गेंडा: सस्तन प्राण्यांचे कुटुंब

गेंडा अथवा इंग्रजीत राईनोसिरोस हा प्राणी शाकाहारी भूचर आहे.

खुरधारी वर्गातील हा प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. खुरधारी म्हणजे पायांना खुर असलेले प्राणी, तर अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येत खुर असतात ते प्राणी. अयुग्मखुरी गणात गेंडा हा खड्गाद्य कुळात मोडणारा एकमेव प्राणी आहे. या प्राण्याच्या पायाला तीन खुरे असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यानुसार गेंड्याचे शिंग हे खरे शिंग नसून तो एक केसांचा गुच्छ आहे, जो शिंगात रूपांतरीत झाला.

गेंडा
एओसीन - अलीकडील
काळा गेंडा
काळा गेंडा
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: अयुग्मखुरी
कुळ: खड्गाद्य
ग्रे, १८२१
गेंडा: सस्तन प्राण्यांचे कुटुंब
भारतीय एकशिंगी गेंडा

गेंड्यात सध्या पाच प्रकार असून आफ्रिका खंडात दोन प्रकारचे गेंडे आढळतात, एक काळा गेंडा आणि दुसरा पांढरा गेंडा. तर दक्षिण आशिया खंडात तीन प्रकारचे गेंडे आढळतात. भारत, नेपाळदक्षिण-पूर्व आशियाई देशात आढळतो.

आशिया खंडात या प्राण्याचा तीन मुख्य जाती आहेत जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा बेटावर आणि व्हियेतनाम देशात आढळतो, दुसरा म्हणजे सुमात्रीयान गेंडा, जो इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो, आणि तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किवा एक शिंगी गेंडा, जो भारत आणि नेपाळ मध्ये आढळतो. जावन गेंडा ही जात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळत असे. पण आज ते नष्ट झाले आहेत.

भारतीय गेंडा

भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश मध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळ मध्ये पण आढळतात. आफ्रिकन गेन्ड्यामध्ये दोन प्रकार आहेत, पंढरा गेंडा आणि काळा गेंडा.

Tags:

अयुग्मखुरीप्राणीभूचरशाकाहारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यंजनश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीअश्विनी एकबोटेमण्यारपोक्सो कायदाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसोनारहिंगोली जिल्हानामदेवशास्त्री सानपभारतातील पर्वतरांगाईशान्य दिशाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेस्वामी समर्थअजित पवारगोरा कुंभारठाणे लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकागोलमेज परिषदसमासभारताचा इतिहासभालचंद्र वनाजी नेमाडेराशीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशस्वादुपिंडसोलापूरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपानिपतची तिसरी लढाईसाडीभारताचे संविधानबुलढाणा जिल्हाआदिवासीझी मराठीकुत्रामहाराष्ट्रातील आरक्षणबावीस प्रतिज्ञागंजिफाभारताची अर्थव्यवस्थाद प्रॉब्लम ऑफ द रूपीमाहितीफणसभारताचा भूगोलक्रिकेटचे नियममहाराष्ट्रातील खासदारांची यादीकर्नाटकबहावाअकोला जिल्हाअहवालकार्ल मार्क्सरिंकू राजगुरूचार वाणीआर.डी. शर्माबचत गटजहांगीरधाराशिव जिल्हाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाभारत सरकार कायदा १९३५शुद्धलेखनाचे नियमकबूतरयशवंतराव चव्हाणसुनील नारायणजैन धर्ममहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअलिप्ततावादी चळवळभूतनगर परिषदशाहू महाराजमनुस्मृती दहन दिनमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)मातीनटसम्राट (नाटक)संगणकाचा इतिहासछत्रपती संभाजीनगरॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपाटीलध्रुपदमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ🡆 More