विकिपीडिया: महाजालावरील एक मुक्‍त ज्ञानकोश

विकिपीडिया (Wikipedia) हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला मुक्त ज्ञानकोशांचा समूह आहे.

विकिपीडिया
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेअर
स्थापना जानेवारी १५, २००१
संस्थापक जिमी वेल्स, लॅरी सँगर
मुख्यालय अमेरिका
पालक कंपनी विकिमीडिया फाउंडेशन
संकेतस्थळ विकिपीडिया

विकिपीडिया ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विकिपीडियाचे संकेतस्थळ विकी ही आज्ञावली (सॉफ्टवेर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रितरीत्या महाजालावर काम करू शकतात.

विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. मराठी विकिपीडिया), सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो.

विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचा निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना, ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.

विकिमीडिया फाउंडेशन ही ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत. विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषा यातील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.

मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१४८ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत, जगातील विविध भाषांत मिळून, आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख लिहीले गेले आहेत.

विकिपीडियाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपीडिया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्र वापरून शोधता येतो.

विकिपीडियाचा इतिहास

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.

विकिपीडियाची वैशिष्ट्ये

विकिपीडिया: विकिपीडियाचा इतिहास, विकिपीडियाची वैशिष्ट्ये, बाह्य दुवे 

बाह्य दुवे

मनोगत

संदर्भ

संदर्भसूची

  • विकिपीडियांची भाषावार सूची (इंग्लिश भाषेत). p. https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias_by_language_group. ११ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

विकिपीडिया चा इतिहासविकिपीडिया ची वैशिष्ट्येविकिपीडिया बाह्य दुवेविकिपीडिया संदर्भविकिपीडिया संदर्भसूचीविकिपीडियामुक्‍त ज्ञानकोश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पारनेर विधानसभा मतदारसंघमराठी भाषाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारताचे राष्ट्रपतीबालविवाहजैन धर्मकन्या रासदक्षिण दिशासमुपदेशनपांडुरंग सदाशिव सानेपुरंदर किल्लाजैवविविधताराणी लक्ष्मीबाईज्ञानपीठ पुरस्कारहोमरुल चळवळतलाठीमहात्मा गांधीनाटकजन गण मनदारिद्र्यरेषाउद्धव ठाकरे२०१९ लोकसभा निवडणुकाहापूस आंबामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेमहाराष्ट्रातील लोककलाअहमदनगर लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रअभिनय२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाविधान परिषदमाढा विधानसभा मतदारसंघमटकाराज ठाकरेदेवनागरीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशगजानन दिगंबर माडगूळकरसंभोगगुरुत्वाकर्षणमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपृथ्वीचे वातावरणपवनदीप राजनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारतीय संसदजिल्हानिबंधमांगरोहित शर्माद प्रॉब्लम ऑफ द रूपीनैसर्गिक पर्यावरणसूर्यपद्मसिंह बाजीराव पाटीलअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघबाराखडीभारतातील राजकीय पक्षबाळशास्त्री जांभेकरशिवाजी महाराजांची राजमुद्राबचत गटसांगली जिल्हाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीवसंतराव दादा पाटीलफुटबॉलमूळव्याधसूर्यमालामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीदालचिनीमहाराष्ट्र टाइम्ससमर्थ रामदास स्वामीएकविरालीळाचरित्रवर्णजिल्हा परिषदअष्टविनायकसोलापूर लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाराष्ट्र दिनशिखर शिंगणापूरभाषा विकासपसायदान🡆 More