आउश्वित्झ छळछावणी

आउश्वित्झ छळछावणी (मराठी लेखनभेद: ऑश्विझ छळछावणी) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती.

अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकीय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री उत्पादनासाठी लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे श्रम करण्यास सक्षम होते, अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या कोठडीमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.

आउश्वित्झ छळछावणी
हंगेरियन ज्यू मुले आणि स्त्री आउश्वित्झ छळछावणीतील विषारी वायूच्या कोठडीकडे जात असताना (इ.स. १९४४). येथे आणल्याबरोबर मुलांना आणि स्त्रियांना ताबडतोब कुठलीही नोंद न ठेवता ठार मारून टाकले जात असे.

वैद्यकीय संशोधने

नाझी डॉक्टरनी युद्धकैदी असलेल्या ज्यूंवर अनेक प्रयोग केले. हे प्रयोग अतिशय भयानक होते.हे प्रयोग माणुसकीला काळिमा फासणारे होते. काहीकाही प्रयोग तर कां केले असा प्रश्न निर्माण होतो.

खाऱ्या पाण्याचे प्रयोग

नाझीना हे बघायचे होते की, समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते का? यासाठी त्यानी कैद्यांना समुद्राचे पाणी बळजबरीने पाजले. त्यानी या कैद्याना समुद्राचे पाणीच पिण्यासाठी भाग पाडले. त्यानी ह्याची काळजी घेतली की कैद्याना ताजे पाणी कुठल्याही स्त्रोतातून मिळू शकणार नाही. कैद्याना अतिशय त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या. सर्वच कैद्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. कैदी इतके तहानलेले होते की ते ताजे पाणी मिळण्याच्या आशेने नुकत्याच पुसलेल्या फरश्या चाटत होते. १०० ज्यू कैद्यांना या प्रयोगात सामील करण्यात आले होते. हे सर्व कैदी मरण पावले

थंड पाण्याचे प्रयोग

माणूस किती कमी तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर नाझी डॉक्टरांना हवे होते. हे शोधून काढण्यासाठी त्यांच्याकडे जू कैदी होते. त्यानी अनेक कैद्यांना थंड पाण्याच्या टबात ठेवले आणि हळू हळू तापमान कमी करत गेले. ज्या तापमानाला माणूस मरतो ते तापमान त्यानी लिहून ठेवले.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी


Tags:

आउश्वित्झ छळछावणी वैद्यकीय संशोधनेआउश्वित्झ छळछावणी हे सुद्धा पहाआउश्वित्झ छळछावणी संदर्भ आणि नोंदीआउश्वित्झ छळछावणीओश्फिन्चिमनाझी जर्मनीपोलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील आरक्षणमहानुभाव पंथभारतीय जनता पक्षस्वामी समर्थमानवी हक्कमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगणपतीसंजय हरीभाऊ जाधवविदर्भअर्थशास्त्रहनुमान चालीसासांगली जिल्हामासिक पाळीकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारवित्त आयोगकार्ल मार्क्सकापूससांगलीउद्धव ठाकरेभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याशिक्षकभारतातील मूलभूत हक्कभौगोलिक माहिती प्रणालीक्लिओपात्रामहाराष्ट्र विधान परिषदगोदावरी नदीगोपाळ गणेश आगरकरकृष्णा नदीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मराठा आरक्षणविरामचिन्हेराजकीय पक्षमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजय श्री रामहडप्पापारंपारिक ऊर्जाताराबाईजेजुरीययाति (कादंबरी)भरतनाट्यम्रायगड (किल्ला)करवंदउदयनराजे भोसलेजलप्रदूषणछावा (कादंबरी)पंढरपूरफॅसिझमप्रदूषणबाराखडीआर्थिक विकासभारतीय निवडणूक आयोगसोव्हिएत संघमनुस्मृतीॐ नमः शिवायप्राथमिक शिक्षणअष्टविनायकमहिलांसाठीचे कायदेआईआरोग्यअन्नमिया खलिफामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपुणे जिल्हाबाजरीबैलगाडा शर्यतगजानन दिगंबर माडगूळकरउच्च रक्तदाबसिंहगडआंतरराष्ट्रीय न्यायालयहुंडारामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीपळसशिरूर लोकसभा मतदारसंघतिरुपती बालाजीग्रामपंचायतनवग्रह स्तोत्रभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभीमराव यशवंत आंबेडकरभारतामधील भाषा🡆 More