंदोलनसकाळ (वृत्तपत्र)महाराजा सयाजीराव गायकवाडमुंबई उच्च न्यायालयभालचंद्र वनाजी नेमाडेहोमिओपॅथीसांगलीकोल्हापूररमा बिपिन मेधावीचित्तावृत्तपत्रप्रकाश आंबेडकरअहिल्याबाई होळकरहरिहरेश्व‍रखो-खोकेदारनाथनिबंधरेणुकाऋषी सुनकसंयुक्त महाराष्ट्र समितीसंशोधनभूगोलत्र्यंबकेश्वरवाघआईमूकनायकनामदेवशास्त्री सानपआणीबाणी (भारत)मराठी संतधुंडिराज गोविंद फाळकेसंभाजी भोसलेभोई समाजजीवाणूशहाजीराजे भोसलेसईबाई भोसलेवस्तू व सेवा कर (भारत)ग्रामपंचायतवणवाहंबीरराव मोहितेईशान्य दिशासापजन गण मनहरितक्रांतीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीक्रिकेटजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भारताचे राष्ट्रपतीयकृतदादोबा पांडुरंग तर्खडकरराष्ट्रकुल खेळगौर गोपाल दाससुधा मूर्तीजागतिकीकरणज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकउंबरमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीविठ्ठल रामजी शिंदेविठ्ठल तो आला आलाकबड्डीस्वतंत्र मजूर पक्षमण्यारअहमदनगरगुप्त साम्राज्यमॉरिशसभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीशिवसेनाबहिणाबाई चौधरीअश्वत्थामागुलमोहरतोरणाराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकनारायण मुरलीधर गुप्तेकुत्रा🡆 More