रामरक्षा

रामरक्षा हे पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण व्हावे अशी रामाची प्रार्थना करणारे तसेच रामाची स्तुती करणारे संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे.

रामाच्या विविध नावांसह विशिष्ट अवयवांची क्रमाने नावे घेत त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे अशा आशयाचा मजकूर ह्या स्तोत्राच्या सुरुवातीच्या भागात येतो.

श्रीरामरक्षास्तोत्र
रामरक्षा
लेखक बुधकौशिक ऋषी
भाषा संस्कृत
साहित्य प्रकार स्तोत्र


स्तोत्राची विविध संस्करणे

प्रस्तुत स्तोत्र हे मौखिक परंपरेच्या, हस्तलिखिताच्या आणि मुद्रित प्रकाशनाच्या अशा विविध स्वरूपात आढळते. ह्यांपैकी हस्तलिखित संस्करणे आणि मुद्रित संस्करणे ह्यांत बरेच अंतर असल्याचे ह्या स्तोत्राच्या विविध संस्करणांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक डॉ. गूदेन ब्यूनेमान ह्यांनी नोंदवले आहे. त्यांनी ह्या संस्करणांचे पुढीलप्रमाणे विभाग मानले आहेत.

आधुनिक संस्करण

हे मुद्रित स्वरूपात सर्वसामान्यपणे आढळणारे आणि सर्वत्र प्रसार असलेले संस्करण असून विविध मुद्रित संहितांत मोठ्या प्रमाणात सारखेपणा आढळतो.

हस्तलिखितांतील विविध संस्करणे

मुद्रित स्वरूपातील संस्करणाव्यतिरिक्त भारतात विविध ठिकाणी ह्या स्तोत्राची हस्तलिखिते आढळतात. ब्यूनेमान ह्यांनी ह्यांपैकी पुणे, वाई, वाराणशी आणि अयोध्या येथील एकून ८४ हस्तलिखितांचा समावेश आपल्या अभ्यासात केला आहे. ही हस्तलिखिते प्राधान्याने देवनागरी लिपीतील असून काही हस्तलिखिते मैथिली तसेच शारदा लिपीत लिहिलेलीही आढळतात.

रचना

बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे स्तोत्र आहे. भगवान शंकर यांनी बुधकौशिक ऋषी यांना रात्री स्वप्नात हे स्तोत्र सांगितले आणि सकाळी उठल्यावर ऋषीनी ते लिहून काढले अशी कथा याच स्तोत्राच्या शेवटी नोंदविलेली आढळते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

संदर्भसूची

  • ब्यूनेमान, गुदरून (२०१०). क्षीरसागर, हेमा (संपा.) (ed.). विश्वसंचारी रामरक्षा (द्वितीय ed.). मूलगामी प्रकाशन.

Tags:

रामरक्षा स्तोत्राची विविध संस्करणेरामरक्षा रचनारामरक्षा हे सुद्धा पहारामरक्षा संदर्भरामरक्षा संदर्भसूचीरामरक्षारामसंस्कृत भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

त्र्यंबकेश्वरकोरोनाव्हायरस रोग २०१९गूगलभाग्यश्री पटवर्धनलोकसंख्यापाणीसामाजिक समूहभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)पाणी व्यवस्थापनभारतातील राजकीय पक्षजैन धर्मअलेक्झांडर द ग्रेटमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीराष्ट्रवादभारतओझोनजगदीप धनखडचमारसमीक्षादादाजी भुसेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रपृथ्वीहिंदू धर्मभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेबाळाजी विश्वनाथसविता आंबेडकरनामदेवहत्तीरोगजागरण गोंधळभारताचा ध्वजनवग्रह स्तोत्रकाळूबाईमधमाशीमानवी भूगोलमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळज्योतिषकोरफडभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमंगळ ग्रहमहात्मा फुलेमहाराणा प्रतापराष्ट्रीय सुरक्षाविष्णुकावीळसंशोधनविदर्भातील पर्यटन स्थळेवातावरणअजित पवारमहारकडुलिंबरत्‍नेफुटबॉलजास्वंदगाडगे महाराजलता मंगेशकरजय श्री रामसात आसरामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकुत्रामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअंकुश चौधरीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरजेजुरीदिनकरराव गोविंदराव पवारपरकीय चलन विनिमय कायदापळसअजिंठा-वेरुळची लेणीपहिले महायुद्धबृहन्मुंबई महानगरपालिकापर्यावरणशास्त्रदौलताबादसौर ऊर्जाराजरत्न आंबेडकरभारतीय प्रजासत्ताक दिनमुंबई पोलीसहिंदू धर्मातील अंतिम विधी🡆 More