मराठी विकिपीडिया

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे.

मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. मराठी विकीपीडियावर सध्या ९६,१४६ लेख आहेत. "शिवाजी महाराज" व "बाबासाहेब आंबेडकर" हे मराठी विकिपीडियावरील आजवरचे सर्वाधिक वाचले जाणारे पहिले दोन लेख आहेत. "औदुंबर (कविता)" आणि "वसंत पंचमी" हे मराठी विकिपीडियावर लिहिले गेलेले अनुक्रमे पहिले व दुसरे लेख आहेत.

मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
मराठी विकिपीडिया
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा मराठी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://mr.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण मे १, इ.स. २००३
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

प्रगती

मराठी विकिपीडियाची प्रगती खालीलप्रमाणे झालेली आहे.

  • १ मे २००३ मध्ये सुरुवात
  • २२ सप्टेंबर २००८ रोजी २०,००० लेख पूर्ण
  • २ जुलै २०१० रोजी ३०,००० लेख पूर्ण
  • २४ एप्रिल २०११ रोजी ३३,३३३ लेख पूर्ण
  • २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ४०,००० लेख पूर्ण
  • ११ सप्टेंबर २०१६ रोजी ४४,४४४ लेख पूर्ण
  • २२ डिसेंबर २०१७ रोजी ५०,००० लेख पूर्ण
  • २१ ऑगस्ट २०२० रोजी ६०,००० लेख पूर्ण
  • २४ डिसेंबर २०२० रोजी ६६,६६६ लेख पूर्ण
  • ३० जुलै २०२१ रोजी ७७,७७७ लेख पूर्ण
  • २३ सप्टेंबर २०२१ रोजी ८०,००० लेख पूर्ण
  • २९ डिसेंबर २०२२ रोजी ८८,८८८ लेख पूर्ण
  • १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये ९०,००० लेख पूर्ण

सदस्य आणि संपादक

आज, दिनांक २५ एप्रिल २०२४, गुरूवार रोजी
मराठी विकिपीडियाची सांख्यिकी - सद्यस्थिती
एकूण सदस्यखाते एकूण लेख एकूण संचिका/चित्रे प्रचालक
१,६२,२९९ ९६,१४६ ११,४२४ १०

टीका

'दैनिक प्रहार;चे पत्रकार अभिजित ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११ च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहून आली ; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमित सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तींना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या तिऱ्हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टीका केली आहे.

तथ्यशोधाचा मार्गच नाकारणे, फक्त भाषांतरित माहिती देणे, ही जी टोके इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाईन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाईन मराठी’ने गाठली. याचे कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच, कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणाऱ्यांची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळे सारख्याच जातीची आहेत, असे विकिपीडियातही दिसते.

येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधिक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे. वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादने पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हे एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात. पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केले जाते.संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे, पूर्ण संशोधन करून संदर्भासहित लेख लिहिण्याचे प्रमाण नगण्यच आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

मराठी विकिपीडिया प्रगती[१]मराठी विकिपीडिया सदस्य आणि संपादकमराठी विकिपीडिया टीकामराठी विकिपीडिया हे सुद्धा पहामराठी विकिपीडिया संदर्भमराठी विकिपीडिया बाह्य दुवेमराठी विकिपीडियाइ.स. २००३औदुंबर (कविता)ज्ञानकोशबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषामे १वसंत पंचमीविकिपीडियाविकिपीडिया:मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या असलेली पृष्ठेशिवाजी महाराज

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोरा कुंभारराज ठाकरेस्वादुपिंडयशस्वी जयस्वालचैत्र पौर्णिमामहाराष्ट्रातील राजकारणहिरडाजागतिक महिला दिनअध्यापनउद्धव ठाकरेतुलसीदासबारामती विधानसभा मतदारसंघव्यंजनपुस्तककावीळश्यामची आईशिवाजी महाराजांची राजमुद्रारवींद्रनाथ टागोरतिवसा विधानसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारदुष्काळईशान्य दिशालावणीअकोला लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःपथनाट्यअमरावतीजागरण गोंधळश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीतेजस ठाकरेतणावरविकांत तुपकरपर्यावरणशास्त्रजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येमराठी लोकराखीव मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमुख्यमंत्रीसुंदर कांडतमाशामासिक पाळीमादीची जननेंद्रियेसाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमण्यारगोंधळमहाराष्ट्रातील खासदारांची यादीप्राण्यांचे आवाजयेसूबाई भोसलेछत्रपती संभाजीनगररायगड जिल्हाअमरावती लोकसभा मतदारसंघगुरू ग्रहइतिहासाच्या अभ्यासाची साधनेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघतुतारीमहादेव गोविंद रानडेआदिवासीप्रतापराव गणपतराव जाधवझाडजागतिक दिवसजागतिक तापमानवाढसप्तशृंगी देवीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तप्रकाश आंबेडकरवेदजालना लोकसभा मतदारसंघभारतीय लष्करसप्त चिरंजीवसमासविठ्ठल रामजी शिंदेमहाराष्ट्र विधान परिषदबारामती लोकसभा मतदारसंघराजाराम भोसलेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतीय संस्कृतीपुरंदरचा तह🡆 More