आंबडवे

आंबडवे हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक छोटे गाव आहे.

हे गाव मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. इथे पुण्याच्या अशोक सर्वांगीण विकास संस्थेने अशोक स्तंभ आणि शीलालेख उभारून त्याला स्फूर्तिभूमी असे नाव दिले आहे. आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. हे गाव खासदार अमर साबळे यांनी त्यांच्या विकास योजनेत सामील केले आहे. येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, जे एक पंचतीर्थ आहे.

  ?आंबडवे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१७° ५३′ २४″ N, ७३° २४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंडणगड
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
तालुका/के मंडणगड
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
२४० (२०११)
१,१६२ /
भाषा मराठी
आंबडवे
आंबडवे गावातील स्मारक

भौगोलिक स्थान व लोकसंख्या

आंबडवे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील ३२४.३३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६४ कुटुंबे व एकूण २४० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर खेड ६० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १११ पुरुष आणि १२९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५७ असून अनुसूचित जमातीचे ११ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६४७१२ आहे.

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: १७१
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८१ (७२.९७%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ९० (६९.७७%)

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

पिण्याचे पाणी

गावात विहिरीतील शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.

स्वच्छता

गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.

डॉ. आंबेडकरांचे गाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वजांचे हे गाव आहे. इथे डॉ. आंबेडकरांचे पूर्वज सकपाळ कुटुंबीय वास्तव्य करून राहतात. या सकपाळ घराण्यातीलच डॉ. आंबेडकर आहेत. बाबासाहेबांचे खरे आडनाव सकपाळ. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडत असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आता प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. अनेक जण या गावचा आणि बाबासाहेबांच्या या आडनावाचा अनुक्रमे ‘आंबवडे’ व ‘आंबवडेकर’ असा चूकीचा उल्लेख करतात.

साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनीड वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली.

लोकसंख्या

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंब ६४
लोकसंख्या २४० १११ १२९
मुले (० ते ६ ) २५ १६
अनु. जाती ५७ २७ ३०
अनु. जमाती ११
साक्षरता ७९.५३% ८५.२६% ७५.००%
एकूण कामगार ५१ ४४

ग्रामसंसद

शैक्षणिक सुविधा

आरोग्य केंद्र

  • प्राथमिक आरोग्य केंद्र —
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र —
  • पशुवैद्यकिय दवाखाना —
  • अंगणवाडी —

वीज

प्रतिदिवस १५ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.

जमिनीचा वापर

आंबडवे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: १०.२५
  • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ६२.०८
  • फुटकळ झाडीखालची जमीन: १८३.३२
  • पिकांखालची जमीन: ६८.६८
  • एकूण बागायती जमीन: ६८.६८

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

आंबडवे 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

Tags:

आंबडवे भौगोलिक स्थान व लोकसंख्याआंबडवे साक्षरताआंबडवे हवामानआंबडवे पिण्याचे पाणीआंबडवे स्वच्छताआंबडवे डॉ. आंबेडकरांचे गावआंबडवे लोकसंख्याआंबडवे ग्रामसंसदआंबडवे शैक्षणिक सुविधाआंबडवे आरोग्य केंद्रआंबडवे वीजआंबडवे जमिनीचा वापरआंबडवे हे सुद्धा पहाआंबडवे बाह्य दुवेआंबडवे संदर्भ आणि नोंदीआंबडवेअशोक स्तंभखासदारपंचतीर्थबाबासाहेब आंबेडकरमंडणगडरत्‍नागिरी जिल्हाविश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कंबरमोडीगेंडालाल किल्लाचित्रकलाइंग्लंड क्रिकेट संघरयत शिक्षण संस्थाकासवपाटण तालुकागोपाळ कृष्ण गोखलेइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपाटण (सातारा)सर्पगंधाअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदभारत सरकार कायदा १९१९डाळिंबऑलिंपिक खेळात भारतहत्तीछत्रपती संभाजीनगर जिल्हाइ.स. ४४६महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसमाज माध्यमेपृथ्वीचे वातावरणचीनजय श्री रामसम्राट हर्षवर्धनवेड (चित्रपट)नर्मदा नदीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षभारतातील शेती पद्धतीकेंद्रशासित प्रदेशशब्दयोगी अव्ययआफ्रिकापौगंडावस्थामूळव्याधसचिन तेंडुलकरफुफ्फुसकुस्तीमूलद्रव्यगालफुगीतानाजी मालुसरेलता मंगेशकरतणावशेतकरीभारतीय नौदलकाजूनाचणीयुरी गागारिनऑलिंपिकपवन ऊर्जाकुटुंबनियोजनरक्तगटज्योतिर्लिंगवडधनंजय चंद्रचूडतरसभारतीय नियोजन आयोगवचन (व्याकरण)सावता माळीझाडवाणिज्यपानिपतची पहिली लढाईसायली संजीवमराठी भाषेमधील वृत्तपत्रेफणसज्ञानेश्वरीपक्षांतरबंदी कायदा (भारत)मण्यारभारतातील समाजसुधारकमराठी रंगभूमीसप्तशृंगी देवीपंचायत समितीभालचंद्र वनाजी नेमाडेअण्णा भाऊ साठेत्रिकोणलोकमतपुणेखाजगीकरण🡆 More