त्रिकोण

एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदु सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात.

या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. त्यामुळे कोणतेही दोन कोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.

त्रिकोण
त्रिकोण

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची

बाजूंच्या तुलनात्मक लांबीपासूनचे प्रकार

कोनांपासूनचे प्रकार

लघुकोन त्रिकोण

या त्रिकोणात प्रत्येक कोन ९० अंशाहून कमी मापाचा असतो.

विशालकोन त्रिकोण

या प्रकारच्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन (९० अंशापेक्षा मोठा) असतो.

काटकोन त्रिकोण

त्रिकोण 
काटकोन त्रिकोण

या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.

Tags:

त्रिकोण बाजूंच्या तुलनात्मक लांबीपासूनचे प्रकारत्रिकोण कोनांपासूनचे प्रकारत्रिकोणकोन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रामायणाचा काळसंभाजी राजांची राजमुद्राजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मेंदूज्येष्ठमधराज्यपालअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पारू (मालिका)दौलताबादकुत्राप्राण्यांचे आवाजतापमानहिंदू धर्मडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेश्रेयंका पाटीलगडचिरोली जिल्हामाहितीजिजाबाई शहाजी भोसलेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमराठी भाषा दिनकोहळावर्धा लोकसभा मतदारसंघप्रणिती शिंदेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीक्रियापदमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीइंदुरीकर महाराजसिंहगडमहात्मा फुलेमाळशिरस विधानसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)देवेंद्र फडणवीसरामजी सकपाळसावित्रीबाई फुलेभारताचा स्वातंत्र्यलढाअमित शाहपश्चिम महाराष्ट्रगुप्त साम्राज्यदिवाळीप्रीमियर लीगअग्रलेखउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघचीनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशिवाजी महाराजचिमणीस्वामी समर्थयूट्यूबशिव जयंतीसमर्थ रामदास स्वामीपश्चिम दिशासात आसरालहुजी राघोजी साळवेसुतकरामनवमीमानवी शरीररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदरणजित नाईक-निंबाळकरवर्धमान महावीरईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूकेशव महाराजनवनीत राणाऔद्योगिक क्रांतीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीअजिंठा-वेरुळची लेणीभाऊराव पाटीललातूर लोकसभा मतदारसंघवस्तू व सेवा कर (भारत)धर्मो रक्षति रक्षितःगोंधळसात बाराचा उताराहोमरुल चळवळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्रातील लोककलाराखीव मतदारसंघ🡆 More