विक्रम साराभाई: भारतीय शास्त्रज्ञ

विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स.

१९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

विक्रम साराभाई
विक्रम साराभाई: बालपण व शिक्षण, कारकीर्द, सन्मान
पूर्ण नावविक्रम अंबालाल साराभाई
जन्म 12-08-1919 १२ ऑगस्ट १९१९ (1919-08-12)
अहमदाबाद
मृत्यू 30-12-1971

३० डिसेंबर, १९७१ (वय ५२)
केरळ राज्यातील कोबालम

निवासस्थान भारत विक्रम साराभाई: बालपण व शिक्षण, कारकीर्द, सन्मान
नागरिकत्व भारतीय विक्रम साराभाई: बालपण व शिक्षण, कारकीर्द, सन्मान
राष्ट्रीयत्व भारतीय विक्रम साराभाई: बालपण व शिक्षण, कारकीर्द, सन्मान
धर्म हिन्दू

बालपण व शिक्षण

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात ऑगस्ट १२, १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.

आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

कारकीर्द

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली.

सन्मान

डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. 

मृत्यू

३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे दुःखद निधन झाले.

बाह्य दुवे

Tags:

विक्रम साराभाई बालपण व शिक्षणविक्रम साराभाई कारकीर्दविक्रम साराभाई सन्मानविक्रम साराभाई मृत्यूविक्रम साराभाई बाह्य दुवेविक्रम साराभाई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतातील राजकीय पक्षकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघतुळजापूरआनंद शिंदेअण्णा भाऊ साठेशेतकरीनाटकमौर्य साम्राज्यऋग्वेदरॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारतीय लोकशाहीवि.स. खांडेकरबाळूमामाच्या नावानं चांगभलंपिंपळमहादेव गोविंद रानडेभारतातील शेती पद्धतीगाडगे महाराजमटकाभारताचा इतिहासचंद्रयान ३घोणसचैत्रगौरीभगवद्‌गीतासंगणकाचा इतिहासगोंधळमराठी लिपीतील वर्णमालामुळाक्षरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशेतकरी कामगार पक्षजागतिक तापमानवाढकासवशहाजीराजे भोसलेप्रतापराव गणपतराव जाधवसंधी (व्याकरण)इंदिरा गांधीआवळारामरक्षाअमरावतीधर्मनिरपेक्षताकररावणमराठा आरक्षणलता मंगेशकरभगवानबाबाक्रियाविशेषणयेसूबाई भोसलेजगातील देशांची यादीतुकडोजी महाराजराखीव मतदारसंघसोलापूरभारतातील शासकीय योजनांची यादीमाढा लोकसभा मतदारसंघगोत्रशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीकादंबरीराजकारणउच्च रक्तदाबअर्थसंकल्पकासारलक्ष्मीवर्णमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमाळीमहाराष्ट्राची हास्यजत्राकुंभ राससूर्यनमस्कारसोयाबीनरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीविनयभंगव्यवस्थापनफेसबुकनेतृत्वबुलढाणा लोकसभा मतदारसंघऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपरभणी जिल्हाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)अष्टांगिक मार्गबचत गट🡆 More